सीएसबी बँक लि. प्रारंभी समभाग विक्रीला नोव्हेंबर 22, 2019 रोजी सुरुवात


सीएसबी बँक लिमिटेड (पूर्वीचे नाव कॅथलिक सिरिअन बँक लिमिटेड): प्रारंभी समभाग विक्रीला नोव्हेंबर 22, 2019 रोजी सुरुवात आणि नोव्हेंबर 26, 2019 रोजी विक्री बंद होणार
प्रत्येकी 10 रुपये मूल्याच्या इक्विटी शेअरसाठी किंमतपट्टा 193 रुपये ते 195 रुपये
किमान बोलीचे प्रमाण 75 इक्विटी शेअर्स आहे आणि त्यानंतर 75 इक्विटी शेअर्सच्या पटीत

मुंबई, नोव्हेंबर 19, 2019: सीएसबी बँक लिमिटेडने (“बँक”) नोव्हेंबर 22, 2019 रोजी प्रत्येकी 10 रुपये दर्शनी मूल्य असणाऱ्या इक्विटी शेअर्सच्या (“इक्विटी शेअर्स”) प्रारंभी समभाग विक्रीला (आयपीओ) सुरुवात करायचे ठरवले आहे. अँकर इन्व्हेस्टर बिडिंगची तारिख बिड/ऑफर सुरू होण्याच्या एक वर्किंग डे अगोदर, म्हणजे नोव्हेंबर 21, 2019 रोजी असेल. आयपीओमध्ये 240 दशलक्ष रुपयांपर्यंतच्या फ्रेश इश्यूचा (“फ्रेश इश्यू”) आणि सेलिंग शेअरहोल्डरकडून 19,778,298 पर्यंतच्या इक्विटी शेअर्सच्या ऑफर फॉर सेलचा समावेश आहे (“ऑफर फॉर सेलआणि फ्रेश इश्यूबरोबर  ऑफर असा उल्लेख). बिड/ऑफर नोव्हेंबर 26, 2019 रोजी बंद होणार आहे. किमान बोलीचे प्रमाण 75 इक्विटी शेअर्स आहे आणि त्यानंतर 75 इक्विटी शेअर्सच्या पटीत असेल.

इक्विटी शेअर्स बीएसई लिमिटेड व नॅसनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेड येथे सूचिबद्ध केले जाणार आहेत (“स्टॉक एक्स्चेंजेस”).
ऑफरमधील निव्वळ रकमेचा (“नेट प्रोसीड्स”) वापर भविष्यातील भांडवलाची गरज पूर्ण करण्यासाठी टिअर-1 भांडवल उभारण्यासाठी केला जाणार आहे. ही गरज बँकेच्या मालमत्तांतील वाढ, प्रामुख्याने बँकेची कर्जे/अॅडव्हान्सेस व इन्व्हेस्टमेंट पोर्टफोलिओ यामुळे, तसेच बेसल 3 व आरबीआयची मार्गदर्शक तत्त्वे पूर्ण करण्यासाठी निर्माण होणार आहे. याचबरोबर, ऑफरचे खर्च पूर्ण करण्यासाठी या ऑफरमधून मिळालेल्या रकमेचा वापर केला जाईल.

ऑफरसाठी आयआयएफएल सिक्युरिटीज लिमिटेड व अॅक्सिस कॅपिटल लिमिटेड हे बुक रनिंग लीड मॅनेजर्स (“बीआरएलएम”) आहेत.

ही ऑफर, बदल केल्यानुसार, सिक्युरिटीज काँट्रॅक्ट्स (रेग्युलेशन) रुल्स, 1957च्या रुल 19(2)(b) नुसार (“एससीआरआर”) आणि सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाच्या (इश्यू ऑफ कॅपिटल अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स, 2018, (“सेबी आयसीडीआर रेग्युलेशन्स”) च्या रेग्युलेशन 31 अनुसार राबवली जाणार आहे. ही ऑफर बदल केल्यानुसार, बुक बिल्डिंग प्रोसेसद्वारे, सेबी आयसीडीआर रेग्युलेशनच्या 6(2) नुसार राबवली जाणार असून त्यामध्ये ऑफरपैकी जास्तीत जास्त 75% शेअर्स विशिष्ट प्रमाणात पात्र संस्थात्मक ग्राहकांसाठी (क्यूआयबी पोर्शन) राखून ठेवले जातील. मात्र, बीआरएलएमच्या सल्ल्याने, सेबी आयसीडीआर रेग्युलेशन्सच्या अनुसार, बँक क्यूआयबी कॅटेगरीतील 60% पर्यंतचा भाग अँकर इन्व्हेस्टर्ससाठी विशिष्ट प्रमाणात राखून ठेवू शकते (“अँकर इन्व्हेस्टर पोर्शन”). अँकर इन्व्हेस्टर्सपैकी एक तृतियांश भाग देशांतर्गत म्युच्युअल फंडांसाठी त्यांच्याकडून अँकर इन्व्हेस्टरना दिलेल्या प्राइसनुसार वा त्याहून अधिक प्राइसनुसार (“अँकर इन्व्हेस्टर प्राइस”) आलेल्या वैध बोलींवर उपलब्ध केला जाईल. क्यूआयबी पोर्शनच्या (अँकर इन्व्हेस्टर वगळता) 5% इक्विटी शेअर्स विशिष्ट प्रमाणात केवळ म्युच्युअल फंडांसाठी उपलब्ध होतील आणि क्यूआयबी पोर्शनचा उर्वरित भाग विशिष्ट प्रमाणात म्युच्युअल फंडांसह सर्व क्यूआयबींना (अँकर इन्व्हेस्टर वगळता) त्यांच्याकडून आलेल्या ऑफर प्राइस वा त्याहून अधिक वैध बोलींवर उपलब्ध केला जाईल. ऑफरपैकी किमान 75% भाग क्यूआयबींना न दिल्यास अर्ज केलेली संपूर्ण परत दिली जाईल.
तसेच, सेबी आयसीडीआर रेग्युलेशन्सनुसार, ऑफर प्राइसइतक्या वा त्याहून अधिक रकमेच्या वैध बोलीनुसार, ऑफरपैकी जास्तीत जास्त 15% भाग विशिष्ट प्रमाणात बिगर-संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी राखून ठेवला जाईल आणि जास्तीत जास्त 10% भाग रिटेल इंडिव्हिज्युअल इन्व्हेस्टरसाठी राखून ठेवला जाईल. सर्व बिडरना, अँकर इन्व्हेस्टर वगळता, अॅप्लिकेशन सपोर्टेड बाय ब्लॉक्ड अमाउंट (“एएसबीए”) प्रक्रियेमार्फत या विक्रीमध्ये सहभागी होणे बंधनकारक आहे व यासाठी त्यांना त्यांचा संबंधित बँक खाते क्रमांक द्यावा लागेल. लागू असल्यास, आरआयबीसाठी यूपीआय आयडी द्यावा. ही रक्कम सेल्फ सर्टिफाइड सिंडिकेट बँकांद्वारे (“एससीएसबी”) या खात्यात बोलीची रक्कम ब्लॉक केली जाईल. अँकर इन्व्हेस्टरना एएसबीए प्रक्रियेद्वारे ऑफरमध्ये सहभागी होता येणार नाही.

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

Indegene acquires Trilogy Writing & Consulting GmbH, a medical writing consultancy

TiEcon Mumbai 2023, brilliantly showcased revolutionary ideas & impactful solutions to build an Anti-Fragile and Sustainable India

REC DECLARES ITS FINANCIAL RESULTS FOR Q2 & H1 FY24