यूएई एक्स्चेंज (इंडिया) म्हणजेच आता यूनिमनी

यूएई एक्स्चेंज (इंडियाम्हणजेच आता यूनिमनी
  • विविध सेवा प्रदान करणारी एक संपूर्णपणे नॉन-बँकिंग वित्तीय सेवा कंपनी म्हणून ओळख निर्माण करणार
  • क्षेत्रातील दिग्गज श्री. अमित सक्सेना यांची भारतातील कार्यचलनाचे एमडी आणि सीईओ म्हणून नियुक्ती

यूएई एक्स्चेंज या आघाडीच्या अशा जागतिक मनी ट्रांस्फरपेमेंट्स आणि कर्जपुरवठा ब्रँडच्या पुनर्रचनेचा एक भाग म्हणून त्यांच्या भारतातील शाखेचे नामकरणयूनिमनी’ असे करण्यात आले आहे. 

विविध सेवा प्रदान करणारी एक संपूर्णपणे नॉन-बँकिंग वित्तीय सेवा कंपनी (एनबीएफसीम्हणून अस्तित्व मिळवण्याचा यूनिमनीचा मानस आहेयासाठी त्यांच्या सेवांच्या सूचीमध्ये विविध प्रकारच्या वित्तीय सेवा ग्राहकांसाठी आणि कंपन्यांसाठी समाविष्ट करण्यात येतीलयात लघुउद्योग कर्जेगृहकर्जेग्राहकोपयोगी कर्जे इत्यादींचा समावेश असेल.

भारतातील या परिवर्तनाचे नेतृत्व श्रीअमित सक्सेना यांच्याकडे सोपवण्यात आले असून ते नुकतेच व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी या नात्याने यूनिमनी इंडिया येथे रुजू झालेउद्योग क्षेत्रातील एक दिग्गज असलेले श्रीसक्सेना यांच्याकडे कार्वी आणि स्टॅंडर्ड चार्टर्ड एनबीएफसी या कंपन्या स्थापित करण्याचा अनुभव आहेशिवाय सिटीग्रूपमध्ये कन्झ्युमर फायनान्स क्षेत्रातही त्यांनी काम केले आहेबीआयटीएस पिलानी आणि आयआयएम लखनौ याबरोबरच हार्वर्ड बिझिनेस स्कूलचेही ते माजी विद्यार्थी आहेत.

यूनिमनी हे नाव युनिव्हर्सल मनी या शब्दसमुहावर बेतलेले असूनही कंपनी वित्तीय सेवाक्षेत्रात एक नवा प्रयोगशील दृष्टिकोन घेऊन येत आहेजो भौगोलिक आणि चलनाधारित सीमारेषा ओलांडूनएका सुनियमित नेटवर्कच्या बळावर ग्राहकांना त्यांच्या वित्तविषयक महत्वाकांक्षा पूर्ण करण्यास मदत करेलसध्या भारतभरात यूनिमनीच्या ३७६ शाखा आणि ३५०० कर्मचारी आहेत

यूएई एक्स्चेंज या ब्रँडच्या जागतिक पुनर्रचनेचा एक भाग म्हणून फिनेब्लर’ ची निर्मिती यूएई-स्थित आणि सुप्रसिद्ध असे भारतीय व्यावसायिक आणि लोकोपकारी कार्य करणारे डॉ.बावागुथू रघुराम शेट्टी यांनी केलीया मंचाखाली डॉशेट्टी यांचे जागतिक पातळीवरील वित्तीय सेवा ब्रांड्स एकत्र आले आहेतयात यूनिमनीयूएई एक्स्चेंज, ट्रॅव्हलेक्स, एक्सप्रेस मनी आणि रेमिट टू इंडिया हे ब्रँड एका कंपनीच्या छत्राखाली आले आहेत.

या प्रसंगी बोलताना फिनेब्लरचे संस्थापक आणि अध्यक्ष श्रीबीआर.शेट्टी म्हणाले मागील दशकात भारताने बहुपेडी असा वित्तीय विकास साधला आहे आणि त्याचबरोबर आम्हालाही आमचा विकास साधण्याची संधी दिली आहेपण देशाची बहुसंख्य लोकसंख्या अजूनही भांडवलाच्या पुरेशा उपलब्धतेपायी झगडत आहेयूनिमनी या नव्या ब्रँडद्वारे आम्ही तंत्रज्ञान आणि प्रयोगशीलता राबवून  ही दरी कमी करण्यासाठी आणि त्यांना आर्थिक स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी कटिबद्ध आहोत.

फिनेब्लरचे कार्यकारी संचालक आणि समुहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीप्रोमोथ मंघट म्हणाले निरनिराळ्या देशांमधील व्यापार आणि वित्तव्यवस्थांमध्ये झपाट्याने बदल आणि सुधारणा होताना आम्ही बघत आहोतभारत हे या बाजारपेठेतील प्रमुख नाव आहे आणि त्याच्या निरनिराळ्या क्षेत्रांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी आमचा समूह तयार आहेनव्या योजना,विकासप्रकल्प आणि निरनिराळ्या स्थानिक मार्गांनी क्षमताविकास करण्यासठी आम्ही सुयोग्य संस्थांशी संबंध प्रस्थापित करत आहोतरिटेल आणि डिजिटल क्षेत्रात भक्कम पाय रोवण्यासाठी आणि प्रचंड नेटवर्कद्वारे आणि तंत्रज्ञानाद्वारे आम्ही ग्राहकांना एक सुखद अनुभव देण्यासाठी तयार आहोतआमच्या जागतिक आणि स्थानिक महत्वाकांक्षा पूर्ण करण्यात आणि आमचे वित्तीय स्वातंत्र्याचे ध्येय पूर्ण करण्यात भारत आम्हाला संपूर्ण सहकार्य करेल यात आम्हाला शंका नाही.

त्यांच्या मार्गाचा आराखडा तयार करताना यूनिमनी इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीअमित सक्सेना म्हणाले भारतातील मध्यमवर्गातील १५ कोटी कुटुंबांना, छोट्या व्यावसायिकांना आणि इतर कर्जदारांना म्हणजेच मध्य भारत’ किंवा 'भारत२या क्षेत्रात उच्च दर्जाच्या वित्तीय सेवा आम्हाला पुरवायच्या आहेततंत्रज्ञानामुळे आणिकुशल वितरणामुळे आमच्या आकर्षक आणि किफायतशीर योजना सहज उपलब्ध होतीलयूनिमनीला त्याच्या ठरलेल्या मार्गावर अग्रेसर करण्यासाठी आम्ही पूर्णपणे तयार आहोतपुढील काही वर्षात आमच्या कर्जयोजना किमान ८ पट वाढवण्याचा आणि आमचे अस्तित्व डिजिटल तसेच प्रत्यक्ष नेटवर्कद्वारे भक्कम करण्याचा आमचा मानस आहे.

Comments

Popular posts from this blog

Indegene acquires Trilogy Writing & Consulting GmbH, a medical writing consultancy

TiEcon Mumbai 2023, brilliantly showcased revolutionary ideas & impactful solutions to build an Anti-Fragile and Sustainable India

REC DECLARES ITS FINANCIAL RESULTS FOR Q2 & H1 FY24