गार्डन रीच शिपबिल्डर्स अँड इंजिनीअर्स लिमिटेड: प्रारंभी समभाग विक्रीला सप्टेंबर 24, 2018 रोजी सुरुवात व सप्टेंबर 26, 2018 रोजी विक्री होणार बंद


गार्डन रीच शिपबिल्डर्स अँड इंजिनीअर्स लिमिटेड: प्रारंभी समभाग विक्रीला सप्टेंबर 24, 2018 रोजी सुरुवात व सप्टेंबर 26, 2018 रोजी विक्री होणार बंद
  • किंमतपट्टा: प्रति इक्विटी शेअर 115 रुपये ते 118 रुपये
  • रिटेल इंडिव्हिज्युअल बिडर्सना व एम्प्लॉयी रिझर्व्हेशन पोर्शनमध्ये बोली लावणाऱ्या पात्र कर्मचाऱ्यांना ऑफर प्राइसवर प्रति इक्विटी शेअर 5 रुपये सवलत दिली जाईल.
  • विक्रीनंतरच्या कंपनीच्या पेड-अप इक्विटी शेअर भांडवलामध्ये ऑफर व नेट ऑफर यांचे योगदान अनुक्रमे 25.50% व 25.00% असेल

गार्डन रीच शिपबिल्डर्स अँड इंजिनीअर्स लिमिटेडने (“कंपनी”), सप्टेंबर 24, 2018 रोजी, प्रत्येकी 10 रुपये दर्शनी मूल्य असलेल्या इक्विटी शेअरची (“इक्विटी शेअर्स”) प्रति इक्विटी शेअर प्राइसनुसार (शेअर प्रीमिअमसह) प्रारंभी समभाग विक्री करायचे ठरवले (“ऑफर”) असून त्यामध्ये प्रमोटर, केंद्रीय संरक्षण मंत्रालयाद्वारे कृती करणारे भारताचे राष्ट्रपती, यांच्यातर्फे 29,210,760 पर्यंतच्या इक्विटी शेअर्सच्या ऑफर फॉर सेलचा समावेश आहे (“द सेलिंग शेअरहोल्डर”).

ऑफरमध्ये 572,760 पर्यंतचे इक्विटी शेअर्स पात्र कर्मचाऱ्यांसाठी राखून ठेवले जातील (रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसमध्ये नमूद केल्याप्रमाणे) (“एम्प्लॉयी रिझर्व्हेशन पोर्शन”). ऑफरमधून एम्प्लॉयी रिझर्व्हेशन पोर्शन वजा केल्यावर “नेट ऑफर” उरेल. विक्रीनंतरच्या कंपनीच्या पेड-अप इक्विटी शेअर भांडवलामध्ये ऑफर व नेट ऑफर यांचे योगदान अनुक्रमे 25.50% व 25.00% असेल. बिड/ऑफर सप्टेंबर 26, 2018 रोजी बंद होणार आहे.
रिटेल इंडिव्हिज्युअल बिडर्सना ऑफर प्राइसवर प्रति इक्विटी शेअर 5 रुपये सवलत (“रिटेल डिस्काउंट”) दिली जाईल. एम्प्लॉयी रिझर्व्हेशन पोर्शनमध्ये बोली लावणाऱ्या पात्र कर्मचाऱ्यांना ऑफर प्राइसवर प्रति इक्विटी शेअर 5 रुपये सवलत (“एम्प्लॉयी डिस्काउंट”) दिली जाईल.
ऑफरसाठी किंमतपट्टा प्रति इक्विटी शेअर 115 रुपये ते 118 रुपये असेल. किमान बोलीचे प्रमाण 120 इक्विटी शेअर्स आहे आणि त्यानंतर 120 इक्विटी शेअर्सच्या पटीत असेल.
इक्विटी शेअर्सची नोंदणी बीएसई व एनएसई येथे केली जाणार आहे.
आयडीबीआय कॅपिटल मार्केट्स अँड सिक्युरिटीज लिमिटेड व येस सिक्युरिटीज (इंडिया) लिमिटेड हे ऑफरसाठी बुक रनिंग लीड मॅनेजर्स (“बीआरएलएम”) आहेत.

ही ऑफर सिक्युरिटीज काँट्रॅक्ट्स (रेग्युलेशन) रुल्स, 1957च्या रुल 19(2)(b)(iii) नुसार राबवली जात आहे (“एससीआरआर”). सुधारणा केल्यानुसार, बदल केलेल्या सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (इश्यू ऑफ कॅपिटल अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट) रेग्युलेशन्स, 2009 च्या रेग्युलेशन 26(1) रेग्युलेशनच्या अनुसार ही ऑफर बुक बिल्डिंग प्रोसेसद्वारे राबवली जाणार असून, नेट ऑफरपैकी 50% शेअर्स विशिष्ट प्रमाणात पात्र संस्थात्मक ग्राहकांसाठी (“क्यूआयबी पोर्शन”) राखून ठेवले जातील. क्यूआयबी पोर्शनच्या 5% इक्विटी शेअर्स विशिष्ट प्रमाणात केवळ म्युच्युअल फंडांसाठी उपलब्ध होतील. क्यूआयबी पोर्शनचा उर्वरित भाग विशिष्ट प्रमाणात क्यूआयबींना त्यांच्याकडून आलेल्या ऑफर प्राइस वा त्याहून अधिक वैध बोलींवर उपलब्ध केला जाईल. परंतु, म्युच्युअल फंडांकडून आलेली एकूण मागणी क्यूआयबी पोर्शनच्या 5% पेक्षा कमी असेल, तर म्युच्युअल फंड पोर्शनमधील उर्वरित ऑफर्ड शेअर्स विशिष्ट प्रमाणात क्यूआयबींना देण्यासाठी क्यूआयबी पोर्शनमध्ये समाविष्ट केले जातील.

तसेच, सेबी आयसीडीआर रेग्युलेशन्सनुसार, नेट ऑफरपैकी किमान 15% भाग विशिष्ट प्रमाणात बिगर-संस्थात्मक बिडर्ससाठी राखून ठेवला जाईल आणि विक्रीच्या किमतीइतक्या वा त्याहून अधिक रकमेच्या वैध बोली व रिटेल इंडिव्हिज्युअल बिडरसाठी किमान 35% शेअर्स राखून ठेवता येतील. तसेच, ऑफर प्राइसइतक्या वा त्याहून अधिक रकमेच्या वैध बोलीनुसार, एम्प्लॉयी रिझर्व्हेशन पोर्शनमध्ये बोली लावणाऱ्या पात्र कर्मचाऱ्यांना अलोकेशनसाठी व अलॉटमेंटसाठी 572,760 पर्यंत इक्विटी शेअर्स उपलब्ध होतील. सर्व बिडरना अॅप्लिकेशन सपोर्टेड बाय ब्लॉक्ड अमाउंट (“एएसबीए”) प्रक्रियेमार्फत या विक्रीमध्ये सहभागी होता येईल व यासाठी त्यांना त्यांचा संबंधित बँक खाते क्रमांक द्यावा लागेल. या खात्यात एससीएसबीकडून बोलीची रक्कम सेल्फ सर्टिफाइड सिंडिकेट बँकेमार्फत (एससीएसबी) ब्लॉक केली जाईल.

Comments

Popular posts from this blog

कमिन्स इंडियाने नैसकॉम ग्लोबल कैपिसिटी सेंटर पुरस्कार 2019 जिंकला

‘हावरे पिनॅकल’ स्वप्नपूर्ती सोहळा दिमाखात संपन्न!

IDFC Mutual Fund launches mobile game to raise awareness on financial planning