युरोब्लिच 2018 मध्ये 5 वर्गवारींसाठी ऑनलाईन स्पर्धा


युरोब्लिच 2018 मध्ये 5 वर्गवारींसाठी ऑनलाईन स्पर्धा

युरोब्लिच 2018 या जर्मनी येथे होणा-या जागतिक स्तरावरील नामांकित प्रदर्शनाच्या निमित्ताने शीट मेटल वर्किंग इंडस्ट्रीसाठी 5 वर्गवारींमध्ये ऑनलाईन स्पर्धा होणार आहे. त्यासाठी https://www.euroblech.com/2018/english/awards/  हे संकेतस्थळ देण्यात आले असून त्याच्यावर नाविन्यता, कुशलता, उत्तम कामगिरी, उत्तम कार्यप्रणाली अशा प्रकारच्या निकषांवर पाच वर्गवारींमध्ये स्पर्धा होणार असून प्रत्येक वर्गवारीमध्ये पाच विजेते निवडण्यात येणार आहेत. त्यासाठी सप्टेंबर 2018 पासून ऑनलाईन मतदान करता येईल.

स्टेप इनटू दी डिजिटल रिअॅल्टी या संकल्पनेवर यंदाची ही स्पर्धा होत आहे. डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनच्या माध्यमातून उत्पादन करणा-यांना यात नवे व्यासपीठ मिळणार आहे. त्यातून त्यांच्या वेगवेगळ्या उत्पादन प्रक्रियेशी संबंधित विविध बाबी ऐकमेकांशी कशाप्रकारे उपयोगात आणता येतील, याच्यावर मार्गदर्शन व समन्वय साधणे शक्य होईल. त्याचबरोबर 25 युरोब्लिच शोचे आयोजन कऱण्यात आले असून त्याच्याबद्दलची माहितीदेखील त्यातून मिळू शकेल. सायबर सेक्युरिटी हा देखील त्यात एक भाग असून त्याचे महत्व सांगण्यात येईल तसेच उत्पादनशीलता वाढीसाठी पूरक वातावरण निर्मिती व्हावी, यासाठीदेखील याचा उपयोग होणार आहे. ई मोबीलिटी ही संकल्पनादेखील त्यात नव्याने समाविष्ट करण्यात आली आहे. उत्तम स्टार्टअपचा पर्यायदेखील असेल. ही ऑनलाईन स्पर्धा सर्व कंपन्यांसाठी खुली आहे. जागतिक स्तरावरील मंडळी यात सहभागी होऊ शकतील याबाबतच्या प्रवेशिकांसाठी शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2018 असून त्यानंतर त्यांची माहिती युरोब्लिचच्या संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात येईल. नंतर मतदान सुरु होईल. हे मतदान 30 सप्टेंबर 2018 पर्यंत करता येईल. त्यानंतर युरोब्लिचच्या 24 ऑक्टोबर 2018 या दिवशी होणा-या शानदार सोहळ्यात विजेत्यांना सन्मानित करण्यात येईल. युरोब्लिचचे हे प्रदर्शन जर्मनीच 23 ते 26 ऑक्टोबर 2018 या कालावधीत होत आहे. त्यात जागतिक स्तरावरील व्यावसायिक, मान्यवर सहभागी होतील. 40 देशांतून सुमारे 1500 हून व्यावसायिक आस्थापनं यात सहभागी होणार आहेत. 89 हजार चौरस मीटर इतक्या भव्य जागेत हे प्रदर्शन भरणार आहे.

Comments

Popular posts from this blog

‘हावरे पिनॅकल’ स्वप्नपूर्ती सोहळा दिमाखात संपन्न!

**तोंडाला पुसणाऱ्या सरकारविरोधात गांधी जयंती दिनी आत्मक्लेश आंदोलन*

अच्युत पालव यांच्या `मास्टर क्लास'मध्ये अमेरिकन गिरवणार देवनागरी सुलेखनाचा कित्ता