'अड्डा२४७' दृष्टिबाधित विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सामग्रीची निर्मिती करणार
'अड्डा२४७' दृष्टिबाधित विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सामग्रीची निर्मिती करणार
~ इंडिक-एआयसह सहयोग; दिव्यांगांना गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी सक्षम बनविण्यावर भर ~
मुंबई, २० मे २०२०: प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत गुणवत्तापूर्ण शिक्षण पोहोचविण्याच्या आपल्या उद्देशाला अनुसरून प्रगती करणारा ऑनलाईन लर्निंग मंच अड्डा२४७ ने इंडिक-एआयच्या सहयोगाने दृष्टिबाधित विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सामग्री निर्माण करण्याची जबाबदारी हाती घेतली आहे. अड्डा२४७ तंत्रज्ञान सक्षम फाउंडेशन इंडिक-एआयला शैक्षणिक सामग्री प्रदान करेल ज्यावर पुढे जाऊन एआय आणि डीप लर्निंगसह पाहण्यासाठी असक्षम विद्यार्थ्यांकरिता योग्य सामग्री बनविण्यासाठी प्रक्रिया करण्यात येईल.
या सहयोगाचा मुख्य उद्देश दिव्यांग विद्यार्थ्यांकरिता शैक्षणिक सामग्री सोप्या रीतीने हाताळण्यासह समजण्यायोग्य बनविण्याचा आहे. यावर्षी दोन्ही एडुटेक भागीदार ४०% पेक्षा जास्त दृष्टी असलेल्या दृष्टिबाधित विद्यार्थ्यांसाठी सामग्री तयार करण्यावर लक्ष केंद्रित करतील. तसेच पुढील वर्षी ऐकण्यास आणि बोलण्यास असक्षम असणा-या दिव्यांग विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण सामग्री उपलब्ध करुन देण्याचा दोघांचा प्रयत्न असेल. दृष्टिबाधित विद्यार्थी त्यांच्या लॅपटॉप / मोबाइल फोनवरील एम्बेड स्क्रीनरीडरद्वारे सहजपणे या सामग्रीचा वापर करू शकतील.
अड्डा२४७चे संस्थापक श्री अनिल नांगर यांनी सांगितले की, 'आम्ही देशभरातील लाखो दिव्यांग विद्यार्थ्यांना योग्य शैक्षणिक सामग्रीचा वापर करण्याकरिता तयार करून प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत त्याच्या गरजेनुसार आमची मदत पोहोचविण्याची कर्तव्यपूर्ती करीत आहोत.'
इंडिक-एआयच्या संस्थापिका सरिता चंद यांनी सांगितले की, 'ही भागीदारी विशेष सामग्रीची निर्मिती करेल जी दिव्यांग विद्यार्थ्यांकरिता सहजपणे उपलब्ध असेल. याद्वारे त्यांना उच्च दर्जाचे शिक्षण मिळण्यास मदत तर होईल शिवाय त्यांना स्वतंत्रपणे कोणताही खर्च करण्याची गरज भासणार नाही. ज्याद्वारे त्यांना मार्गदर्शक तसेच रोजगाराच्या संधी देखील मिळतील. हा एक असा उपक्रम आहे जो भारतातील दिव्यांग विद्यार्थ्यांना सक्षम बनविण्याच्या दिशेने पुढे जात राहील.'
Comments
Post a Comment