प्रीमियम स्मार्टफोन ब्रॅण्ड मध्ये ‘वनप्लस’चे वर्चस्व

प्रीमियम स्मार्टफोन ब्रॅण्ड  मध्ये वनप्लसचे वर्चस्व

काऊंटरपॉईंट मार्केट मॉनिटर सर्व्हिस यांनी केलेल्या नवीनतम रीसर्चनुसार२०१८च्या दुस-या तिमाहीमध्ये सर्वाधिक वेगाने (२८४ टक्के) वाढणारा स्मार्टफोन ब्रॅण्ड म्हणून वनप्लसचा उदय झाला असून त्यामुळे प्रथमच प्रिमियम सेगमेंटमध्ये (३० हजार रुपयांपेक्षा जास्त किंमतीच्या स्मार्टफोन्सच्या बाजारपेठेत) त्याने आघाडी घेतली आहे. प्रिमियम सेगमेंटमध्ये वनप्लस हाच सर्वाधिक विकला गेलेला स्मार्टफोन होतात्यामुळे संपूर्ण तिमाहीत तो निर्विवाद आघाडीवर राहिलाआणि विशेष म्हणजेसॅमसंग आणि अॅपललाही त्याने मागे टाकले. सध्या बाजारपेठेतला ४० टक्के हिस्सा वनप्लसने व्यापला असून सॅमसंग आणि अॅपल यांचा हिस्सा अनुक्रमे ३४ टक्के आणि १४ टक्के आहे. 

वनप्लसचे संस्थापक आणि सीईओ (मुख्य कार्यकारी अधिकारी) पेते लाऊ यांनी भारतीय बाजारपेठेसंबंधीचे त्यांचे विचार फोरम पोस्टमध्ये व्यक्त केले. ते म्हणतात, आमच्या कम्युनिटीने दर्शवलेली उत्कटता आणि आमच्या भागीदारांनी आमच्यावर दाखवलेला विश्वास यांमुळे मी खरोखरच नम्र झालो आहे. जागतिक दर्जाची उत्पादनं यशस्वीपणे बनवण्यासाठी भारत हा आमचा बेंचमार्क आहे. भारतातली ही तरूण बाजारपेठ आता लवकरच आमचे दुसरे होमग्राऊंड आणि प्रोडक्ट इनोव्हेशनसाठीचे एक केंद्र बनण्यासाठी सज्ज झाली आहे. पहिल्यांदाच बाजारपेठेतील ४० टक्क्यांच्या हिश्शासह वनप्लस हा सर्वात मोठ्या-पहिल्या पाच स्मार्टफोन ब्रॅण्डसच्या प्रतिष्ठीत गटात समाविष्ट झाला आहे, असं काऊंटरपॉईंट रीसर्चच्या आयओटी, मोबाइल आणि इकोसिस्टिम्सचे भागीदार व संशोधन संचालक नील शाह यांनी सांगितले.

वनप्लस हाच प्रीमियम सेगमेंटमध्ये सर्वाधिक वेगाने वाढणारा (+४४६ टक्के) ब्रॅण्ड होता, जेव्हा की अॅपल आणि सॅमसंगच्या शिपमेंट्समध्ये ईयर ओव्हर ईयर (YoY) घसरण झाली आहे. वनप्लस आता महत्वाच्या शहरांमध्ये त्याचे ऑफलाइन आणि एक्सक्लुसिव्ह स्टोअर्स लाँच करून स्वत:चे विक्रीचे पॉईंट्स वाढवत आहे. चालू वर्ष २०१८ आणि त्यापुढच्या काळात सर्वसाधारण स्मार्टफोनच्या बाजारपेठेपेक्षा प्रीमियम सेगमेंटची बाजारपेठ अधिक वेगाने वाढण्याच्या अंदाजामुळे वनप्लस ब्रॅण्ड हा स्टोअर्समुळे अधिक वापरकर्त्यांपर्यंत पोहोचू शकेल.

Comments

Popular posts from this blog

‘हावरे पिनॅकल’ स्वप्नपूर्ती सोहळा दिमाखात संपन्न!

**तोंडाला पुसणाऱ्या सरकारविरोधात गांधी जयंती दिनी आत्मक्लेश आंदोलन*

अच्युत पालव यांच्या `मास्टर क्लास'मध्ये अमेरिकन गिरवणार देवनागरी सुलेखनाचा कित्ता