एडलवाईज टोकियो लाईफकडून ‘जिंदगी प्लस’ सादर

एडलवाईज टोकियो लाईफकडून जिंदगी प्लस सादर
तुमच्या प्रियजनांच्या सर्वांगिन संरक्षणासाठी एक नाविण्यपूर्ण टर्म प्लॅन

आपल्या ग्राहकांसाठी सातत्याने नाविन्यपूर्ण प्रोडक्ट्स देण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून एडलवाईज ग्रुप आणि टोकियो मरीन होल्डींग्ज यांचा संयुक्त उपक्रम असणाऱ्या एडलवाईज टोकियो लाईफ इन्शूरन्सने आज जिंदगी प्लस या पहिल्या टर्म प्लॅनची घोषणा केलीया टर्म प्लॅनच्या माध्यमातून तुमच्या बदलत्या गरजा आणि जबाबदाऱ्याना अनुसरुन सर्वांगीण जीवन संरक्षण मिळत असते.

ग्राहकांच्या मतांचा विचार करुन तयार करण्यात आलेले हे प्रोडक्ट त्यांच्या वर्तमानातीलतातडीच्या तसेच अनिश्चित अशा सर्व गरजांशी अनुकूलही बनवण्यात आले आहेजिंदगी प्लस आमच्या ऑनलाईन तसेच ऑफलाईन ग्राहकांसाठीही उपलब्ध आहेया प्लॅनच्या माध्यमातून ग्राहकांना मुल्य आणि नाविन्यपुर्णता यांचे अजोड मिश्रण उपलब्ध करुन दिले जात आहे.
या प्रोडक्टच्या लाँचवेळी बोलताना एडलवाईजकडून टोकियो लाईफ इन्शूरन्सचे कार्यकारी संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सुमीत राय यांनी सांगितले की, “जिंदगी प्लसच्या माध्यमातून आम्ही टर्म इन्शूरन्स प्लॅनची संकल्पना बदलत आहोतआम्ही ग्राहकांना एक सर्वसमावेशक पर्याय उपलब्ध करुन देत आहोतज्याचा त्यांना उत्पन्न बंद झाल्यानंतरही फायदा होउ शकेलआम्ही ग्राहकांसाठी असा पर्याय उपलब्ध करुन दिला आहे जो त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या कुटुंबियांना एक संरक्षक कवच उपलब्ध करुन देईलतसेच त्यांच्या जोडीदारालाही विमा संरक्षण उपलब्ध करुन देईल.”
जिंदगी प्लसच्या माध्यमातून ग्राहकांना बेटर हाफ बेनिफिट आणि डिक्रीजींग सम अॅशुअर्ड असे दोन नाविन्यपूर्ण फायदे उपलब्ध होणार आहेत.

बेटर हाफ बेनिफिटमधून पॉलिसीधारकाच्या मृत्यूनंतर भविष्यातील कोणत्याही हप्त्यांशिवाय त्याच्या जोडीदाराला जीवन विम्याचे कव्हर प्राप्त होणार आहे.पॉलिसीधारकाच्या मृत्यूनंतर त्याच्यावर अवलंबून असणाऱ्या कुटुंबातील सदस्याला विमा संरक्षण उपलब्ध व्हावे हा या तरतुदीचा हेतू आहेप्रामुख्याने गृहिणींना या योजनेचा अधिक फायदा होउ शकेलज्यांच्याकडे टर्म इन्शूरन्स उपलब्ध नसतो.

डिक्रीजींग सम अॅशुअर्ड हे या योजनेचे आणखी एक आकर्षक वैशिष्ट्य आहेयानुसार पॉलिसीधारकाच्या 60 वयापर्यंत त्याची विमा राशी स्थिर राहतेत्यानंतर 50टक्क्यांनी कमी होतेया पर्यायांतर्गत भरावा लागणारा हप्ता निश्चित विमा राशीच्या पातळीपेक्षा कमी असतोजिथे संपूर्ण पॉलिसीच्या कालावधीत निश्चित विमा राशी स्थिर राहत असते.
डिक्रीजींग सम अॅशुअर्ड हे व्यक्तीचे उत्पन्नसंपत्ती आणि आयुष्यभरात केला जाणारा खर्च यांच्या पॅटर्नचे प्रतिबिंब म्हणता येईलप्रामुख्याने निवृत्तीच्या 60 या वयोगटानंतर तुमच्या आर्थिक गरजा आणि जबाबदाऱ्या कमी होत असतातहे गृहीत धरुन टर्म प्लॅनमध्ये हे वैशिष्ट्य समाविष्ट केले असल्याचे राय यांनी सांगितले.

प्लॅनमध्ये पुढील प्रमुख वैशिष्ट्यांचाही समावेश आहे:
  • टॉप अप बेनिफिट - पॉलिसीच्या पहिल्या नुतनीकरणापासून निश्चित विमा राशीमध्ये वार्षिक पातळीवर वाढ
  • लाईफ स्टेज बेनिफिट - जीवनाच्या प्रत्येक पातळीवर निश्चित विमा राशीमध्ये वाढउदाहरणार्थलग्नमुलांचा जन्मकिंवा गृह कर्ज.
  • 60 पर्यंतच पैसे भरा - हा पर्याय पॉलिसी धारकाला निवृत्तीपर्यंत म्हणजे वयाच्या 60 वर्षापर्यंतच विमा हप्ता भरण्याची मुभा उपलब्ध करुन देतो
  • वेव्हर ऑफ प्रिमियम बेनिफिट - एखाद्या गंभीर आजाराचे निदान झाल्यास भविष्यातील सर्व हप्ते माफ केले जातात
  • डेथ बेनिफिट - पॉलिसीधारकाच्या मृत्यूनंतर विमा राशी त्याच्यावर अवलंबून असणाऱ्या व्यक्तीला देण्यात येतेयासाठी तीन पर्याय उपलब्ध आहेतलमसम किंवा मासिक उत्पन्न किंवा दोन्हींचे मिश्रण.

Comments

Popular posts from this blog

‘हावरे पिनॅकल’ स्वप्नपूर्ती सोहळा दिमाखात संपन्न!

**तोंडाला पुसणाऱ्या सरकारविरोधात गांधी जयंती दिनी आत्मक्लेश आंदोलन*

अच्युत पालव यांच्या `मास्टर क्लास'मध्ये अमेरिकन गिरवणार देवनागरी सुलेखनाचा कित्ता