गोएयर ऑन-टाईम परफॉर्मन्स देण्यात सलग सहाव्या महिन्यात अग्रणी

गोएयर ऑन-टाईम परफॉर्मन्स देण्यात सलग सहाव्या महिन्यात अग्रणी
भारतातील सर्वात गतीने वाढणारी एयरलाईन म्हणून ओळखल्या जाणार्‍या गोएयरने पुन्हा एकदा सर्वोत्तम 86.3 टक्के ऑन टाईम परफॉर्मन्स (ओटीपी) नोंदवला आहे. डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हील एव्हिएशन (डीजीसीए)ने याबाबतचा फेब्रुवारी महिन्यातील ताजा अहवाल प्रकाशित केला आहे. डीजीसीएने सलग सहाव्या महिन्यात गोएयरला ओटीपी चार्टच्या क्रमवारीत आघाडीचे स्थान दिले आहे.
विविध संशोधन संस्थांनी केलेल्या अध्ययनानुसार प्रवास भाडे किंवा फ्लाईटच्या उपलब्धतेपेक्षाही ग्राहक संतुष्टीला अधिक महत्व दिले जात असते. एयरलाईनचा विचार करता प्रवासी समयबद्धता आणि आश्वासनाची अपेक्षा ठेवतात शिवाय वेळेवर पोहोचणे हि महत्वाची बाब आहे.
गोएयर आपल्या प्रवाशांना विश्वासार्ह सेवा देत असते, ज्यामध्ये त्यांना त्यांच्या इच्छित स्थळी पोहोचवण्यात येते. यावेळी प्रत्यक्षात एयरलाईनच्या नियंत्रणाबाहेर असणार्‍या एयरपोर्टवरील गर्दी, रनवेजपासून टॅक्सींच्या वेळा, गेट उपलब्धता आदी घटकांचाही विचार केला जातो. या सर्व बाबी हवाई वाहतूक नियंत्रण आणि एयरपोर्ट ऑथोरिटी यांच्या नियंत्रणातील विषय असतात. 
याशिवाय डीजीसीएच्या रिपोर्टमध्ये असाही उल्लेख करण्यात आला आहे की, गोएयरकडे एकूण सिट्स भरण्याबाबत 92.6 टक्क्यांचा दुसर्‍या क्रमांकाचा सर्वाधिक लोड होता. या सर्व अनुपातांचा विचार करता असे म्हणता येईल की, आमच्याकडे सर्वाधिक स्वच्छ आणि विश्वासार्ह एयरक्राफ्ट्सबरोबरच ग्राहकांना गुणवत्तापूर्ण सेवाही प्रदान करण्यात येते. त्याहून महत्वाचे म्हणजे आमच्या प्रत्येक क्रू मेंबरच्या तोंडावर ग्राहकांसाठी नेहमी प्रसन्न हास्य पहाता येऊ शकते कारण या सगळ्याशिवाय हे यश मिळवणे शक्य नव्हते. 
याबाबत बोलताना गोएयरच्या प्रवक्त्याने सांगितले की, “हे शक्य करण्यासाठी आम्हाला पाठिंबा देणार्‍या ग्राहकांचेही आम्ही आभार मानतो. ‘प्रवासी प्रथम’ या आमच्या धोरणाची ही पोचपावती आहे हे आम्ही अभिमानाने सांगू शकतो. कार्यात्मक उत्कृष्टतेसाठी गोएयर कडून अधिक भर दिला जात आहे. त्याचाच हा परिणाम पाहणे अतिशय आनंदाची बाब आहे.”
गोएयरने फेब्रुवारी महिन्यात 240 हून अधिक दैनिक उड्डाणे आणि सुमारे 10.88 लाख प्रवाशांची वाहतूक केली.
गोएयरबद्दल 

वाडिया समुहाच्या एव्हिएशन शाखेचा भाग असणारी गोएयर कमी किमतीच्या कॅरियर मॉडेलच्या स्वरुपात कार्यरत आहे हे मॉडेल दरातील नेतृत्व, कार्यात्मक सक्षमता आणि विश्वासार्हतेची मागणी करते. गोएयर सध्या 24 स्वदेशी आणि 04 आंतरराष्ट्रीय स्थळांवर कार्यरत आहे, त्यामध्ये एयरबस ए320 आणि एयरबस ए320निओचा समावेश होतो. गोएयर प्रवाश्यांना त्यांच्या पैशाचे योग्य ते मूल्य आपल्या सर्वोच्च दर्जाच्या ग्राहक सेवेमार्फत त्याचप्रमाणे माफक एयर फेअर्समार्फत देण्याचा आटोकाट प्रयत्न करते. एयरलाइन नेहमी सुरक्षित आणि सक्षम परिवहनाला आपल्या “स्मार्ट लोकांची एयरलाइन” या घोषणेला दृढ करणाऱ्या सर्व आवश्यक माहितीवर लक्ष देण्यासोबत ती उपलब्ध करुन देण्यासाठी कटिबध्द आहे. इकोनॉमी आणि व्यावसायिक प्रवाश्यांना एकसमान सुधारीत प्रवास अनुभव देण्यासाठी अनेक सेवा देण्यात येतात. गोएयर “फ्लाय स्मार्ट” या थिमनुसार कार्य करण्याची शाश्वती देते. गोएयर अंदाजे 1600 फ्लाइट्स साप्ताहिक तत्वावर जोडते.   

Comments

Popular posts from this blog

Indegene acquires Trilogy Writing & Consulting GmbH, a medical writing consultancy

TiEcon Mumbai 2023, brilliantly showcased revolutionary ideas & impactful solutions to build an Anti-Fragile and Sustainable India

REC DECLARES ITS FINANCIAL RESULTS FOR Q2 & H1 FY24