होंडा कार्स इंडियाने जुलै २०१८ च्या विक्रीमध्ये १७ टक्के वृद्धी

होंडा कार्स इंडियाने जुलै २०१८ च्या विक्रीमध्ये १७ टक्के वृद्धी 
ऑल न्यू अमेझने मासिक विक्रीमध्ये नवीन उच्चांकाची नोंद केली

होंडा कार्स इंडिया लिमिटेड (एचसीआयएल) या भारतातल्या प्रवासी कार्स बनवणाऱ्या आघाडीच्या कंपनीने जुलै २०१८ मध्ये १९९७० युनिट्स एवढी मासिक स्थानिक विक्री नोंदविली आहे जी मागील वर्षी १७०८५ इतकी होती. मागील वर्षाच्या तुलनेत विक्रीमध्ये १७ % नी वाढ झाली आहे.
ऑल न्यू अमेझने विक्री मध्ये जोरदार कामगिरी केली आणि एकूण १०१८० युनिट्सची विक्री नोंदविली आणि होंडा कार्स इंडिया लिमिटेडच्या इतिहासामध्ये सर्वात जास्त मासिक विक्री झालेली कार ठरली आहे. एचसीआयएल ने जुलै महिन्यात ६३८ युनिट्सची निर्यात केली.
या आथिर्क वर्षात एचसीआयएल ने आपला सशक्त विक्रीदर कायम राखत एप्रिल -जुलै २०१८ दरम्यान ६२५७९ युनिट्सची विक्री केली आहे. हि विक्री एप्रिल - जुलै २०१७ या कालावधी मधील ५५६४७ युनिट्स विक्रीच्या तुलनेत १२.५ टक्क्यांनी जास्त आहे.

Comments

Popular posts from this blog

‘हावरे पिनॅकल’ स्वप्नपूर्ती सोहळा दिमाखात संपन्न!

**तोंडाला पुसणाऱ्या सरकारविरोधात गांधी जयंती दिनी आत्मक्लेश आंदोलन*

अच्युत पालव यांच्या `मास्टर क्लास'मध्ये अमेरिकन गिरवणार देवनागरी सुलेखनाचा कित्ता