पियाजिओ’ ने भारतात गाठला महत्वपूर्ण टप्पा; देशात २५ लाखावे चे छोटे व्यापारी वाहन सादर केले

पियाजिओ’ ने भारतात गाठला महत्वपूर्ण टप्पा;
देशात २५ लाखावे चे छोटे व्यापारी वाहन सादर केले
·                या लक्षणीय प्रसंगी कंपनीतर्फे ग्राहकांसाठी एकमेवाद्वितीय असा वाहन वॉरंटी कार्यक्रम आणि विमा उपक्रम जाहीर
पियाजिओ व्हेईकल्स प्रायव्हेट लिमिटेड (पीव्हीपीएलया इटालियन पियाजिओ समूहाची (दुचाकी क्षेत्रातील युरोपीयन लीडर१००उपकंपनी आणि छोट्या व्यापारी वाहनांची निर्मिती करणाऱ्या भारतातील आघाडीच्या उत्पादक कंपनीतर्फे आज एक ऐतिहासिक मैलाचा टप्पा साजरा करण्यात आलाया प्रसंगी कंपनीने आपले या देशातील २५ लाखाचे छोटे व्यापारी वाहन (स्मॉल कमर्शीअल व्हिइकल-एससीव्हीबाजारात सादर केलेबारामती येथील पियाजिओच्या (आपे एक्स्ट्रा एलडीएक्सजागतिक दर्जाच्या उत्पादन प्रकल्पामधील असेंब्ली लाईनवरून हे एससीव्ही वाहन बाहेर पडले आहेशेवटच्या टप्प्यातील दळणवळण आणि परिवहन क्षेत्रात असलेले कंपनीचे आघाडीचे स्थान या मैलाच्या टप्प्यामुळे पुन्हा अधोरेखित झाले आहेलास्ट माईल ट्रान्सपोर्टेशन (शेवटच्या टप्प्यातील दळणवळण आणि परिवहनहे पियाजिओचे भारतीय बाजारपेठेतील धोरणामागील तत्त्वज्ञान आहे.

या लक्षणीय प्रसंगी पियाजिओने आकर्षक ग्राहककेंद्री उपक्रमांच्या वर्षाव ची ही घोषणा केलीत्या अंतर्गत द सुपर वॉरंटी प्रोग्रॅम’ आणि व्यक्तिगत अपघात विमा कार्यक्रम’ असे दोन कार्यक्रम आपल्या ग्राहकांना अधिक मूल्य मिळवून देण्यासाठी जाहीर करण्यात आले आहेत.
ग्राहकांच्या सतत बदलणाऱ्या गरजांची पूर्तता करण्याच्या आपल्या बांधिलकीच्या आणि लास्ट माईल ट्रान्सपोर्टेशन विभागामध्ये अद्वितीय उपाययोजना पुरविण्याच्या पियाजिओ मूलभूत तत्वज्ञानाला यापुढेही कायम राखताना कंपनीतर्फे एप सीइनजी एलपीजी वाहनांची नवी मालिका सादर करण्यात आलेली आहे.
२५ लाखा चे वाहन बाजारात आणण्याचा महत्वाचा टप्पा साजरा करण्यासाठी आणि ग्राहकांसोबत आपले नातेसंबंध अधिक दृढ करण्यासाठी पियाजिओतर्फे आपल्या ग्राहकांसाठी एकमेवाद्वितीय असा वॉरंटी आणि विमा कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला आहेउद्योगक्षेत्रातील अशा प्रकारच्या पहिल्याच सुपर वॉरंटी’ कार्यक्रमांतर्गत एप डीझेल तिचाकी वाहन खरेदी करणाऱ्या ग्राहकांना ४२ महिने किंवा १.२ लाख किलोमीटर (जे आधी साध्य होईल तेसाठी वॉरंटीचा लाभ मिळणार आहे. एप सीएनजी एलपीजी पेट्रोल तिचाकी वाहनांसाठी ३६ महिने किंवा १ लाख किलोमीटर (जे आधी साध्य होईल तेसाठी वॉरंटीचा लाभ लागू होणार आहेउद्योगक्षेत्रातील सर्वोत्तम उपायोजना पुरविण्याची आपली परंपरा कायम राखणारे हे दोन्ही वॉरंटी उपक्रम या उद्योगक्षेत्रात आपापल्या श्रेणीतील सर्वोत्कृष्ट आहेत. आपल्या ग्राहकांना अधिक मूल्य मिळावे यासाठी आजपासून तिचाकी वाहन खरेदी करणाऱ्या प्रत्येक पियाजिओ ग्राहकांना एक लाख रुपयांपर्यंतच्या वैयक्तिक अपघात विमा संरक्षणाचे कवच बहाल करण्यात येणार आहे.
पियाजिओ व्हेईकल्स प्रायव्हेट लिमिटेडतर्फे यावेळी भारतीय बाजारपेठेत तिचाकी वाहन श्रेणीत एप सीएनजी एलपीजी पेट्रोल वाहनांची नवी मालिका देखील सादर करण्यात आलीनवीन सीएनजी एलपीजी वाहन हा पियाजिओ कंपनीचा धोरणात्मक निर्णय असून त्यायोगे आपल्या लास्ट माईल ट्रान्सपोर्टेशन विभागामध्ये अद्वितीय उपाययोजना पुरविण्याच्या आपल्या बांधिलकीला कंपनीने पुन्हा अधोरेखीत केले आहे. एप एक्सट्रा एलडीएक्स आणि एप ऑटो डीएक्स हे कंपनीच्या नवीन वॉटर कूल्ड इंजिन तंत्रज्ञान मालिकेचा भाग आहेत. एपची ही वॉटर कूल्ड इंजिन असलेली मॉडेल्स उद्योगक्षेत्रातील एकमेवाद्वितीय अशी असून शक्तीपिकअपमायलेज आणि देखभाल या निकषांवर सर्वोत्तम कामगिरी करून दाखविणारी आहेतवाहनांची नवी मालिका व्यापारी वाहन परिवहन उपयोजन क्षेत्रातील विशेषतः भारतातील शहरांतर्गत प्रवासाला साजेशी वाढत्या मागणीची पूर्तता करणारी आहेत आणि त्यांना नव्या पिढीची अद्ययावत पर्यावरणपूरक इंजिन्स तसेच अत्याधुनिक तांत्रिक वैशिष्ट्यांची जोड देण्यात आलेली आहे.
या प्रसंगी बोलताना पियाजिओ व्हिईकल्स प्रायव्हेट लिमिटेडचे अध्यक्ष श्रीरवी चोप्रा म्हणाले, “आम्ही बाजारपेठ तयार केलीतिची प्रगती घडवून आणली आणि लास्ट माईल कनेक्टीव्हिटी श्रेणीत आम्ही बाजारपेठेवर अधिराज्य गाजवत आहोत२५ लाखावे वाहन बाजारात उतरणे हे ग्राहकांच्या पियाजिओ वाहनाच्या टिकाऊपणावर असलेल्या विश्वासार्हतेचे द्योतक आहे.पियाजिओची वाहने ही केवळ गाड्या नसून या देशाच्या प्रगतीसाठी अत्यंत महत्वपूर्ण असलेल्या स्वयंरोजगार निर्मिती या घटकाचा ही वाहने एक भक्कम स्त्रोत आहेतआगामी काळात आमच्यासाठी येथे अनेकविध संधी असल्याचे आमच्या दृष्टीक्षेपात असून पियाजिओच्या जागतिक व्यवसायात भारतीय बाजारपेठेला नजिकच्या भविष्यकाळात अधिक महत्वपूर्ण भूमिका मिळणार असणार आहे.”
ग्राहककेंद्री उपक्रमांची घोषणा करताना पियाजिओ व्हिईकल्स प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीदिएगो ग्राफी म्हणाले, “आमच्या ग्राहकांना सुपर वॉरंटीसारखी या श्रेणीतील सर्वोत्तम भेट पुरवत राहणे याकडे आमचा कायम कटाक्ष असतोया वॉरंटीमुळे ग्राहकांचा कामकाजी खर्च कमी होणार असून त्यांची उत्पन्न क्षमता वाढीस लागणार आहेत्याजोडीला वैयक्तिक अपघात विमा संरक्षण अनपेक्षित विपरीत परिस्थितीमध्ये आमच्या चालक ग्राहकांच्या कुटुंबियांना अत्यंत निकडीचे असलेले पाठबळ पुरविणार आहे.”
कंपनीने सादर केलेल्या पर्यायी इंधनावरील नवीन वाहनांबाबत बोलताना श्रीग्राफी म्हणालेपियाजिओचे बाजारपेठेतील आघाडीचे स्थान अधिक भक्कम करणे आणि ग्राहकांना अधिक विस्तृत पर्याय उपलब्ध करून देणे याकडे कंपनीचा कटाक्ष आहेपर्यायी इंधन तंत्रावर भर देण्याचे प्रमाण देशात दररोज वाढत आहे आणि ते लक्षात घेऊनच आम्ही ही बाजारपेठेच्या गरजांची पूर्तता करणारी पर्यायी इंधनावर चालणाऱ्या वाहनांची सुधारित मालिका सादर केली आहेग्राहक उपक्रम आणि पर्यायी इंधनावरील सुधारित वाहनांची मालिका हे पियाजिओच्या धोरणाचा एक भाग असून त्यानुसार छोट्या व्यापारी वाहनांच्या उद्योगक्षेत्रात पियाजिओचे स्थान अधिक समन्वित आणि सक्षम बनणार आहे.

Comments

Popular posts from this blog

TiEcon Mumbai 2023, brilliantly showcased revolutionary ideas & impactful solutions to build an Anti-Fragile and Sustainable India

REC DECLARES ITS FINANCIAL RESULTS FOR Q2 & H1 FY24

Liberty General Insurance Launches Dedicated 24/7 Helpline <+91-9324968286> for the Victims of Odisha Train Tragedy