युरोब्लिच 2018 – डिजिटल रिअॅल्टिकडे एक पाऊल


युरोब्लिच 2018 – डिजिटल रिअॅल्टिकडे एक पाऊल

युरोब्लिज 2018 हे 25 वे आंतरराष्ट्रीय शीट मेटल वर्किंग टेक्नॉलॉजी प्रदर्शन 23 ते 26 ऑक्टोबर 2018 या कालावधीत जर्मनी येथील हॅनोवर एक्झिबिशन ग्राऊंडवर होत असून त्याची तयारी सहा महिने अगोदरपासूनच सुरू झाली आहे. यात 38 देशांमधील 1,400 व्यावसायिक संस्था सहभागी होत आहेत. शीट मेटल उद्योगातील नामांकित संस्थांचा यात समावेश असून यात आतापर्यंत जर्मनी, इटली, तुर्की, चीन, नेदरलँड, स्पेन, स्वित्झर्लंड, ऑस्ट्रिया आणि अमेरिका या राष्ट्रांमधील व्यावसायिकांचा समावेश आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ही संख्या अधिकांश राहणार असून मिळणारा प्रतिसाद देखील भरघोस असेल, असा आयोजकांचा विश्वास आहे. दर दोन वर्षांनी या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येते. गेल्या वेळी 2016 मध्ये 87,800 चौरस मीटर जागेवर त्याचे आयोजन करण्यात आले होते.


यंदाच्या या प्रदर्शनाचे वेगळेपण म्हणजे डिजिटलच्या दिशेने टाकलेले एक महत्वाचे पाऊल असे म्हणता येईल. प्रदर्शनाच्या संचालिका इव्हलिन वॉर्विक यांनी सांगितले की, प्रत्येक उत्पादनाची देखभाल करण्याबाबत डिजिटल व्यासपीठ कसे उपयोगात आणता येईल, या अनुषंगाने करण्यात आलेले प्रयत्न यातून दिसून येतील. या उद्योगाला आपल्या उत्पादनांच्या निर्मितीच्या वेळी उपलब्ध माहितीची आदानप्रदान करण्यासाठी डिजिटल तंत्र अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. उपकरणांची, यंत्रांची व प्रक्रियांची माहितीदेखील डिजिटलच्या माध्यमातून योग्यरित्या हाताळता येऊ शकते. त्यातून उत्पादनक्षमता वाढीचे नवे तंत्र देखील साकारता येणे शक्य आहे.
युरोब्लिचच्या वतीने आयोजित करण्यात येणा-या या प्रदर्शनात जगभरातील अभियंते, उत्पादन व्यवस्थापक, गुणवत्ता व्यवस्थापक, खरेदीदार, विक्रेते, निर्माते तसेच तंत्रसंचालक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. त्यातून या उद्योगाला जागतिक स्तरावर वृद्धी होण्यास फार मोठे सहकार्य मिळत असते. त्यामुळेच शीट मेटलच्या दिशेने या दृष्टीकोनातून पाहिले पाहिजे व त्यानुसार कार्य केले पाहिजे. डिजिटल वापर हा या अनुषंगाने व्यापक व सर्वदूर परिणाम साध्य करण्यास उपयुक्त ठरणार आहे, असा आयोजकांचा विश्वास आहे. 

Comments

Popular posts from this blog

‘हावरे पिनॅकल’ स्वप्नपूर्ती सोहळा दिमाखात संपन्न!

**तोंडाला पुसणाऱ्या सरकारविरोधात गांधी जयंती दिनी आत्मक्लेश आंदोलन*

अच्युत पालव यांच्या `मास्टर क्लास'मध्ये अमेरिकन गिरवणार देवनागरी सुलेखनाचा कित्ता