आयसीआयसीआयने जाहीर केले पूर्व-मंजूर कार लोनसाठी पूर्ण अर्थसहाय्य


आयसीआयसीआयने जाहीर केले पूर्व-मंजूर कार लोनसाठी पूर्ण अर्थसहाय्य
·         कारच्या ऑन-रोड किमतीच्या 100% पर्यंत अर्थसहाय्य देणारी देशातील पहिली बँक
·         ग्राहकांना मिळणार 20 लाख रुपयांपर्यंत पूर्णतः मंजूर कार लोन
·         वितरणासाठी जास्तीत जास्त चार तास पुरेसे

आयसीआयसीआय बँकेने आपल्या बचत खातेधारकांना कारच्या ऑन-रोड किमतीच्या 100% पर्यंत अर्थसहाय्य देण्यासाठी पूर्व-मंजूर कर्ज सुविधा जाहीर केली असून, या क्षेत्रातील ही अशी पहिलीच सुविधा आहे. या सुविधेमुळे ग्राहकांना 20 लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकेल. बँक चार कामाच्या तासांमध्ये कर्जाचे वितरण करते. आयसीआयसीआय बँकेने सणासुदीनिमित्त ग्राहकांना त्यांच्या पसंतीची वाहने खरेदी करणे शक्य व्हावे, यासाठी आकर्षक सुविधा उपलब्ध केली आहे.

या उपक्रमाविषयी बोलताना, आयसीआयसीआय बँकेचे सीनिअर जनरल मॅनेजर व रिटेल सिक्युअर्ड अॅसेट्सचे प्रमुख रवी नारायणन म्हणाले, “आयसीआयसीआय बँक ग्राहकांना शक्य तितक्या वेगाने व अतिशय सोयीस्करपणे आधुनिक उत्पादने व सेवा देण्यासाठी नेहमी प्रयत्नशील राहिली आहे. सणासुदीच्या दरम्यान ग्राहकांना जास्तीत जास्त आनंद देण्याच्या आमच्या प्रयत्नांचा भाग म्हणून ही सुविधा घोषित करण्यात आली आहे. ही सुविधा आमच्या लाखो ग्राहकांसाठी उपलब्ध केली जाणार आहे आणि या नव्या सुविधेमुळे ग्राहकांना सणासुदीनिमित्त सुरळीतपणे खरेदी करता येईल आणि कुटुंबियांबरोबर आनंद साजरा करता येईल. या नव्या सुविधेमुळे, ग्राहकांना सर्वोत्तम बँकिंग अनुभव मिळेल, असे आम्हाला वाटते.

देशभरातील कोणत्याही ऑटो-डीलरशिपमध्ये जाऊन ग्राहकांना कार लोन सुविधेचा लाभ घेता येईल. त्यासाठी त्यांनी त्यांच्या पसंतीची कार निवडावी, खाते क्रमांक दऊन आपली पूर्व-मंजूर कर्जाची पात्रता पडताळून पहावी, कागदपत्रे व कर्जासाठी अर्ज द्यावा व केवळ चार कामाच्या तासांमध्ये कर्ज वितरित करून घ्यावे. ग्राहकांच्या क्रेडिट असेसमेंटसाठी आयसीआयसीआय बँकेने तयार केलेल्या नवी समीकरणावर ही सुविधा आधारित आहे. हे समीकरण निरनिराळ्या आर्थिक निकषांची उत्तम सांगड घालते. यामध्ये, क्रेडिट ब्युरोकडून माहिती, ग्राहकांची कर्जासाठी पात्रता ठरवण्यासाठी बँकेशी नाते व व्यवहार, अशा निकषांचा समावेश आहे. ग्राहकांच्या क्रेडिट-स्कोअरनुसार बँक ग्राहकाला विशिष्ट रकमेचे कर्ज पूर्व-मंजूर करते. यामुळे ग्राहकांना वाहन खरेदीच्या वेळी कर्ज पटकन मिळण्यास मदत होते.

या सुविधेच्या विशेष वैशिष्ट्यांमध्ये पुढील वैशिष्ट्ये समाविष्ट आहेत:
·         कारच्या ऑन-रोड किमतीच्या 100% पर्यंत अर्थसहाय्य
·         20 लाख रुपयांपर्यंत पूर्व-मंजूर कर्ज
·         चार कामाच्या तासांमध्ये कर्जाचे वितरण
·         कालावधी सात वर्षांपर्यंत

कर्जासाठी पात्रता पडताळण्यासाठी ग्राहकांनी आयसीआयसीआय बँकेच्या कोणत्याही शाखेत जावे किंवा नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावरून 5676766 यावर SMS <CAR> करावा. त्यानंतर, त्यांना कोणत्याही डीलरशिपमध्ये जाता येईल आणि त्यांच्या आवडीची कार केवळ काही तासांमध्ये खरेदी करता येईल.

Comments

Popular posts from this blog

TiEcon Mumbai 2023, brilliantly showcased revolutionary ideas & impactful solutions to build an Anti-Fragile and Sustainable India

REC DECLARES ITS FINANCIAL RESULTS FOR Q2 & H1 FY24

Liberty General Insurance Launches Dedicated 24/7 Helpline <+91-9324968286> for the Victims of Odisha Train Tragedy