पीसी ज्वेलर्सने सणासुदीच्या निमित्ताने ग्राहकांसाठी जाहीर केली विशेष योजना


पीसी ज्वेलर्सने सणासुदीच्या निमित्ताने ग्राहकांसाठी जाहीर केली विशेष योजना
·       देशभरात लागू असलेली ही योजना 10 ऑक्टोबर ते 18 नोव्हेंबर दरम्यान असेल कार्यरत

देशातील एक विश्वासार्ह आणि प्राधान्य दिले जाणारा ज्वेलरी ब्रँड असलेले पीसी ज्वेलर ग्राहकांचा खरेदीचा अनुभव चांगला करण्यासाठी नेहमीच आघाडीवर असतात. देशभरात सुरू असलेला सणासुदीचा मौसम साजरा करण्यासाठी दसरा व दिवाशी पूर्वी या ज्वेलरी ब्रँडने ग्राहकांसाठी ऑफरची घोषणा केली आहे.
या अंतर्गत हिऱ्यांचे दागिणे आणि सोन्या-चांदीच्या दागिण्यांच्या घडणावळीवर 30 टक्क्यांपर्यंत सवलत देऊ केली आहे. 10 ऑक्टोबर 2018 पासून ही योजना सुरू झाली आहे व 18 नोव्हेंबर 2018 पर्यंत भारतभर ही योजना सुरू राहणार आहे.
पीसी ज्वेलरचे मॅनेजिंग डायरेक्टर श्री बलराम गर्ग म्हणाले, सणासुदीच्या निमित्ताने सर्वांच्या आयुष्यात संपन्नता यावी अशी मी सदिच्छा व्यक्त करतो. सणासुदीचा काळ दागदागिने खरेदी करण्यासाठी चांगला समजला जातो. सणासुदीच्या काळात ग्राहकांना काही खास सवलतींची प्रतिक्षा असते आणि या सीझनमध्ये त्यांना महत्त्वपूर्ण वाटेल असे काहीतरी त्यांना द्यावेसे आम्हाला वाटते आहे. यासाठीच आम्ही सुरू केलेली सवलत योजना आमच्या भारतातील सर्व शोरूममध्ये लागू आहे तसेच www.pcjeweller.com या आमच्या ऑनलाइन पोर्टलवर देखील सुरू आहे.
सोने, चांदी, हिरे यामध्ये नेकलेस सेट, कानातले, अंगठ्या, बांगड्या, चेन वगैरेच्या अनोख्या व बाजारात कधीही न पाहिलेल्या डिझाइन कुटुंबातील व्यक्ती आणि मित्रमैत्रीणींना भेट देण्यासाठी पीसी ज्वेलरच्या सर्व शोरूममध्ये ग्राहकांसाठी उपलब्ध आहेत.

Comments

Popular posts from this blog

Indegene acquires Trilogy Writing & Consulting GmbH, a medical writing consultancy

TiEcon Mumbai 2023, brilliantly showcased revolutionary ideas & impactful solutions to build an Anti-Fragile and Sustainable India

REC DECLARES ITS FINANCIAL RESULTS FOR Q2 & H1 FY24