क्रेडिटअॅक्सेस ग्रामीण लि.ने 23 अँकर इन्व्हेस्टरना प्रति इक्विटी शेअर 422 रुपयांप्रमाणे दिले 339.36 कोटी रुपयांचे इक्विटी शेअर


क्रेडिटअॅक्सेस ग्रामीण लि.ने 23 अँकर इन्व्हेस्टरना प्रति इक्विटी शेअर 422 रुपयांप्रमाणे दिले 339.36 कोटी रुपयांचे इक्विटी शेअर
  • प्रारंभी समभाग विक्रीला ऑगस्ट 8, 2018 रोजी सुरुवात व ऑगस्ट 10, 2018 रोजी विक्री बंद होणार
  • किंमतपट्टा: प्रति इक्विटी शेअर 418 रुपये ते 422 रुपये
क्रेडिटअॅक्सेस ग्रामीण लिमिटेडने (“कंपनीकिंवाइश्यूअर”) 23 अँकर इन्व्हेस्टरना प्रति इक्विटी शेअर 422 रुपयांप्रमाणे (किंमतपट्ट्याची कमाल मर्यादा) 80,41,617 इक्विटी शेअर दिले आहेत.
अँकर इन्व्हेस्टरमध्ये समाविष्ट आहेत: 1) न्यूबेर्गेर बेर्मान इमर्जिंग मार्केट्स इक्विटी फंड 13.26%; 2) आयसीआयसीआय प्रुडेन्शिअल बँकिंग अँड फिनान्शिअल सर्व्हिसेस फंड 11.79%; 3) ईस्टस्प्रिंग इन्व्हेस्टमेंट्स इंडिया इक्विटी ओपन लिमिटेड 10.81%; 4) पिक्टेट – इंडियन इक्विटीज 9.43%; 5) सुंदरम म्युच्युअल फंड A/C  सुंदरम रुरल अँड कन्झमशन फंड 7.37%; 6) एचडीएफसी स्टँडर्ड लाइफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड 5.89%; 7) एडलविस अल्टरनेटिव्ह इन्व्हेस्टमेंट अपॉर्च्युनिटीज ट्रस्ट - एडलविस क्रॉसओव्हर अपॉर्च्युनिटीज फंड 5.75%; 8) टाटा व्हॅल्यू फंड सीरिज 1 4.42%; 9) सिटिग्रुप ग्लोबल मार्केट्स मॉरिशस प्रायव्हेट लिमिटेड 4.13%; 10) मिरे अॅसेट इंडिया सेक्टर लीडर इक्विटी फंड 3.31%; 11) आयआयएफएल फोकस्ड इक्विटी फंड 2.95%; 12) बीएनपी पारिबा आर्बिट्रेज 2.48%; 13) कॅनरा रोबेको म्युच्युअल फंड A/C कॅनरा रोबेको इक्विटी टॅक्स सेव्हर फंड 2.36%; 14) मिरे अॅसेट इंडिया सोलोमोन इक्विटी इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट 1 1.99%; 15) बजाज अॅलियान्झ लाइफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड 1.87%; 16) ईस्टस्प्रिंग इन्व्हेस्टमेंट्स - इंडिया इक्विटी फंड 1.86%; 17) एचएसबीसी स्मॉल कॅप इक्विटी फंड 1.51%; 18) टाटा व्हॅल्यू फंड सीरिज 2 1.48%; 19) टाटा बँकिंग अँड फिनान्शिअल सर्व्हिसेस फंड 1.48%; 20) इंडिया अॅकॉर्न फंड लि. 1.47%; 21) अल मेहवर कमर्शिअल इन्व्हेस्टमेंट्स एलएलसी - (व्हाइटिंग) 1.47%; 22) अशोका इंडिया इक्विटी इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट पीएलसी 1.47%; 23) अशोका प्रा. लि. 1.47 %.
कंपनीने ऑगस्ट 8, 2018 पासून, प्रत्येकी 10 रुपये दर्शनी मूल्य असलेल्या इक्विटी शेअर्सची (“इक्विटी शेअर्स”) प्रति इक्विटी शेअर प्राइसनुसार (शेअर प्रीमिअमसह) प्रारंभी समभाग विक्री करायचे ठरवले असून (“ऑफर”) त्यामध्ये, 6,300 दशलक्ष रुपयांपर्यंतच्या इक्विटी शेअर्सच्या फ्रेश इश्यूचा (“फ्रेश इश्यू”) आणि प्रमोटर, क्रेडिटअॅक्सेस एशिया एन.व्ही.तर्फे 11,876,485 पर्यंतच्या इक्विटी शेअर्सच्या ऑफर फॉर सेलचा (“प्रमोटर सेलिंग शेअरहोल्डरआणि असे दिलेले शेअर्स,ऑफर्ड शेअर्स”) (“ऑफर फॉर सेल”) समावेश असेल.  
बिड/ऑफर पिरिएड ऑगस्ट 10, 2018 रोजी बंद होणार आहे.
ऑफरसाठी किंमतपट्टा प्रति इक्विटी शेअर 418 रुपये ते 422 रुपये असेल. किमान बोलीचे प्रमाण 35 इक्विटी शेअर्स आहे आणि त्यानंतर 35 इक्विटी शेअर्सच्या पटीत असेल.
इक्विटी शेअर्सची नोंदणी बीएसई व एनएसई येथे केली जाणार आहे.
ऑफरसाठी बुक रनिंग लीड मॅनेजर्स (“बीआरएलएम”) आहेत, आयसीआयसीआय सिक्युरिटीज लिमिटेड, क्रेडिट स्युइस सिक्युरिटीज (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड, आयआयएफएल होल्डिंग्स लिमिटेड कोटक महिंद्रा कॅपिटल कंपनी लिमिटेड.
सुधारणा केल्यानुसार, बदल केलेल्या सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (इश्यू ऑफ कॅपिटल अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट) रेग्युलेशन्स, 2009 च्या रेग्युलेशन 26(1) रेग्युलेशनच्या अनुसार ही ऑफर बुक बिल्डिंग प्रक्रियेनुसार राबवली जाणार असून त्यामध्ये नेट ऑफरपैकी 50% शेअर्स विशिष्ट प्रमाणात पात्र संस्थात्मक ग्राहकांसाठी (“क्यूआयबी पोर्शन”) राखून ठेवले जातील. बीआरएलएच्या सल्ल्याने, कंपनी व प्रमोटर सेलिंग शेअरहोल्डर्स यांनी क्यूआयबी पोर्शनपैकी 60% भाग अँकर इन्व्हेस्टरना अँकर इन्व्हेस्टर अलोकेशन प्राइसने विशिष्ट प्रमाणात दिले आहेत (“अँकर इन्व्हेस्टर पोर्शन”). अँकर इन्व्हेस्टर पोर्शनपैकी किमान एक-तृतियांश इक्विटी शेअर देशांतर्गत म्युच्युअल फंडांकडून अँकर अलोकेशन प्रइसने वा त्याहून अधिक वैध बोलीनुसार केवळ देशांतर्गत म्युच्युअल फंडांसाठी राखून ठेवले होते. क्यूआयबी श्रेणीच्या 5% इक्विटी शेअर्स विशिष्ट प्रमाणात केवळ म्युच्युअल फंडांसाठी उपलब्ध होतील. क्यूआयबी श्रेणीतील उर्वरित भाग विशिष्ट प्रमाणात, म्युच्युअल फंडांसह सर्व क्यूआयबी बिडरना त्यांच्याकडून आलेल्या ऑफर प्राइस वा त्याहून अधिक वैध बोलींवर उपलब्ध केला जाईल (अँकर इन्व्हेस्टर वगळता). परंतु, म्युच्युअल फंडांकडून आलेली मागणी नेट क्यूआयबी भागाच्या 5% हून कमी असेल तर म्युच्युअल फंड पोर्शनमधील उरलेले इक्विटी शेअर्स उरलेल्या नेट क्यूआयबी पोर्शनमध्ये समाविष्ट केले जातील व क्यूआयबींना विशिष्ट प्रमाणात दिले जातील. तसेच, सेबी आयसीडीआर रेग्युलेशन्सनुसार, नेट ऑफरपैकी किमान 15% भाग विशिष्ट प्रमाणात बिगर-संस्थात्मक बिडर्ससाठी राखून ठेवला जाईल आणि विक्रीच्या किमतीइतक्या वा त्याहून अधिक रकमेच्या वैध बोली व रिटेल इंडिव्हिज्युअल बिडरसाठी किमान 35% शेअर्स राखून ठेवता येतील. अँकर इन्व्हेस्टर व्यतिरिक्त सर्व बिडरना अॅप्लिकेशन सपोर्टेड बाय ब्लॉक्ड अमाउंट (“एएसबीए”) प्रक्रियेमार्फत या विक्रीमध्ये सहभागी होता येईल व यासाठी त्यांना त्यांचा संबंधित बँक खाते क्रमांक द्यावा लागेल. या खात्यात एससीएसबीकडून बोलीची रक्कम सेल्फ सर्टिफाइड सिंडिकेट बँकेमार्फत (एससीएसबी) ब्लॉक केली जाईल. अँकर इन्व्हेस्टरना एएसबीए प्रक्रियेद्वारे अँकर इन्व्हेस्टर पोर्शनमध्ये सहभागी होता येणार नाही.

Comments

Popular posts from this blog

Indegene acquires Trilogy Writing & Consulting GmbH, a medical writing consultancy

TiEcon Mumbai 2023, brilliantly showcased revolutionary ideas & impactful solutions to build an Anti-Fragile and Sustainable India

REC DECLARES ITS FINANCIAL RESULTS FOR Q2 & H1 FY24