‘हे दीदी’®चा भारतात पहिल्यांदाच संपूर्ण महिलांकरवी चालविल्या जाणाऱ्या कार्गो लॉजीस्टिक्समध्ये प्रवेश

 ‘हे दीदी’®चा भारतात पहिल्यांदाच संपूर्ण महिलांकरवी 
चालविल्या जाणाऱ्या कार्गो लॉजीस्टिक्समध्ये प्रवेश; 
त्यातून लांबपल्ला व मध्यम अंतर वितरणाची सोय
भारतातील महिलांतर्फे चालविली जाणारी एकमेव लांब पल्ल्याची लॉजीस्टीक वितरण सेवा कंपनी हे दीदी®( Hey Deedee)ने भारतात पहिल्यांदाच सर्व महिला कार्यरत असेलेली कार्गो लॉजीस्टीक सेवा सुरु करत असल्याचे जाहीर केले आहे. त्यातून लांबपल्ल्याच्या आणि मध्यम पल्ल्याच्या वितरण सेवा दिल्या जाणार आहेत.   हे दीदी®ने मोठाले असे पार्सल वितरण करण्याच्या दृष्टीने पावले उचलली असून महिला चालकांची भर्ती करत कंपनी मध्यम पल्ल्याच्या कार्गो वितरण सेवाही सुरु करत आहे. कंपनी भव्य स्वरुपात वाढत असून इ-कॉमर्स कंपन्यांना ती त्यांच्या लांब पल्ल्याच्या वितरणासाठी सेवा पुरवीत आहे. अलीकडे ‘हे दीदी’ने यशस्वीपणे मेटाफॉर्म वेन्चर्स एलएलसीची ५ लाख अमेरिकन डॉलरची बीज भांडवलपूर्व गुंतवणूक केली आहे. त्याचे मूल्य मात्र अद्याप खुले केलेले नाही. या गुंतवणुकीचा वापर आपला पसारा वाढविण्यासाठी कंपनीकडून केला जाणार असून त्यातून अवाका वाढविणे आणि तंत्रज्ञान उभारणे या गोष्टी केल्या जाणार आहेत. सध्याच्या चार शहरांमधील पसारा वाढवत कंपनी २०१८ या कलेंडर वर्षात १० शहरांमध्ये विस्तारणार आहे, त्याशिवाय चारचाकी गाड्यांचे गोदाम निर्माण करून त्यातून सर्व महिला चालकांच्या माध्यमातून वितरण केंद्र उभारले जाणार आहे.आशियातील महिलांसाठीची पहिली टॅक्सी सेवा सुरु करणाऱ्या आध्य उद्योजिका आणि ‘हे दीदी’च्या सह-संस्थापिका श्रीमती रेवती रॉय म्हणाल्या, “२०१७ च्या अखेरीस भारतातील लॉजीस्टीक बाजारपेठ ही १६० अब्ज अमेरिकन डॉलर एवढी होती. भारतीय संसदेत सादर करण्यात आलेल्या २०१७-१८च्या इकॉनॉमिक सर्व्हेच्या अंदाजानुसार जीएसटी दाखल झाल्यानंतर २०२० पर्यत भारतीय लॉजीस्टीक बाजारपेठ ही २१५ दशलक्ष अमेरिकन डॉलर एवढी होणार आहे. वृद्धीची ही टक्केवारी १०.५ टक्के सीएजीआर एवढी आहे. लॉजीस्टीक बाजारपेठ ही झपाट्याने वाढते आहे आणि अधिकच्या वृद्धीला वाव आहे, ही बाब सत्य परिस्थिती असूनही महिलांच्या बाबतीतील असलेल्या मर्यादा आणि त्यांच्याबद्दलचे ग्रह कमी झालेले नाहीत. या क्षेत्रातील महिलांचे प्रतिनिधित्व हे अगदीच नगण्य म्हणजे ५ टक्क्यापेक्षाही कमी आहे. लॉजीस्टीक आणि वितरण क्षेत्रामधील गरजू लोकांची संख्या ही उपलब्धतेपेक्षा अधिक आहे.

त्यामुळे महिलांना या क्षेत्रात आकर्षित करणे अधिक गरजेचे आहे. त्याचे एक कारण म्हणजे त्या बहुविध कामांमध्ये वाकबगार असतात आणि त्यातून त्या कित्येक कामे अगदी कुशलतेने पार पाडतात. त्यांत नियोजन, कार्यक्षमतेने अंमलबजावणी आणि नियंत्रण तसेच वस्तूंची यथायोग्य साठवणूक या गोष्टींचा समावेश होतो. संशोधनातून असेही दिसून आले आहे की महिलांच्या उपस्थितीमुळे तत्वशील वर्तनाचे प्रमाण वाढते, भ्रष्टाचार कमी होतो आणि उत्पादन व आर्थिक वृद्धी वाढते. या आत्तापर्यंत लपून राहिलेल्या अशा कौशल्याच्या माध्यमातून २०२०पर्यंत या क्षेत्राचा २० टक्के वाटा काबीज करण्याचे लक्ष्य आहे. त्याशिवाय महिलांचा या क्षेत्रातील वावर वाढविण्यावरही भर दिला जाणार आहे. त्यासाठी ‘हे दीदी’ आपली चार चाकी गाड्यांची कार्गो सेवा दाखल करत आहे. भारतात वस्तूंचे वितरण ज्या पद्धतीने केले जाते, त्याची पद्धती बदलण्याचा आमचा मानस आहे.”

यावेळी महाराष्ट्राच्या माजी परिवहन आयुक्त डॉ सोनिया सेठी (आयएएस), मुख्यमंत्री कार्यालयातील प्रवक्त्या श्रीमती श्वेता शालिनी, गोदरेज नेचर्स बास्केटच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमाडी अवनी दावदा आणि मॅड-ओ वॅटच्या प्रख्यात केशभूशाकार सपना भवनानी या मान्यवर महिला उपस्थित होत्या. चार चाकी कार्गो गाड्यांच्या पाहिल्या पाच महिला चालकांच्या चमूला या मान्यवर महिलांकडून हिरवा झेंडा दाखविण्यात आला.

महिला चालकांची तयारी करून घेण्यासाठी महिलांना ६० दिवसांचे कठोर असे प्रशिक्षण दिले जाते. प्रशिक्षित आणि प्रमाणित अशा महिला चालक आणि रायडर्सची एक मोठी फौज तयार करून आणि त्यांना रोजगार मिळवून देवून महिलांमध्ये कौशल्य निर्माण करण्याचे लक्ष्य आहे. त्यातून त्यांच्या जीवनावर सकारात्मक परिणाम घडवून आणत त्यांना अधिक पगाराच्य नोकरीमध्ये आणण्याचे काम केले जाते. त्यातून जेव्हा महिला प्रवासी त्यांचे स्वतःचे वाहन वापरत नसतात तेव्हा त्याच्या सुरक्षिततेची काळजीही घेतली जाते. आपल्या माननीय पंतप्रधानांनी महिलांसाठी सुरक्षित देश निर्माण करण्याचे एक स्वप्न पाहिले आहे. त्याच दृष्टीने हे प्रयत्न केले जात आहेत. २०१८ पर्यंत तब्बल १० हजार महिलांना प्रशिक्षित करून त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे लक्ष्य आहे. त्यातून ‘हे दीदी’ला स्थानिक पातळीवर सर्वात मोठी कंपनी व्हायचे आहे. त्यातून तिच्या केंद्रांच्या माध्यमातून तिला शहरांतर्गत दुरपल्ल्याची वितरण व्यवस्था निर्माण करायची आहे.  

महाराष्ट्राच्या माजी परिवहन आयुक्त डॉ सोनिया सेठी (आयएएस), म्हणाल्या, “आपल्या अर्थव्यवस्थेला वेगळा आकार देताना त्यातील बदलाच्या व्याख्या ठरविण्याच्या विविध पातळीवर महिलांचे असणे खूप गरजेचे आहे. सशक्त महिला ही कधीही अमर्याद अशा स्वरुपात शक्तिमान असते आणि तिच्या शक्तीला कोणत्याही सीमा असत नाहीत. लॉजीस्टीकच्या क्षेत्रात रेवती रॉय यांनी जी नेतृत्वशक्ती दाखवली आहे, त्यापाठी मी खंबीरपणे उभे राहण्याचे ठरवले. या क्षेत्रात झपाट्याने वाढणारी पण अध्याप छुप्या स्वरुपात असलेली संधी उपलब्ध आहे. त्यासाठी वैविध्य असणे गरजेचे आहे. ‘हे दीदी’ने नवीन परिमाणे साध्य करण्याची परंपरा कायम ठेवली आहे. त्यासाठी मळलेल्या वाटा नाकारण्याचे आणि महिलांना लॉजीस्टीकच्या आणि त्यातही अवजड लॉजीस्टीकच्या क्षेत्रात आणून सक्षम करण्याचे काम केले जात आहे.”
‘हे दीदी’ ही भारतातील सर्व महिला कार्यरत असलेली लॉजीस्टीक कंपनी आहे. महिलांना एकत्र आणून, त्यांची परिक्षा घेत त्यांना प्रशिक्षण देऊन चालक आणि रायडर म्हणून रोजगारक्षम बनविण्यावर कंपनीचा भर असतो. ही भारतातील पहिली सर्व महिला कार्यरत असलेली तत्काळ वितरण आणि कार्गो सेवा आहे. या सर्व महिला कार्यरत असलेल्या चमूचे प्रशिक्षण खासकरून ‘हे दीदी’ने केले आहे. (झॅफीरो लर्निंग प्रायव्हेट लीमिटेड (झेडएलपीएल)चा हा कक्ष आहे.) त्यातून महिलांचे सक्षमीकरण केले जाते व त्यासाठी त्यांना दुचाकी आणि चारचाकीचे प्रशिक्षण दिले जाते. चालक, रायडर, मृदू कौशल्य प्रशिक्षण देत त्यांना ‘हे दीदी’च्या माध्यमातून रोजगाराची हमी दिली जाते. या सर्व महिला कुटुंबातून आलेल्या असतात आणि बहुतेकवेळा त्यांचे उत्पन्न प्रतिवर्ष १ लाख रुपयांपेक्षाही कमी असते. त्यामुळे त्या दारिद्र्यरेषेखाली असतात. त्यांना रोजगार उपलब्ध करून देत त्यांचे सक्षमीकरण केले जाते आणि त्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न वाढविले जाते. त्यातून त्यांच्यावरील दारिद्र्यरेषेखालील कुटुंबाचा शिक्का पुसला जातो. ‘हे दीदी’चे लक्ष्य हे रोजगार देणाऱ्या कंपन्यांना कुशल कामगार व विश्वासू वितरक कर्मचारी तत्काळ मिळवून देण्याचेही असते.

श्रीमती रॉय पुढे म्हणाल्या, “२०२० पर्यंत १० हजार महिलांचे प्रशिक्षण करण्याचे लक्ष्य डोळ्यांसमोर ठेवून ‘हे दीदी’ला स्थानिक पातळीवर सर्वाधिक सेवा देणारी कंपनी व्हायचे आहे. त्यासाठी ती लांब पल्ल्याच्या सेवा आणि पार्सल वितरण सेवा संपूर्ण शहरामध्ये देवू करते. त्यासाठी ती स्पतःच्या हब आणि स्पोक मॉडेलचा वापर करते. ‘हे दीदी’चे अंतिम साध्य हे महिलांचे सक्षमीकरण हे आहे. महिला या दारिद्र्यरेषेखालील कुटुंबातून येतात. ‘हे दीदी’ त्यांना कौशल्य विकासाच्या माध्यमातून सक्षम करते आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम करते आणि मानसन्मान मिळवून देते. त्यांना स्वतःच्या गाड्या घेण्यासाठी कर्ज मिळवून देण्यासाठी मदत केली जाते आणि त्यातून त्यांना कुशल आणि सक्षम आयुष्य उभारता येते. ‘हे दीदी’चे वैशिष्ट्य हे मानवी संसाधनाची कडी उभारून रोजगार मिळविणे हे आहे. त्यासाठी ३०-४५ दिवसांच्या प्रशिक्षणाची योजना आखली जाते. त्यातून शहरी  भागातील महिला बेरोजगारी कमी केली जाते. सध्या आमच्याकडे २००० महिलांची नोंदणी झाली असून त्या सध्या विविध टप्प्यांवर प्रशिक्षण घेत आहेत. त्याशिवाय मुंबई, बंगळूरू, नागपूर आणि पुणे या शहरांमध्ये रायडर म्हणून काम करत आहेत. सध्या आम्ही प्रती वितरण (अॅमॅझॉनसाठी) आणि व्यवस्थापन टक्केवारी मॉडेल (इ-कॉम एक्स्प्रेस) या मॉडेलवर काम करतो. त्याशिवाय चालू वृद्धी टप्प्यावर निश्चित उत्पन्न मॉडेलच्या माध्यमातूनही काम करतो.”

‘हे दीदी’ने आपल्या भागीदारी कंपन्यासाठी आत्तापर्यंत २५०,००० पार्सल्सचे वितरण केले आहे. अॅमॅझॉन, द करी ब्रदर्स, बोहरी किचन, सबवे, हर्बीवोर, शॉपहॉप, ब्रिजवासी, पिझ्झा हट, इ-कॉम एक्स्प्रेस, झिपटाऊन, स्पाइसबॉक्स, एव्हरीडे गुर्मेट कीचन, पिटाबर्ग, बर्डीज, स्नॅकबॉक्सवाला, गोदरेज नेचर्स बास्केट, फ्रेश इंडिया ऑर्गनिक्स या भागीदारी कंपन्याचा त्यांत समवेश आहे. कंपनीच्या काही पूर्वीच्या भागीदारी क्लायंटमध्ये पिझ्झा हट, सबवे, हर्बीव्होर,झिप टाऊन, ब्रिजवासी, शॉपहॉप आणि हजारो रिटेल ग्राहकांचा समावेश आहे. 

Comments

Popular posts from this blog

‘हावरे पिनॅकल’ स्वप्नपूर्ती सोहळा दिमाखात संपन्न!

**तोंडाला पुसणाऱ्या सरकारविरोधात गांधी जयंती दिनी आत्मक्लेश आंदोलन*

अच्युत पालव यांच्या `मास्टर क्लास'मध्ये अमेरिकन गिरवणार देवनागरी सुलेखनाचा कित्ता