पोर्श इंडिया करत आहे नवीन कायेनचे स्वागत


थर्ड जनरेशन कायेन यशोगाथा पुढे नेण्यासाठी सज्ज

पोर्श इंडिया करत आहे नवीन कायेनचे स्वागत

पोर्शच्या यशस्वी एसयूव्ही मॉडेलचे सर्वात नवीन व्हर्जन भारतात उपलब्ध आहे. ग्राहकांना तीन प्रकारांतून निवड करण्याची संधी आहे. कायेन, कायेन ई हायब्रिड, कायेन टर्बो, पोर्शे इंडियाने मुंबईतील सहारा स्टार हॉटेलमध्ये आयोजित केलेल्या विशेष सोहळ्यात ब्रॅण्डच्या या फ्लॅगशिप एसयूव्हीचे आगमन साजरे केले. येथे एसयूव्हीचे तीनही प्रकार सर्वांसमोर सादर करण्यात आले. त्यानंतर त्याच्यावर सांगोपांग चर्चा झाली.
पोर्शे इंडियाचे संचालक पवन शेट्टी म्हणाले, अगदी सुरूवातीपासून कायेन ही भारतात सर्वात लोकप्रिय मॉडेल्सपैकी एक राहिली आहे आणि थर्ड जनरेशनही हीच यशोगाथा पुढे नेणार याबद्दल माझ्या मनात जराही शंका नाही. कायेनची दैनंदिन वापरयोग्यता आणि ड्रायव्हिंगची गतीशीलता व आरामदायित्व यांच्यातील अपवादात्मक समतोल या बाबी खरोखर अनोख्या आहेत. या श्रेणीतील आमची सर्वात नवीन गाडी कोणत्याही प्रकारच्या रस्त्यावर उत्तम कामगिरी करतेच. शिवाय भारतातील पश्चिम भागातील वाळवंटापासून ते आमच्या ईशान्येकडील जंगलांपर्यंत कोणत्याही भूप्रदेशावर धावण्यास सज्ज आहे. नवीन कायेन ई हायब्रिडचे स्वागत करतानाही आम्ही खूप रोमांचित झालो आहोत. कारण, आमच्या ग्राहकांचा इलेक्ट्रिक वाहतुकीतील वाढता रस आम्हाला दिसत आहे.
दमदार कामगिरी आणि आराम यांच्यात अधिक चांगला समतोल साधण्यासाठी कायेनचे चेसिस पूर्णपणे नव्याने डिझाइन करून कमी वजनाचे ठेवण्यात आले आहे. प्रमाण उपकरणांची रेंज वाढवूनही गाडीच्या एकंदर कमी झालेल्या वजनात हलक्या वजनाच्या चेसिसचा वाटा मोठा आहे. फोरडी चेसिस कंट्रोल, थ्री चेंबर एअर सस्पेन्शन, इलेक्ट्रिक 480 व्होल्ट रोल स्टॅबिलायशेशन आणि उच्च कामगिरी करणारे पोर्शचे सरफेस कोटेड ब्रेक्स ही सर्व वैशिष्ट्ये ड्रायव्हिंगची गतीशीलता वाढविण्यात योगदान देतात.



Comments

Popular posts from this blog

TiEcon Mumbai 2023, brilliantly showcased revolutionary ideas & impactful solutions to build an Anti-Fragile and Sustainable India

REC DECLARES ITS FINANCIAL RESULTS FOR Q2 & H1 FY24

Liberty General Insurance Launches Dedicated 24/7 Helpline <+91-9324968286> for the Victims of Odisha Train Tragedy