स्वातंत्र्यसैनिक डॉ. परशुराम पाटील कलाकेंद्र संचालित ‘कलाश्रम’चे पुरस्कार प्रदान!

v     स्वातंत्र्यसैनिक डॉ. परशुराम पाटील कलाकेंद्र संचालित ‘कलाश्रम’चे पुरस्कार प्रदान!
v     जनसंपर्क प्रमुख राम कोंडीलकर, तानाजी घाग, अक्षया धुरी व डॉ. किशोर कुशले मानकरी!
प्रचंड कष्टाने आपले ध्येय गाठण्यात यशस्वी झालेल्या व्यक्तींना गौरवण्याची परंपरा जेष्ठ सिने पत्रकार नंदकुमार पाटील आणि नंदिनी पाटील यांनी स्वातंत्र्यसैनिक डॉ. परशुराम पाटील यांच्या स्मृती प्रीत्यर्थ सुरु करण्यात आलेल्या ‘कलाश्रम’ या संस्थेमार्फत सुरु करून एक अभिनव उपक्रम सुरु केला आहे. या अंतर्गत प्रत्येक महिन्यात एकूण चार व्यक्तींना पुरस्कार देऊन गौरव केला जातो. हे चारही पुरस्कार वेगवेगळ्या क्षेत्रात विपुल कार्य केलेल्या पण प्रसिद्धी माध्यमांपासून दूर राहिलेल्या दिवंगत व्यक्तींच्या नावे दिले जातात. नुकताच हा सोहळा रवींद्र नाट्यमंदिरातील पुलं देशपांडे कला अकादमीत पार पडला. आघाडीचे सिने जनसंपर्क प्रमुख राम कोंडीलकर, तानाजी घाग, अक्षया धुरी व डॉ. किशोर कुशले यांना हे पुरस्कार प्रदान करण्यात आले.  या प्रसंगी मराठी भाषा तंत्रज्ञान विकासक जेष्ठ पत्रकार दिनकर गांगल प्रमुख पाहुणे होते.

सिने पत्रकार नंदकुमार पाटील आणि सौ. नंदिनी पाटील यांनी नितळ सामाजिक भावनेतून हे पुरस्कार सुरु केले आहेत. विशेष गाजावाजा न करता अतिशय वेगळ्या धर्तीवर या पुरस्कारांचे वितरण केले जाते. समाजात हलाखीचे जीवन जगून आपला ठसा उमटवणाऱ्या व्यक्तींचा ‘दखलपत्र’ देऊन अनोखा गौरव केला जातो. ज्यांना हे ‘दखलपत्र’ दिले जाते त्यांचे मनोगत व ज्यांच्या नावे हे ‘दखलपत्र’ असते त्यांच्या नातेवाईकांचे मनोगत यावेळी उपस्थितांना ऐकायला मिळाले.
या महिन्यात हे पुरस्कार प्रसिद्धीकार दिवंगत अनिल पोरेडी, कामगार नेते श्याम म्हात्रे, शिक्षण क्षेत्रात विपुल काम केलेल्या सुहासिनी दिघे व रंगकर्मी रमाकांत वैद्य यांचे नावे अनुक्रमे सिने जनसंपर्क प्रमुख राम कोंडीलकर, तानाजी घाग, अक्षया धुरी व डॉ. किशोर कुशले यांना प्रदान करण्यात आले.
या प्रसंगी बोलताना राम कोंडीलकर म्हणाले, “मी वयाच्या आठव्या वर्षी वैद्य कुटुंबीयांकडे घरगडी म्हणून कामाला सुरुवात केली. त्यांच्या चांगुलपणामुळे दिवसा काम आणि रात्री शिक्षण घेत जीवनात प्रचंड संघर्ष करून इथपर्यंत पोहचलो, मुंबईत कुठलाही आसरा नसताना माझ्या आत्मबळावर विश्वास ठेऊन माझी सहचारिणी तेजश्री कोंडीलकर हिने माझ्यासोबत लग्न केले, आणि त्यानंतर हालाखीच्या जीवनात माझी साथ सोडली नाही, तसेच माझे सासू – सासरे ठाकूर यांनी कायम मदत करीत मानसिक आणि आर्थिक पाठबळ दिले आणि त्यामुळेच मी आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध कलाकृतींची प्रसिद्धी करीत आहे.” अशी भावना त्यांनी या प्रसंगी व्यक्त केली.
या कार्यक्रमादरम्यान फादर्स दे निमित्त घेण्यात आलेल्या बिंब प्रतिबिंब या स्पर्धेच्या विजेत्यांना रोख रक्कम व पारितोषिके देण्यात आली. या सोहळ्याला सस्नेह उपस्थिती फिल्ड ऑफिसर विलास चौकेकर होती. या स्पर्धा संयोजनासाठी सलोनी बोरकर यांनी मदत केली. पारितोषिक वितरण समारंभाचे सूत्रसंचालन रिद्धी म्हात्रे तर दखलपत्रांचे वाचन अक्षय गांगल, दर्शना जांभळे, भारत जगधणे, राहुल शिंदे यांनी केले.

Comments

Popular posts from this blog

‘हावरे पिनॅकल’ स्वप्नपूर्ती सोहळा दिमाखात संपन्न!

**तोंडाला पुसणाऱ्या सरकारविरोधात गांधी जयंती दिनी आत्मक्लेश आंदोलन*

एअरटेलच्या वाशी स्टोअरचे स्टोअर मॅनेजर यांनी संदीप गजभिये यांच्याकडे एक्सएस मॅक्स आयफोन सुपूर्द केला.