तनिष्कचा उत्सव कलेक्शनमध्ये इतिहास आणि परंपरांचा संगम


तनिष्कचा उत्सव कलेक्शनमध्ये इतिहास आणि परंपरांचा संगम


सणासुदीचे दिवस आता लवकरच सुरू होतील आणि तनिष्कही यंदाची दिवाळी अगदी दिमाखात साजरी करणार आहे. आपल्या देशाची संपन्न संस्कृती, सौंदर्य आणि दिव्यांच्या सणांचा खरा अर्थ दाखविणारे उत्सव हे कलेक्शन सादर करण्यात आले आहे.
आजची आधुनिक भारतीय स्त्री सातत्याने नवीन रचनांच्या आणि तिच्या रुपांवर खुलून दिसतील, अशा नव्या डिझाइनच्या शोधात असते. मात्र, अशातही ती ऐतिहासिक सौंदर्य आणि परंपरा विसरत नाही. हा सण साजरा करण्यासाठी तनिष्कने आधुनिकता आणि परंपरा यांचे उत्तम फ्युजन नव्या कलेक्शनद्वारे सादर केले आहे. या कलेक्शनमध्ये नाजूक कारागिरांसह अचूकता आणि स्टाइलचा उत्तम मेळ साधला गेला आहे.
तसेच या कलेक्शनच्या दागिन्यांमध्ये अत्यंत अभिमानी आणि संपन्न इतिहासाचे दाखले देणारी परंतु अत्याधुनिक स्टाइल समाविष्ट आहे. याशिवाय पश्चिम आणि दक्षिण भारतातील कारागिरांच्या उत्तम नमुन्यांचाही समावेश आहे. अत्याधुनिकता आणि पारंपारिक संस्कृती यांचा सुंदर मिलाफ असलेले हे कलेक्शन एक स्टेटमेंट बनू शकते. शिवाय ही परंपरा आपल्या नंतरच्या पिढ्यांकडे सोपविता येते. कारण ही स्टाइल कधीही कालबाह्य होणारी नाही. उत्सवमधील दागिने 165 शहरांतील 267 दुकानांमध्ये उपलब्ध आहेत.

Comments

Popular posts from this blog

Indegene acquires Trilogy Writing & Consulting GmbH, a medical writing consultancy

TiEcon Mumbai 2023, brilliantly showcased revolutionary ideas & impactful solutions to build an Anti-Fragile and Sustainable India

REC DECLARES ITS FINANCIAL RESULTS FOR Q2 & H1 FY24