भारतात कोविड 19 वरील पहिले जेनेरिक औषध ‘कोविफॉर’ (रेमडेसिविर) ला मंजुरी मिळाल्याची आणि सादर केल्याची हेटेरोची घोषणा

भारतात कोविड 19 वरील पहिले जेनेरिक औषध ‘कोविफॉर’ (रेमडेसिविर) ला मंजुरी मिळाल्याची आणि 
सादर केल्याची हेटेरोची घोषणा

 

हैदराबाद, भारत; 21 जून 2020- देशातील आघाडीची जेनेरिक औषध निर्मिती कंपनी असलेल्या हेटेरोने आज घोषणा केली की, भारतीय औषध महानियंत्रकांकडून (डीसीजीआय) कोविड 19 वरील उपचारासाठी  ‘रेमडेसिविर’ या अन्वेषणात्मक विषाणूरोधी औषधाच्या निर्मिती आणि विपणनाला परवानगी मिळाली आहे. हेटेरोचे जेनेरिक औषध रेमडेसिविरची भारतात ‘कोविफॉर’ या नावे विक्री केली जाणार आहे.

हेटेरो ग्रुप ऑफ कंपनीचे चेअरमन डॉ. बी. पार्थ सारथी रेड्डी म्हणाले, “देशातल्या कोविड 19 च्या रुग्णांची वाढती संख्या पाहता ‘कोविफॉर’ (रेमडेसिविर)ला मिळालेली मान्यता तिच्या प्रयोगशाळेतील चाचण्यांचे निष्कर्ष पाहता मोठ्या प्रमाणात चांगले बदल घडवून आणेल, अशी शक्यता आहे. हे उत्पादन देशभरातील ग्राहकांसाठी लगेच उपलब्ध असेल यासाठी आम्ही प्रयत्न करू. सध्याची गरज पाहता पुरेसा साठा उपलब्ध असेल याची आम्ही काळजी घेऊ. कोविड 19 विरोधातील लढ्यात महत्त्वपूर्ण कामगिरी बजावण्यासाठी आम्ही सरकार आणि वैद्यकीय क्षेत्रासोबत सातत्याने काम करत राहू. माननीय प्रधानमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे ‘मेक इन इंडिया’ मोहिमेला धरुन देशातच या औषधाची निर्मिती करण्यात आली आहे.”

कोविड 19 च्या लहान आणि मोठ्या, गंभीर लक्षणांमुळे रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांवर, संशयित किंवा प्रयोगशाळेत सिद्ध झालेल्या रुग्णांवर उपचारासाठी ‘रेमडेसिविर’ या औषधाला डीसीजीआयने मंजुरी दिली आहे. ‘कोविफॉर’ (रेमडेसिविर) 100 मिली ग्रॅमच्या व्हायलमध्ये (इंजेक्शन देण्यायोग्य) उपलब्ध असेल आणि वैद्यकीय तज्ञाच्या निरीक्षणाखाली रुग्णालयात हे औषध दिले गेले पाहिजे.

कोविड 19 वरील उपचार कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशातील नागरिकांसाठी उपलब्ध व्हावे यासाठी गीलिड सायन्स इन्क. सोबतच्या परवाना करारातून हे औषध सादर करण्यात आले आहे.

Comments

Popular posts from this blog

Indegene acquires Trilogy Writing & Consulting GmbH, a medical writing consultancy

TiEcon Mumbai 2023, brilliantly showcased revolutionary ideas & impactful solutions to build an Anti-Fragile and Sustainable India

REC DECLARES ITS FINANCIAL RESULTS FOR Q2 & H1 FY24