‘स्टार भारत’ वाहिनीवरील ‘जग जननी माँ वैष्णोदेवी- कहानी माता रानी की’ मालिकेद्वारे सुपरस्टार संजय दत्त करणार टीव्हीच्या पडद्यावर पदार्पण!


स्टार भारतवाहिनीवरीलजग जननी माँ वैष्णोदेवी- कहानी माता रानी कीमालिकेद्वारे सुपरस्टार संजय दत्त करणार टीव्हीच्या पडद्यावर पदार्पण!

आपल्या सर्वांच्या लाडक्या मुन्नाभाईच्या भूमिकेद्वारे अभिनेता संजय दत्तने आपल्या हरहुन्नरी अभिनयकौशल्याचे दर्शन सर्वांना घडविले आहे. आपल्या वैशिष्ट्यपूर्ण अभिनयशैलीमुळे असंख्य चाहत्यांचा लाडका अभिनेता बनलेला संजय दत्त आता लवकरच छोट्या पडद्यावरही झळकणार आहे. ‘स्टार भारतवाहिनीवरीलजग जननी माँ वैष्णोदेवी- कहानी माता रानी कीया नव्या पौराणिक मालिकेचे निवेदन संजय दत्त करणार आहे.

पूर्वीच्यादेवों के देवमहादेवआणि सध्या सुरू असलेल्याराधाकृष्णयासारख्या मालिकांच्या प्रसारणाद्वारे सर्वाधिक पौराणिक मालिकांच्या प्रसारणाच्या क्षेत्रातस्टार भारतवाहिनीने आपले स्थान भक्कम केले आहे. आता येत्या 30 सप्टेंबरपासूनस्टार भारतवाहिनीवरूनजग जननी माँ वैष्णोदेवी- कहानी माता रानी कीया नव्या मालिकेचे प्रसारण केले जाणार आहे. 
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या मालिकेचे निवेदन करण्याची संधी मिळत असल्याबद्दल संजय दत्त खूपच उत्सुक झाला आहे. त्याने असे काम पूर्वी कधी केलेले नसल्याने त्याच्यासाठी हा अगदी नवा अनुभव असेल. आपले चाहते आणि प्रेक्षकांनाही आपल्या आवाजातील निवेदन ऐकण्यात आनंद वाटेल, असे त्याला वाटते.
या मालिकेची कथा वैष्णोदेवीच्या जन्माबद्दल असून भगवान शंकरांकडून पृथ्वीचे रक्षण करताना ती नष्ट होण्याचा धोका उत्पन्न झाल्यामुळे माता वैष्णोदेवीचा जन्म कसा झाला, हे यात सादर करण्यात आले आहे.
संजय दत्तने आजवर वास्तव- रिअॅलिटी, मुन्नाभाई एमबीबीएस, लगे रहो मुन्नाभाई यासारखे अनेक सुपरहिट चित्रपट दिले असून अलीकडच्या काळात अग्निपथसारख्या चित्रपटात खलनायकाचीही भूमिका रंगवून सर्वांना चकित केले होते. त्याचवेळी त्याने आपल्या जीवनावरील संजू या चित्रपटात एका गाण्यात छोटे दर्शनही दिले होते. आता त्याचे चाहते त्याला या मालिकेचा निवेदक म्हणून कसा स्वीकारतात, ते पाहायचे.

Comments

Popular posts from this blog

Indegene acquires Trilogy Writing & Consulting GmbH, a medical writing consultancy

TiEcon Mumbai 2023, brilliantly showcased revolutionary ideas & impactful solutions to build an Anti-Fragile and Sustainable India

REC DECLARES ITS FINANCIAL RESULTS FOR Q2 & H1 FY24