डॉमिनोज आता बांग्लादेशमध्ये
डॉमिनोज आता बांग्लादेशमध्ये
डॉमिनोज पिझ्झाच्या बांग्लादेशमधील रंग्ज फॉर्च्युन स्क्वेअर, धानमोंदी, ढाका येथील रेस्टॉरंटचे नुकतेच अधिकृतरित्या उदघाटन करण्यात आले. भारतातील मोठ्या खाद्य सेवा कंपन्यांपैकी एक असलेल्या ज्युबिलंट फूडवर्क्स लिमिटेडआणि गोल्डन हार्वेस्ट समूहाचा भाग असलेल्या गोल्डन हार्वेस्ट क्यूएसआर लिमिटेड यांच्या संयुक्त उद्यमाने डॉमिनोज पिझ्झाने बांग्लादेशमध्ये प्रवेश केला आहे. हे ब्रँड ज्युबिलंट गोल्डन हार्वेस्ट लिमिटेड या नावांतर्गत कार्य करेल.
डॉमिनोज पिझ्झाच्या या रेस्टॉरंटमध्ये काही सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय पिझ्झाज आणि विशेषतः बांग्लादेशासाठी विकसित केलेल्या पिझ्झाजचा अनोखा मिलाप असेल. ग्राहकांना लवकरच गरम आणि ताज्या पिझ्झाजचा रेस्टॉरंटमध्येकिंवा त्यांच्या घरांमध्ये फक्त ३० मिनिटांमध्ये आस्वाद घेता येईल.
बांग्लादेशातील ग्राहकांना त्यांच्या पैशांचे योग्य मूल्य मिळावे आणि या वर्गातील अधिकाधिक नवीन ग्राहकांना आकर्षित करून बाजारपेठेमध्ये विस्तार करता यावा यासाठी उत्पादनांची किंमत १४९ टिके पासून आकारण्यात आली आहे.
Comments
Post a Comment