ब्लू स्टार आपल्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त सादर करत आहेत 75 नवे कंडिशनर मॉडेल्स;


ब्लू स्टार आपल्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त 
सादर करत आहेत 75 नवे कंडिशनर मॉडेल्स;

एअर कंडिशनिंग आणि कमर्शियल रेफ्रिजरेशन क्षेत्रातील अग्रगण्य नाव असणार्या, ब्लू स्टार लिमिटेडने, आपल्या अमृत महोत्सवी वर्षामध्ये रूम एअर कंडिशनर्सचे 75 नवे मॉडेल्स सादर केले आहेत. ह्या उत्कृष्ट आणि स्टायलिश मॉडेल्समध्ये आपल्या रेटेड क्षमतेपेक्षा 30% अधिक कुलिंग देण्यास सक्षम असणार्या ऊर्जा-कार्यक्षम इन्व्हर्टर एसीजचा समावेश आहे. ह्यामुळे तीव्र उन्हाळ्यादरम्यानही मोठय़ा रूममधील तापमान जलदमणे खाली आणणे शक्य होते ज्यामुळे ऊर्जा कमी प्रमाणात लागते आणि विजेचे बिल कमी आल्याने लक्षणीय बचतही होते. ही उत्कृष्ट कामगिरी साध्य होते ब्लू स्टारच्या आउटडोअर युनिटच्या विशेष अशा हेवी डय़ुटी डिझाइनमुळे, ह्या युनिटचे 1.5 टन 5-स्टार इन्व्हर्टर एसीसाठीचे वजन सुमारे 46 किग्र इतके आहे. ह्या इन्व्हर्टर एसीच्या श्रेणीच्या सुरूवात रू. 33,790 पासून हेते. तसेच, ग्राहक हे अग्रगण्य बँकांच्या वित्तीय संस्थांच्या माध्यमातून सुलभ ईएमआय पर्यायांसह आकर्षक 0% वित्तपुरवठा सुविधांचा आणि कॅश बॅक ऑफर्सचा लाभ घेऊ शकतील. ब्लू स्टारच्या सर्व इन्व्हर्टर एसीजना पहिल्या वर्षाकरिता सुनिश्चित सर्वसमावेशक वॉरन्टीचे, आणि कॉम्प्रेसरकरिता 10 वर्षांच्या दीर्घकालीन वॉरन्टीचे पाठबळ लाभलेले आहे.

ब्लू स्टार हे 4.50 आयएसईईआर असणार्या विद्यमान 5-स्टार एसीजच्या तुलनेत 18% कमी ऊर्जा खर्च करणार्या 5.30 इतका उच्च आयएसईईआर असणार्या अत्यंत कार्यक्षण इन्व्हर्टर एसीजचे नवीन लाइन-अप घेऊन आले आहेत, ज्याद्वारे त्यांनी ऊर्जा-कार्यक्षम प्रकारच्या एसीजमध्ये नवा मापदंड स्थापित केला आहे.
त्याचबरोबर, नावीन्यपूर्ण श्रेणीमध्ये 0.10C आणि 0.50C च्या टप्प्यांत तापमान अचूक सेट करणे, अधिक शांततापूर्ण कामगिरीसाठी कॉम्प्रेसरकरिता साउंड प्रूफ अकूस्टिक (ध्वनिविषयक) जॅकेट, अधिक जलद कुलिंगसाठी डय़ुअल रोटर टेक्नोलॉजी आणि बाह्य व्होल्टेज स्टॅबिलायझरचे साहाय्य घेता 160 v ते 270 v दरम्यान सुलभपणे कार्यरत राहण्यासाठी डिझाइन करण्यात आलेला बिल्ट-इन व्होल्टेज स्टॅबिलायझर ह्यांसारखी खास वैशिष्टय़े देण्यात येतात.


वाय-फाय इनॅबल्ड वैशिष्टय़ाने युक्त ब्लू स्टारचे इन्व्हर्टर एसीज हे त्यांच्या ग्राहक-केंद्रित मोबाइल ऍपद्वारे स्मार्टली हाताळता येतात, ह्या ऍपमुळे मशीनचे दुरस्थपणे निरीक्षण नियंत्रण करण्याच्या आपल्या क्षमतेसोबतच, ग्राहकांना त्यांचे एसी प्रोफाइल पर्सनलाइझ करणे, अधिक चांगल्या नियंत्रणासाठी एसीजचा समूह करणे, आणि सेटिंग्स परिणामकारक करणे तसेच होम ऑटोमेशन सिस्टम्ससह हे ऍप एकात्मिक (इंटिग्रेट) करणे अशा गोष्टी शक्य होतात. त्याच बरोबर, ह्या ऍपमध्ये स्मार्ट बजेट मॅनेजमेन्टचे वैशिष्टय़ आहे जे ग्राहकांना त्यांच्या बजेटचे हुशारीने व्यवस्थापन करण्यास, त्यांच्या एसी वापराचा कल जाणून घेण्यास, तसेच विविध टाइम स्लिप कर्व्हजच्या संबंधात त्यांच्या एसीजचे नियोजन करण्यास साहाय्य करते.
ब्लू स्टारच्या 5-स्टार एअर कंडिशनर्स सेगमेन्टमधील हिस्सा हा इंडस्ट्रीपेक्षा अधिक आहे, जे अधोरेखित करते की प्रीमियम उत्पादने खरेदी करणार्या, उत्पादनाबाबत काटेकोर असणार्या ग्राहकांची ब्लू स्टार ही पहिली पसंती आहे. इन्व्हर्टर मॉडेल्सची संपूर्ण श्रेणी ही पर्यावरणस्नेही रेफ्रिजरन्ट्सने सुसज्ज आहे.
ब्लू स्टार ह्या वर्षी आपले अमृत महोत्वी वर्ष साजरे करत आहेत, ब्लू स्टारने 2011 मध्ये रेसिडेन्शियल (निवासी) सेगमेन्टमध्ये प्रवेश केला आणि तेव्हापासून इंडस्ट्रीवर मात करत वर्षागणिक आपल्या कामगिरीचा आलेख उंचावला आहे. ब्लू स्टारचे एसीज हे दर्जा, विश्वसनीयता आणि टिकाऊपणा ह्यांच्यासाठी ओळखले जातात, अशा वैशिष्टय़ांद्वारे कंपनीने लाखो ग्राहकांचा विश्वास जिंकला आहे.

एअर कुलर्स आणि एअर प्युरिफायर्स
ब्लू स्टारने आपल्या विंडसह्या सब-ब्रँड अंतर्गत एअर कुलर्सची नवी श्रेणीदेखील आणली आहे, ही श्रेणी तीव्र
कोरडय़ा उन्हाळ्यामध्ये जलद कुलिंगसाठी मदत करणार्या विशेष क्रॉस ड्रिफ्ट तंत्रज्ञानाने युक्त आहे. ही श्रेणी 35 लिटर्स ते 75 लिटर्सच्या वेगवेगळ्या वॉटर टँक क्षमतेमध्ये अणि रु. 8,990 ते रु. 13,490 ह्या दर श्रेणीमध्ये उपलब्ध आहे.
भारतातील अनेक शहरांमधील वाढत्या प्रदूषण स्तरांशी लढा देण्यासाठी, ब्लू स्टारने सेन्स एअर टेक्नोलॉजी, नॅनो-इ, प्लाझमा, आणि यूव्ही प्युरिफिकेशन सिस्टम्स ह्यांसह नावीण्यपूर्ण एअर प्युरिफायर्सची नवी श्रेणी सादर केली आहे. हे एअर प्युरिफायर्स रु. 8,990 ते रु. 23,990 ह्या दर श्रेणींमध्ये उपलब्ध आहेत.

संशोधन विकास
ब्लू स्टारकडे जागतिक दर्जाची, एएचआरआय-प्रमाणित आरऍन्डडी सुविधा आहे जी इंडस्ट्रीमधील श्रेणीमधील सर्वोत्तम अशी आंतरराष्ट्रीय दर्जाची उत्पादने विकसित करते. एअर कंडिशनर्सच्या दोन सायकोमेट्रिक प्रयोगशाळांना नॅशनल ऍक्रिडिटेशन बोर्ड फॉर टेस्टिंग ऍन्ड कॅलिब्रेशन लॅबोरेटरीज (एनएबीएल) ह्यांच्याकडून मान्यता प्राप्त झालेली आहे. विश्वसीनता आणि इलेक्ट्रॉनिक्सच्या वाढीव क्षमतेसह, ब्लू स्टारने डिजिटल आणि स्मार्ट उत्पादनांची भक्कम पायाभरणी केली आहे. ब्लू स्टारने आपल्या उत्पादनांच्या चाचणीसाठी आणि सुरक्षितता अनुपालन प्रमाणित करण्यासाठी इन-हाउस क्षमता विकसित केली आहे. आरऍन्डटी फंक्शनला डिपार्टमेन्ट ऑफ सायंटिफिक ऍन्ड इंडिस्ट्रियल रिसर्चकडून (डीएसआयआरकडून) मान्यता दर्जा मिळणे चालू राहिले आहे. कंपनी ही नवीन उत्पादनांच्या विकासावार तसचे रिसर्च डिझाइन उपक्रमांवर वित्तीय वर्ष 19 मधील रु. 40 करोडच्या तुलनेत वित्तीय वर्ष 20 मध्ये आपली गुंतवणूक रु. 50 करोड करण्यास इच्छुक आहे. ब्लू स्टार हे जागतिक स्तरावरील सर्वोत्तम उत्पादनांशी स्पर्धा करणारी ग्राहकाभिमुख, आधुनिक आणि उच्च दर्जाची उत्पादने विकसित करण्यासाठी बांधील आहेत.

वितरण
वितरणाच्या संबंधात, वित्तीय वर्ष 20 मध्ये, ब्लू स्टारचे रुम एअर कंडिशनर्स हे एक्सक्लुसिव्ह तसेच मल्टी-ब्रँड सेल्स आउटलेट्स, सेल्स ऍन्ड सर्व्हिस डीलर्स, रिटेल शोरुम्स, आधुनिक ट्रेड तसेच मोठे ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म्स ह्यांच्या माध्यमातून, संपूर्ण दाभरातील 575 आणि 5000 आउटलेट्समध्ये उपलब्ध आहेत. रिटेलर्सना साहाय्य करण्यासाठी कंपनीकडे इन्स्टॉलेशन आणि सर्व्हिस फ्रन्चायझीचे भक्कम जाळे आहे. सध्याच्या घडीला ब्लू स्टारचे देशभरामध्ये 200 विशेष ब्रँड स्टोअर्स आहेत आणि वित्तीय वर्ष 20 पर्यंत ह्या स्टोअर्सची संख्या 250 वर नेण्याचे त्यांचे लक्ष्य आहे. ब्लू स्टारच्या जवळपास 52% रुम एअर कंडीशनरची विक्री ही छोटय़ा शहरांमध्ये होते कारण ह्या मार्केटमधील ग्राहक हे महत्त्वाकांक्षी असतात आणि ते प्रीमियम ब्रँड्सना पसंती देतात.

सर्व्हिस
देशातील सर्वात मोठे आफ्टर-सेल्स एअर कंडिशनिंग सेवा प्रदाते म्हणून ब्लू स्टारचे स्थान अबाधित आहे. त्यांच्या सर्व सेवा आयएसओ 9001-2008 प्रमाणित आहेत. सध्याच्या घडीला, कंपनीकडे 800 एक्स्पर्ट सर्व्हिस असोशिएट्स आहेत, वित्तीय वर्ष 20 मध्ये असोशिएट्सची संख्या 1000 वर नेण्याचा कंपनीचा संकल्प आहे. आपल्या गोल्ड स्टँडर्ड सर्व्हिस प्रोग्रमचा भाग म्हणून, कंपनी ही इतर गोष्टींसोबतच, अनेक ग्राहकाभिमुख स्मार्ट ऍप्लिकेशन्स, साधनांचे आधुनिकीकरण तसेच रिमोट मॉनिटरिंग ह्यांनी युक्त उत्कृष्ट दर्जाची आफ्टर-सेल्स सेवा प्रदान करते.

जाहिरात आणि ब्रँड कम्युनिकेशन
रुम एअर कंडिशनिंग प्रकारातील ग्राहक हे ब्रँडविषयी जागरुक असतात, ते स्पेशॅलिस्ट एअर कंडिशनिंग ब्रँडस्ना प्राधान्य देतात, हे ब्लू स्टारसाठी फायदेशीर ठरले आहे कारण प्रीमियम आणि महत्त्वाकांक्षी ब्रँड म्हणून ब्लू स्टारची ओळख आहे, तसेच ब्लू स्टारने ह्या प्रतिमेशी सुसंगत असा उच्च दर्जाच्या विविध उत्पादनांचा समृद्ध वारसा निर्माण केलेला आहे.
जाहिरातीच्या ब्रँड कम्युनिकेशनच्या परिभाषेमध्ये सांगायचे तर, मेनलाइन डेलीज, सिनेमा आणि फलकांमधील जाहिरातीच्ंया पाठबळासोबत टीव्ही कमर्शियल्सच्या संचासह, वित्तीय वर्ष 19 मधील रु. 45 करोडच्या तुलनेत उन्हाळ्याच्या हंगामामध्ये रु. 55 करोडची गुंतवणूक करण्याचा कंपनीचा मानस आहे. तसेच सोशल मिडिया आणि इंटरनेट ह्यांद्वारे डिजिटल मार्केटिंगच्या प्रयत्नांमध्ये वाढ करण्याची कंपनीची योजना आहे. निवासी ग्राहकांना नोबडी कुल्स बेटरही कंपनीची घोषणा चांगलीच आहे, आणि आपल्या सखोल ज्ञानाद्वारे ग्राहकांना कुलिंगचा अधिक सुखद अनुभव देण्यासाठी ब्लू स्टार नेहमीच प्रयत्नशील राहिले आहेत.
ब्लू स्टारने वन-टू-वन मार्केटिंगखेरीज मास मीडिया, फील्ड प्रमोशन, डिजिटल प्लॅटफॉर्म्स, प्रेस, इव्हेन्ट आणि सोशल मिडिया ह्यांनी युक्त इंटिग्रेटेड मार्केटिंग कम्युनिकेशनच्या आपल्या कृतियोजनेमध्ये सातत्य राखले आहे ज्यामुळे ग्राहकांमध्ये आणि उपभोक्त्यांमध्ये आपली ब्रँड इक्विटी बळकट करण्यासाठी ब्लू स्टारला मदत झाली आहे.
मुंबई येथे घेण्यात आलेल्या परिषदेमध्ये प्रेसशी बोलताना, श्री. बी. त्यागराजन, सह व्यवस्थापकीय संचालक,
ब्लू स्टार लिमिटेड, जे 1 एप्रिल 2019 पासून व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यभार हाती घेणार आहेत, म्हणाले की गत काळाप्रमाणे, आम्ही पुन्हा एकदा नवीन उत्पादकांची उत्कृष्ट श्रेणी सादर केली आहे जी वेगळी आणि स्टायलिश आहे. ब्लू स्टार हे ग्राहकांना अत्यंत ऊर्जा-कार्यक्षम अशी तसेच विजेचा कमी वापर करुन अतिरिक्त कुलिंग देणारी उत्पादने प्रदान करण्यासाठी नेहमीच कटिबद्ध आहेत आणि तसेच ब्लू स्टारकडे ग्राहकांच्या विस्तृत वर्गाची पूर्तता करणारी सर्व दर श्रेणीमधील उत्पादने उपलब्ध आहेत. आम्ही उत्पादन विकास, आफ्टर-सेल्स सेवा तसेच बँडची उभारणी ह्यासाठी लक्षणीय गुंतवणूक करत आहेत आणि ह्या वित्तीय वर्षामध्ये आमचा मार्केटमधील हिस्सा 13.5% वर नेण्याच कंपनीला विश्वास आहे.

Comments

Popular posts from this blog

Indegene acquires Trilogy Writing & Consulting GmbH, a medical writing consultancy

TiEcon Mumbai 2023, brilliantly showcased revolutionary ideas & impactful solutions to build an Anti-Fragile and Sustainable India

REC DECLARES ITS FINANCIAL RESULTS FOR Q2 & H1 FY24