सीजीपीएलला कर्मचा-यांचे आरोग्‍य व सुरक्षिततेसाठी फेम एक्‍सलन्‍स सेफ्टी अवॉर्डमध्‍ये मिळाला 'गोल्‍ड' पुरस्‍कार


सीजीपीएलला कर्मचा-यांचे आरोग्‍य व सुरक्षिततेसाठी फेम एक्‍सलन्‍स सेफ्टी अवॉर्डमध्‍ये मिळाला 'गोल्‍ड' पुरस्‍कार 
कोस्‍टल गुजरात पॉवर लि. (सीजीपीएल) या भारताची सर्वात मोठी एकीकृत वीज कंपनी टाटा पॉवरच्‍या पूर्णत: मालकीच्‍या उपकंपनीला सर्वोत्‍तम सुरक्षा पद्धती आणि कामाच्‍या ठिकाणी सुरक्षितताविषयक नियमांची अमलबजावणी करण्‍यासाठी फेम एक्‍सलन्‍स सेफ्टी अवॉर्ड (गोल्‍ड)सह सन्‍मानित करण्‍यात आले आहे. २९ जुलै २०१८ रोजी डेहरादूनमध्‍ये आयोजित करण्‍यात आलेल्‍या एका समारोहामध्‍ये सीजीपीएलच्‍या अग्निशमन व सुरक्षा विभागाचे प्रमुख श्री. प्रमोद कुमार सिंग यांनी कंपनीच्‍या वतीने पुरस्‍कार स्‍वीकारला.

उत्‍तराखंड सरकारचे शहरी विकास मंत्री माननीय श्री. मदन कौशिक, उत्‍तराखंड सरकारचे अर्थमंत्री श्री. प्रकाश पंत, उत्‍तराखंड भारतीय जनता पार्टीचे राज्‍य महासचिव श्री. नरेश बंसल आणि माजी खासदार श्री. जे. पी. अग्रवाल यांच्‍या हस्‍ते पुरस्‍कार प्रदान करण्‍यात आला.
पुरस्‍कार विजेत्‍या टीमचे अभिनंदन करत टाटा पॉवरचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी व कार्यकारी संचालक श्री. अशोक सेठी म्‍हणाले, ''आरोग्‍य व सुरक्षा हे आमच्‍यासाठी अत्‍यंत महत्‍त्‍वाचे क्षेत्र असण्‍यासोबतच आमच्‍या व्‍यवसायाचा महत्‍त्‍वपूर्ण भाग आहेत. आम्‍ही सातत्‍याने कामाच्‍या ठिकाणी सर्वोत्‍तम व्‍यावसायिक आरोग्‍य व सुरक्षा आणण्‍याचा प्रयत्‍न करतो. हा पुरस्‍कार निश्चितच या दिशेने करत असलेल्‍या आमच्‍या प्रयत्‍नांना चालना देईल.''
फाऊंडेशन फॉर अॅक्‍सेलेरेटेड मास एम्‍पॉवरमेंट (फेम) यांच्‍याकडून मिळालेला हा पुरस्‍कार क्षेत्रांना सर्वोत्‍तम व्‍यावसायिक आरोग्‍य व सुरक्षा प्रणाली, प्रक्रिया व पद्धतींची अमलबजावणी करण्‍यासाठी सन्‍मानित करतो.


Comments

Popular posts from this blog

‘हावरे पिनॅकल’ स्वप्नपूर्ती सोहळा दिमाखात संपन्न!

**तोंडाला पुसणाऱ्या सरकारविरोधात गांधी जयंती दिनी आत्मक्लेश आंदोलन*

अच्युत पालव यांच्या `मास्टर क्लास'मध्ये अमेरिकन गिरवणार देवनागरी सुलेखनाचा कित्ता