आयएपी आणि टीएनएआय मान्यताप्राप्त ‘बेबी केअर’ उत्पादन श्रेणी ‘जॉनसन्स’ तर्फे सादर

आयएपी आणि टीएनएआय मान्यताप्राप्त ‘बेबी केअर’ उत्पादन श्रेणी ‘जॉनसन्स’ तर्फे सादर
‘सौम्यतेची निवड’ ब्रीदवाक्यासह पालक व बाळांना सुरक्षेची हमी देत ‘जॉनसन्स’ ची नवी उत्पादन श्रेणी

 आपल्या बाळाची उत्तम काळजी घेण्यास जॉनसन्स कटिबध्द आहे. नव्याने आई झालेल्या स्त्रियांच्या नेमक्या गरजा व अपेक्षा जॉनसन्स कंपनी चांगल्या प्रकारे ओळखते. बाळाचा जन्म झाल्या दिवसापासून त्याच्या काळजीची व संरक्षणाची जबाबदारी जणू जॉनसन्स घेते, हा विश्वास जगभरातील पालक, डॉक्टर, परिचालिका व आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांना गेल्या अनेक पिढ्यांपासून आहे. जगभरातील या पालकांच्या काही मागण्यांची पूर्तता करण्यासाठी ‘जॉनसन्स’ने आपल्या काही उत्पा दनांमध्ये काही घटक मिसळून सुधारणा केल्या आहेत. तसेच नवीन स्वरुपाचे पॅकेजिंगही केले आहे. त्यामुळे बाळांची काळजी अधिक चांगल्या प्रकारे घेतली जाईल.

‘जॉनसन अॅन्ड जॉनसन’ च्या ‘बेबी केअर’ विभागाच्या जागतिक प्रमुख दीप्ता खन्ना म्हणाल्या, की ‘बेबी केअर’ च्या सुविधा पुरवणे एक कला आहे, तसेच ते शास्त्रही आहे. पालकांच्या दृष्टीकोनातून ‘बेबी केअर’ मधील कला चांगल्या प्रकारे समजून घेता येते. त्यामुळेच बाळाच्या त्वचेसाठी पालक जे उत्पादन निवडतील, त्याबद्दल त्यांची पूर्ण खात्री असायला हवी, असे आम्हाला वाटते. ही उत्पादने पूर्णपणे पारदर्शी असली तरच हे शक्य होईल, हे लक्षात घेऊन उत्पादनातील सर्व घटक द्रव्यांची माहिती आम्ही बाटल्यांवर छापायला सुरुवात केली आहे ... अगदी उत्पादनातील सुगंध कोणत्या घटकाने निर्माण झाला, ते सुध्दा! ‘पंप पॅक्स’ सारखी उत्पादने एका हातात धरून वापरता येणे, ‘पॅकेजिंग’ वर ‘सेफ्टी लॉक’ची सुविधा असणे, यांसारख्या नावीन्यपूर्ण गोष्टी आम्ही अमलात आणल्या आहेत. बाळाची काळजी सुरक्षितपणे व सहजगत्या घेता यावी, याचा आम्ही यातून विचार केला आहे.

सुमारे साडेपाच लाख जणांवर चाचण्या घेतल्यानंतरच ही नवीन उत्पादने सादर करण्यात आली आहेत. नव्याने बनवलेली उत्पादने ही बाळाची त्वचा केवळ स्वच्छ व ओलसर करण्यासाठीच उपयोगी नाहीत, तर प्रत्येक क्षणी मातेच्या हातांनी बाळाला मायेचा स्पर्श जाणवण्यासाठी व त्यांच्यातील बंध बळकट करण्यासाठीही उपयोगी आहेत.

‘जॉनसन अॅन्ड जॉनसन इंडिया’ चे व्यवस्थापकीय संचालक विकास श्रीनिवास म्हणाले, की बाळासाठी जे काही उत्कृष्ट असेल, ते त्याला मिळवून देण्यासाठी जॉनसन्स कंपनी मागेपुढे पाहात नाही. ‘सौम्यतेची निवड’ (चूज जेंटल) हे आमचे निव्वऴ घोषवाक्य नसून बाळाला सौम्यपणे व सुरक्षितपणे हाताळण्यासाठी पालकांना आम्ही देत असलेली हमी आहे. याकरीता ‘जॉनसन्स’ चा नेहमीचा सर्वोच्च दर्जा पणाला लावण्यात आला आहे. जगभरातील अनेक पालकांची मते विचारात घेतल्यावंतर आम्ही उत्पादनांमध्ये आमूलाग्र बदल केले आहेत व एक नवीनच परिमाण निर्माण केले आहे.

घटक मूलद्रव्यांच्या संख्येत कपात:- उत्पादनांमध्ये भरमसाट घटक द्रव्यांची संख्या असण्यापेक्षा आवश्यक तितकीच ती ठेवणे श्रेयस्कर आहे, हे लक्षात घेऊन आम्ही या घटकद्रव्यांची संख्या निम्मी केली आहेत. पॅराबेन्स, थॅलेट्स, फॉरमॅल्डिहाईड यांसारखी प्रीझर्व्हेटिव्हज आणि सल्फेट यांचा वापर पूर्णपणे थांबवला आहे. सर्व जगात अतिशय लोकप्रिय असलेला ‘जॉनसन्स’चा शॅम्पूदेखील त्याच्या नेहमीच्या सोनेरी रंगात बनविण्याएेवजी पारदर्शी स्वच्छ रंगात बनवून तशाच पारदर्शक पिवळ्या रंगाच्या बाटलीतून सादर करण्यात आला आहे.

सुधारीत अनुभूती :- ‘जॉनसन्स’ चे प्रत्येक उत्पादन आता अधिक सौम्य आणि पालकांना वेगळी अनुभूती देणारे असेल. जास्त फेस येणारा परंतु त्वरीत धुतला जाणारा शॅम्पू, केसांची निगा राखण्यासाठी सुधारीत स्वरुपाचे कंडिशनिंग, तसेच त्वचेत लवकर मुरणारी आणि तेलकटपणा नसलेली हलक्या स्वरुपाची लोशन्स ही नवीन श्रेणीची वैशिष्ट्ये आहेत.

पालकांना व्यवस्थित हाताळता येईल, असे पॅकेजिंग :- बाळाला अंघोळ घालताना पालकांना येणारा नेहमीचा अनुभव म्हणजे बाळाचे अंग निसरडे होणे. नवीन उत्पादनांचे आकार व पॅकेजिंग हे नावीन्यपूर्ण पध्दतीने बनवून, या उत्पादनांच्या बाटल्या एका हातात धरून बाळाला अंघोळ घालता येईल, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे दुसरा हात मोकळा राहून त्या हातात बाळाला सुरक्षितपणे सांभाळणे पालकांना शक्य होईल.

जागतिक गुणवत्ता :- ‘जॉनसन्स’ ची उत्पादने १०० % सौम्य असतात. त्यांतील सुगंध निर्माण करणारी घटक द्रव्येदेखील ‘इंटरनॅशनल फ्रेग्रन्स असोसिएशन’ च्या निकषांनुसार असतात. तसेच त्यांच्यावर सुरक्षा विषयक ५ टप्प्यांची प्रक्रिया झालेली असते. 

सुगंधित उत्पादनांमध्ये २५% कमी प्रमाणात सुगंधित द्रव्ये असून ती अतिशय शुध्द स्वरुपात असतील, याची खात्री केली जाते. 

सुगंधित द्रव्यांमध्ये घातक द्रव्ये अजिबात नसतील वा नंतरही निर्माण होणार नाहीत, याची काळजी घेतली जाते.

‘बेबी केअर’ च्या क्षेत्रात काही निश्चित मापडंद निर्माण करण्याच्या दृष्टीने ‘जॉनसन्स’ मध्ये काम करण्यात येते. ‘बेबी केअर’ साठी सर्वोत्कृष्ट दर्जा उपलब्ध करून देण्याच्याच उद्देशाने सौम्यतेची निवड या श्रेणीची निर्मिती झाली आहे. आमच्या संशोधनामध्ये शास्त्रीय पुरावा महत्वाचा मानला जातो. बाऴाच्या त्वचेचे मूलभूत ज्ञान मिळवण्यायाठी उपलब्ध असलेल्या शास्त्रीय माहितीमध्ये आम्ही मोलाची भर घातली आहे. आमच्या उत्पादनांमधील प्रत्येक घटक द्रव्याची चाचणी १२ महिने इतक्या कालावधीसाठी घेतली जाते. त्यानंतरच ती द्रव्ये सुरक्षित म्हणून गणली जातात, असे ‘जॉनसन अॅन्ड जॉनसन’ च्या संशोधन व विकास विभागाचे वरिष्ठ संचालक राम शुक्ला यांनी सांगितले.

‘जॉनसन्स’ने केलेल्या संशोधना मुळे बाळाच्या त्वचेच्या निगेबाबत नवीन मापदंड निर्माण झाले आहेत. ‘इंडियन अकॅडमी ऑफ पेडिअॅट्रिक्स’ (आयएपी) आणि ‘ट्रेन्ड नर्सेस असोसिएशन ऑफ इंडिया’ (टीएनएआय) यांनी ते मान्य केले आहेत. ‘जॉनसन्स’चे प्रत्येक उत्पादन हे अमेरिकन व युरोपीय निकषांवर खरे उतरते.

Comments

Popular posts from this blog

‘हावरे पिनॅकल’ स्वप्नपूर्ती सोहळा दिमाखात संपन्न!

**तोंडाला पुसणाऱ्या सरकारविरोधात गांधी जयंती दिनी आत्मक्लेश आंदोलन*

अच्युत पालव यांच्या `मास्टर क्लास'मध्ये अमेरिकन गिरवणार देवनागरी सुलेखनाचा कित्ता