क्रिकेटपटू सुनिल गावसकर समाजातील वंचित घटकांच्या 34 मुलांच्या जीवनरक्षक हृदय शस्त्रक्रियांसाठी संपूर्ण आर्थिक मदत करणार

क्रिकेटपटू सुनिल गावसकर समाजातील वंचित घटकांच्या 34 मुलांच्या जीवनरक्षक हृदय शस्त्रक्रियांसाठी संपूर्ण आर्थिक मदत करणार

पश्चिम विभागातील पहिलेच केंद्र कार्यान्वितसर्वांसाठी मोफत सेवा पुरवण्यात येणार
एचडी स्टेथ या ईसीजी इंटिग्रेटेड इंटिलिजंट स्टेथोस्कोपचे लॉचिंग

नवी मुंबईतीलखारघरमध्ये आज श्री सत्य साई संजीवनी इंटरनॅशन सेंटर फॉर चाइल्ड हार्ट केअर सेंटरचे उद्घाटन दिग्गज क्रिकेटपटू सुनिल गावसकर यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी गावसकर यांनी 34 जीवनरक्षक हृदय शस्त्रक्रियांचा संपूर्ण खर्च उचलण्याची घोषणा केली. या बालरोग हृदय शस्त्रक्रिया समाजातील आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या वंचित घटकातील मुलांच्या करण्यात येणार असून त्यासाठी पुढील काही महिन्यांचा अवधी देण्यात आला आहे.

पश्चिम विभागातील हे अशा प्रकारचे पहिलेच अतिशय सुंदर असे सेंटर असून या ठिकाणी मोफत सेवा पुरवण्यात येतील. हे सेंटर श्री सत्य साई बाबांच्या दर्जेदार आरोग्य शुश्रुषेच्या मॉडेलवर आधारीत आहे. सेंटरमध्ये या महिन्यात पुढे पहिली पेडियाट्रिक कार्डियाक शस्त्रक्रिया केली जाणार आहे.

या सेंटरमध्ये जन्मजात हृदयविकार असणार्‍या मुलांवर उपचार केले जाणार आहेतज्यांच्यावर शस्त्रक्रिया आवश्यक आहे. तळागाळात आरोग्यविषयक काम करणार्‍या आरोग्य कर्मचारी आणि अंगणवाडी सेविकांनाही लहान मुलांबाबत कार्डियाक रोगांचे निदान आणि प्राथमिक उपचारांचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यामुळे या विभागात प्राथमिक स्वरुपातील मातृत्व आणि बालक  यांच्या आरोग्य सेवांचा दर्जा सुधारता येईल.

भारतात प्रत्येक वर्षी सुमारे 2 लाख 40 हजार मुले जन्मजात हृदय विकारासह जन्मत असतात. यापैकी सुमारे 40 टक्के बालकांचा मृत्यू 3 वर्षांच्या आतच ओढावतो. याचे कारण म्हणजे महागड़्या आणि सहज उपलब्ध होउ न शकणार्‍या बाल हृदयविकार उपचार सुविधा बहुतेक नागरिकांच्यापर्यंत पोहचूच शकत नाहीत. अशा नागरिकांच्यासाठी श्री सत्य साई संजीवनी हॉस्पिटल्समधील बाल हृदयविकार सुविधा एक वरदान ठरत आहेत. श्री सत्य साई संजीवनी हॉस्पिटल्सची साखळी महाराष्ट्रातील नवी मुंबईछत्तीसगढमधील नया रायपूर आणि हरियाणातील पलवालमध्ये सुरु करण्यात आली आहे. या ठिकाणी भारतात सर्वात मोठ्या प्रमाणावर संपुर्ण मोफत बाल हृदयविकार उपचार सुविधा पुरवण्यात येतात. येथे आतापर्यंत 8 हजार 600 हून अधिक शस्त्रक्रिया आणि कॅथेटर इंटरव्हेंशन पूर्ण करण्यात आली असून 71हजारहून अधिक मुलांवर रुग्ण म्हणून उपचार करण्यात आले आहेत.

नवी मुंबईतील सेंटरच्या उद्घाटनावेळी श्री सत्य साई संजीवनी हॉस्पिटल आणि सेंटर फॉर चाईल्ड हार्ट केअरचे संचालन करणार्‍या श्री सत्य साई आरोग्य आणि शिक्षण ट्रस्टचे अध्यक्ष सी. श्रीनिवास यांनी सांगितले कीही सेंटर्स म्हणजे श्री सत्य साईबाबांचा सामाजिक संदेश आणि त्यांचे दर्जेदार आरोग्य सेवेचे मॉडेल यांचे एक प्रतिक आहे. येथे रुग्णाला धर्मजातपंथराष्ट्रीयत्व आणि लिंग न पाहता त्याला संपूर्णपणे मोफत अशा आरोग्य सेवा उपलब्ध करुन दिल्या जातात.

उद्घाटनावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सुनिल गावसकर म्हणालेया बालकांच्या हृदयास उपचारांची अतिशय आवश्यकता आहे. बाल हृदयविकार उपचार हे देशातील प्रत्येक मुलापर्यंत पोहोचले पाहिजेत. भले ती मुले कोणत्याही सामाजिक किंवा आर्थिक स्तरातील पालकांची असोत. श्री सत्य साई संजीवनी सेंटर आता मुंबईत सुरु होत असून ते लोकांना जीवनरक्षक आरोग्य सेवा उपलब्ध करुन देईल याचे मला अतिशय समाधान वाटत आहे.

यावेळी अमेरिकेतील एचडी मेडिकल कंपनीने बनवलेल्या कार्डियाक मेडिकल डिव्हाईस कम सेवेचेही लाँच करण्यात आले. एचडी स्टेथ नावाचे हे डिव्हाईस म्हणजे ईसीजी इंटिग्रेटेड इंटिलिजंट स्टेथोस्कोप आहे. एचडी मेडिकल कंपनीचे संस्थापक अरविंद थियागाराजन यांनी हे उपकरण तयार केले आहे. एचडी मेडिकलकडून लहान गावे तसेच आदिवासी विभागात काम करणार्‍या रुग्णालयांचे कर्मचारी आणि आरोग्य स्वयंसेवकांना एचडी स्टेथच्या वापराबाबत प्रशिक्षीत करण्यात येत आहे. हे डिव्हाईस म्हणजे एक स्मार्ट स्टेथोस्कोप आहेजो आर्टिफिशिअल इंटिलिजंस म्हणजेच एआय चा वापर करुन टॅबलेट किंवा स्मार्टफोनशी एका अ‍ॅपद्वारे कनेक्ट होउन मुलांमधील ओळखता न येणार्‍या हृदयविकारांचे निदान करतो.

हार्ट टू हार्ट फाउंडेशनचे मॅनेजिंग ट्रस्टी विवेक गौर यांनी सांगितले कीबाल हृदयविकार उपचार हे देशातील सर्व शैक्षणिक किंवा आर्थिक स्तरातील पालकांच्या मुलापर्यंत पोहोचले पाहिजेत. हे उपचार देताना त्यांचे लिंगजातधर्म यांचा विचार केला जाउ नये.

एचडी मेडिकल कंपनीचे संस्थापक अरविंद थियागाराजन म्हणाले, एचडी मेडिकलच्या माध्यमातून आम्ही नेहमीच आमच्या जागतिक पातळीवरील तंत्रज्ञानाचा वापर करुन लोकांचे प्राण बचावण्याच्या हेतूने रोग निदानाबाबत प्रशिक्षणाचे सामाजिक दायित्व निभावत असतो. आम्हाला खात्री वाटते कीएआय चा वापर करणार्‍या एचडी स्टेथसारख्या त्वरीत निदान तंत्रज्ञानामुळे काँगेनिटल हार्ट डिसीझ म्हणजेच सीएचडीचे रोग निदान बालकांमध्ये अगदी प्राथमिक पातळीवर करता येईल. त्यामुळे मुलांवर लवकरात लवकर शस्त्रक्रिया करुन पुढील गुंतागुंतीची परिस्थिती टाळता येउ शकेल.


श्री सत्य साई संजीवनी इंटरनॅशनल सेंटर फॉर चाईल्ड हार्ट केअरविषयी
संजीवनी सेटर्स ही जगातील सर्वात मोठी रुग्णालय श्रृंखला आहेज्यामध्ये जन्मजात बाल हृदयविकाराचे उपचार केले जातात. प्राथमिक आरोग्य सेवा मॉडेलच्या माध्यमातून साई संजीवनी हॉस्पिटल तळागाळापर्यंत आरोग्य सेवा पोहोचवण्याचे आपले उद्दीष्ट साध्य करत आहे.

सन 2012 मध्ये स्थापना करण्यात आलेल्या या सेंटर्सनी आतापर्यंत 78 हजार रुग्णांची तपासणी केली आहे. 6 हजार 771 बाल हृदय शस्त्रक्रिया, 1 हजार 834पेडियाट्रिक कॅथेटर इंटरव्हेंशन्स, 71 हजार मुलांची आरोग्य तपासणी तसेच 13 हजार गर्भवती महिलांना सुरक्षित गर्भावस्था आणि मातृत्वासाठी मार्गदर्शन करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी कृपया भेट द्या:

श्री सत्य साई संजीवनी सेंटर्सचे ध्येय

1. मोफत सेवा उपलब्ध करुन देउन बालकांच्या आरोग्याची देशव्यापी चिंता कमी करणे. भारतासह अनेक विकसनशील देशांमध्ये बाल हृदयविकारांबाबत जागृती निर्माण करुन त्यावर उपचार करणे.
2. जन्मजात बाल हृदयविकारांबाबत माहिती असणारे प्रशिक्षीत वैद्यकीय व्यावसायिकपरिचारीका तसेच संलग्न आरोग्य सेवा पुरवठादार तयार करणे.
3. बाल हृदय शुश्रुषेवर लक्ष केंद्रीत करुन बालकांना आरोग्यदायी बालपण मिळवून देणे. यासाठी संशोधन आणि तंत्रज्ञानाचा वापर करुन आरोग्य विभागात प्रतिबंधात्मक,उपयुक्त आणि शैक्षणिक उपक्रम राबवणे.

Comments

Popular posts from this blog

Indegene acquires Trilogy Writing & Consulting GmbH, a medical writing consultancy

TiEcon Mumbai 2023, brilliantly showcased revolutionary ideas & impactful solutions to build an Anti-Fragile and Sustainable India

REC DECLARES ITS FINANCIAL RESULTS FOR Q2 & H1 FY24