आयपीआरएस- भारतासाठी गुगलची म्युझिक लायसन्सिंग डिल संपन्न


आयपीआरएस- भारतासाठी गुगलची 
म्युझिक लायसन्सिंग डिल संपन्न 

भारत, 20 मार्च, 2019 - द इंडियन परफॉर्मिंग राइट सोसायटी लिमिटेड (आयपीआरएस)ने गुगलला लायसन्स बहाल केले आहेज्यामुळे कंपनीला भारतामध्ये आयपीआरएस सदस्यांची भारतीय कार्यप्रदर्शने यूट्यूब आणि संबंधित सेवांवर उपयोगात आणण्याची मुभा मिळाली आहे. 

आयपीआरएस भारतातील नोंदणीकृत कॉपीराइट सोसायटी आहे जी संगीत प्रदर्शने आणि शाब्दिक कामांसाठी (लिरीक्स)संगीताच्या कामांशी तसेच लेखकसंगीत निर्मातासंगीत प्रकाशकांचा सहभाग असलेल्या सदस्यांशी संबंधित कॉपीराइट व्यवसाय करते. 

आयपीआरएसचे अध्यक्ष श्री जावेद अख्तर म्हणाले, ”आयपीआरएस-गुगल करार हा भारतीय लेखक आणि संगीत निर्मात्यांसाठी त्याचप्रमाणे संगीत प्रकाशकांसाठी एक ऐतिहासिक टप्पा आहे. भारतीय कलाकारसंगीत प्रकाशक तसेच सृजनशील समुदायाला भारतात दृढ पाठिंबा देण्याबद्दल मी गुगलचे अभिनंदन करतो आणि त्यांचा आभारी आहे. ही गुगलसोबतच्या सशक्त सहयोगाची सुरुवात आहे. आयपीआरएस हा संबंध नीट टिकून राहण्यासाठी आणि भारतातील सृजनशील समुदायाला याचा लाभ होण्याबद्दल वचनबध्द आहे. निर्मात्यांना प्रोत्साहन देण्याचा आणि बाजारपेठ व उपयोगकर्त्यांशी त्यांना जोडण्याचा यूट्यूब हा सर्वात सबळ मार्ग आहे. आयपीआरएस आणि गुगलमधला हा करार त्यांच्या यूट्यूब तसेच इतर संबंधित सेवांसाठी निर्मात्यांना त्याचप्रमाणे आयपीएआरएसच्या सभासदांना स्पष्ट स्वरुपात आणि अर्थपूर्ण पध्दतीने लाभ उपलब्ध करुन देईल.

क्रिस्तोफी मुलरग्लोबल हेड ऑफ म्युझिक लिसनिंगयूट्यूब म्हणाले, ”यूट्यूबच्या निरंतर वचनबध्दतेमधील हे आणखीन एक पाऊल आहेजे लेखकरचनाकारप्रकाशकांना योग्यप्रकारे मानधन मिळण्याची आणि उपयोगकर्ते आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घेऊ शकण्याची व यूट्यूबवर नवीन संगीताचा शोध घेऊ शकण्याची शाश्वती देते. आम्ही आयपीआरएससोबतच्या या महत्वाच्या कराराबद्दल अतिशय आनंदी आहोतज्यामुळे गाण्याच्या लेखकांनाकलाकारांना अधिक मोल मिळेल आणि भारतातल्या संगीत चाहत्यांना एकमेवाद्वितिय अनुभव मिळेल.

आयपीआरएसचे संचालक आणि सारेगामा इंडिया लि.चे सीइओ श्री विक्रम मेहरा म्हणाले, ”ही अतिशय सकारात्मक प्रगती आहे. आयपीआरएस आणि गुगल यांच्यातील त्यांच्या यूट्यूब आणि इतर संबंधित सेवांसाठीचा करार भारतातील कॉपीराइट व्यवस्थेला आणखीन दृढ करेल. भारतीय कलाकारांना त्यांच्या निर्माणाच्या शोधाद्वारे ओळख मिळेल आणि या व्यवस्थेमुळे आयपीआरएस सदस्यांना अधिकाधिक मूल्य मिळेल.

आयपीआरएसचे सीइओ श्री राकेश निगम म्हणाले, “आयपीआरएसचा गुगल सोबतचा करार ऐतिहासिक स्वरुपाचा आहे. आयपीआरएस आणि तिच्या सभासदांना यामुळे लाभ मिळेल. आयपीआरएस लायसन्सिंगने नोंदणीकृत कॉपीराइट सोसायटी आणि सक्षमपणे व पारदर्शकतेने लायसन्सससदस्य आणि जनतेसोबत काम करण्याच्या अनिवार्यतेला असामान्य स्वरुपात वाढवले आहे. हे आणखीन एक पाऊल आहेज्यामुळे आयपीआरएस  भारतातील सबळ कॉपीराइट संस्था असण्याला दुजोरा मिळतो.” 

Comments

Popular posts from this blog

TiEcon Mumbai 2023, brilliantly showcased revolutionary ideas & impactful solutions to build an Anti-Fragile and Sustainable India

REC DECLARES ITS FINANCIAL RESULTS FOR Q2 & H1 FY24

Liberty General Insurance Launches Dedicated 24/7 Helpline <+91-9324968286> for the Victims of Odisha Train Tragedy