‘हावरे पिनॅकल’ स्वप्नपूर्ती सोहळा दिमाखात संपन्न!

‘हावरे पिनॅकल’ स्वप्नपूर्ती सोहळा दिमाखात संपन्न!

प्रतिनिधी- सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारी घरे उभारण्यात देशात अग्रेसर असलेल्या हावरे ग्रुपने पुन्हा एकदा कल्याण येथील ‘हावरे पिनॅकल’ गृह प्रकल्प, दिलेल्या मुदतीपूर्वीच पूर्ण करत ग्राहकांना सुखद धक्का दिला आहे. हावरे समुहाने गेल्या २३ वर्षांत १५० हुन अधिक प्रकल्प पूर्ण करून सुमारे ४५ हजार कुटुंबीयांना घरांच्या किल्ल्या सुपूर्द केल्या आहेत.

सर्वसामान्यांच्या घराची स्वप्न हावरे ग्रुप नेहमीच पूर्ण करत आला आहे. रविवारी कल्याण येथे हावरे पिनॅकल या प्रकल्पाचा स्वप्नपूर्ती सोहळा मोठ्या थाटात साजरा करण्यात आला. यावेळी राज्याचे महसुल पुनर्वसन आणि सामाजिक बांधकाम मंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि खासदार कपिल पाटील यांच्या हस्ते ग्राहकांना घराच्या किल्ल्या दिल्याने आपला आनंद द्विगुणीत झाल्याच्या प्रतिक्रिया अनेक ग्राहकांनी नोंदवल्या.

यावेळी उपस्थित मान्यवरांचा हावरे प्राॅपर्टीचे सीएमडी डाॅक्टर सुरेश हावरे यांनी सत्कार केला. तसेच सर्वसामान्यांसाठी आपण गेली अनेक वर्ष घरं उभारत आहोत. त्यात आज सर्वसामान्यांचा आणि
तळागाळातील लोकांचा आत्मा समजणारा नेता म्हणून चंद्रकांतदादा पाटील आम्हाला प्रमुख पाहुणे म्हणून लाभले त्यात दादांच्या हस्ते ग्राहकांना घराच्या चाव्या मिळत आहेत. हा अत्यंत आनंदाचा क्षण असल्याचे यावेळी हावरे म्हणाले.

तसेच केवळ घरांचं बांधकाम करायचे म्हणून करायचे असे न करता, घरांचे बांधकाम करताना प्रत्येक छोट्यातील छोट्या वस्तुची गुणवत्ता व दर्जा प्रयोगशाळेत तपासण्यात अाल्याचे सांगून याचे संपूर्ण श्रेय हावरे ग्रुपचे सीइओ अमीत हावरे तसेच एक्झिक्युटिव डिरेक्टर आणि सीएफओ अमर हावरे यांचे असल्याचे डाॅ सुरेश हावरे यांनी सांगितले.

ग्राहकांना दिलेला शब्द वेळेपूर्वी पूर्ण करण्याची हावरे ग्रुपची खासियत आहे. त्याचाच भाग म्हणून आम्ही आजवर तब्बल ६० कोटी स्वेअर फुट घरांचे बांधकाम पूर्ण करू शकलो आणि सुमारे ४५ हजार कुटुंबीयांना आनंद वाटू शकलो. हावरे ग्रुपवर ग्राहकांचा प्रचंड विश्वास आहे आणि तोच आमचा श्वास असल्याचे हावरे ग्रुपचे सीइओ अमीत हावरे यांनी सांगितले.

हावरे पिनॅकल गृह प्रकल्पाच्या प्रचंड यशानंतर आम्ही हावरे पॅराडाइज प्रकल्प हाती घेतला आहे. यात नव्या सेवा सुविधांबरोबर दसरा ते दिवाळीपर्यंत भरघोस आॅफर ग्राहकांसाठी ठेवण्यात आल्याचे हावरे ग्रुपचे एक्झिक्युटिव डिरेक्टर आणि सीएफओ अमर हावरे यांनी सांगितले.

गेली अनेक वर्षें सर्वसामान्यांच्या घरांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी हावरे ग्रुप प्रयत्न करत आहेत. ग्राहकांचा त्यांच्यावर विश्वास आहे. त्यामुळेच त्यांच्या केवळ नावाने घरांची विक्री होते. मी त्याचे अभिनंदन करतो असे राज्याचे महसुल पुनर्वसन आणि सामाजिक बांधकाम मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले.

हावरे पिनॅकल गृह प्रकल्पात ग्राहकांना स्वीमिंग पूल, जाॅगिंग ट्रॅक, एॅफी थिएटर, लायब्ररी, गेम्स रुम, वाय-फाय, बस सेवा आणि इतर अनेक सुविधा देण्यात आल्या आहेत. हावरे पिनॅकल प्रकल्पाच्या स्वप्न पूर्ती नंतर आता हावरे पॅराडाइज प्रकल्पही ग्राहकांना दिलेल्या वेळेच्या आधी पूर्ण करणार असल्याचा दावा अमीत हावरे यांनी व्यक्त

Comments

Popular posts from this blog

कमिन्स इंडियाने नैसकॉम ग्लोबल कैपिसिटी सेंटर पुरस्कार 2019 जिंकला

IDFC Mutual Fund launches mobile game to raise awareness on financial planning