एयरटेल ने लट्टू किड्स लर्निंग एप मध्ये स्टेक अभिग्रहण द्वारे

एयरटेल ने लट्टू किड्स लर्निंग एप मध्ये स्टेक अभिग्रहण द्वारे

एडटेकला आपल्या डिजिटल पोर्टफोलियो मध्ये जोडले

ह्यांच्या द्वारे एयरटेल  आपल्या नेटवर्क वर  प्रीमियम डिजिटल शिक्षण सामग्री उपलब्ध करेल ज्याने भारतभरातील लाखों  मुलांसाठी शिक्षण एक मनोरंजन बनेल

लट्टू किड्स एयरटेल स्टार्टअप एक्सेलेरेटर प्रोग्राम मध्ये सामील होणारी चौथी कंपनी बनली आहे

मुंबई, 18 जून, 2020 : भारती एअरटेलने (“एअरटेल”)  स्टार्टअप एक्सलरेटर प्रोग्रामच्या भागातून एडटेक स्टार्टअप लट्टू मीडिया प्रायव्हेट लिमिटेड (“लट्टू किड्स”) मध्ये मोक्याचा हिस्सा घेतल्याचे आज सांगितले,” मुंबईतील लट्टू किड्स मुलांसाठी डिजिटल लर्निंग टूल्समध्ये माहिर आहेत. त्यांचा अत्यंत लोकप्रिय लट्टू किड्स अ‍ॅप मनोरंजन, मजेदार अ‍ॅनिमेटेड व्हिडिओ आणि गेमद्वारे 10 वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी इंग्रजी शब्दसंग्रह, इंग्रजी वाचन आणि गणित कौशल्ये सुधारण्यावर लक्ष केंद्रित करतो.



जगात 500 मिलियन हून अधिक  माणसे इंटरनेट वापरतात आणि भारत इंटरनेट वापरण्या मध्ये जगातील दुसर्‍या क्रमांकावर असून, परवडणारे स्मार्टफोन आणि जागतिक स्तरावर सर्वात कमी 4 जी डेटा दर आहेत.

त्यामुळेच इंटरनेट द्वारे ऑनलाईन शिकण्याची साधने मोठ्या प्रमाणात वापरली जाऊ शकतात.

कोविड19  मुळे शाळा बंद असल्यामुळे आभासी वर्गखोल्यांचा अवलंब करण्यास आणि डिजिटल सक्षम शिक्षणास आणखी वेग आला आहे. असा अंदाज आहे की 2021 पर्यंत भारतात एडटेक दो बिलियन यूएस डॉलर्सचे उद्योग बनतील.

या गुंतवणूकीमुळे एअरटेल त्याच्या प्रीमियम डिजिटल सामग्रीच्या पोर्टफोलिओमध्ये एडटेकची भर घालू शकेल आणि लट्टू किड्स कडून दर्जेदार शिक्षण सामग्रीस वितरण स्केल प्रदान करेल. एअरटेलचे आधीपासूनच एअरटेल थँक्स अॅप, एअरटेल एक्सस्ट्रीम अ‍ॅप आणि विंक  म्युझिक असे160 मिलियन हून अधिक मासिक सक्रिय वापरकर्ते त्यांच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आहेत .



भारती एअरटेलचे चीफ प्रॉडक्ट ऑफिसर आदर्श नायर म्हणाले, “एअरटेलमध्ये आम्ही आमच्या डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे स्टार्ट-अप इकोसिस्टमच्या वाढीस पाठिंबा देऊ इच्छितो. आणि आता नेहमीपेक्षा, ऑनलाईन शिक्षण ही लाखों तरुण मुलांची नियमित गरज आहे. आमचा विश्वास आहे की लट्टू किड्स ऑनलाईन शिक्षणाच्या क्षेत्रात सकारात्मक परिणाम करू शकतात आणि  त्यांना आमच्या एक्सलरेटर प्रोग्राम मध्ये घेऊन त्याच्या विकासात भागीदार होण्यास आम्ही उत्सुकत आहोत. ”

लट्टू किड्सचे सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भूतयानी म्हणाले, “ लट्टू किड्स बरोबर आमचा व्हिजन
नर्सरी ते वर्ग 2 मधील लहान मुलांच्या शिक्षणाची क्षमता वाढवणे
आणि भारतात डिजिटल सामग्री, गेमिंग आणि तंत्रज्ञान वापरुन या श्रेणीचे नेतृत्व करणे हे आहे . एअरटेल च्या साहाय्याने आम्हाला एक  उत्कट जोडीदारही सापडला आहे आणि हया क्षेत्रातील  आमचे सहकार्य आम्हाला भारतातील कोट्यावधी  मुलानंमध्ये लट्टूला  पोहचविण्यास  मदत करेल आणि त्याला विकसित आवडता एडटेक ब्रँड बनवू शकेल. ”
लट्टू किड्स एयरटेल स्टार्टअप एक्सेलेरेटर प्रोग्राम मध्ये सामील होणारी चौथी कंपनी बनली आहे, जे डेटा, वितरण, नेटवर्क आणि पेमेंट्स मधील मुख्य सामर्थ्यांसह एअरटेलच्या मजबूत पर्यावरणातील लाभ घेण्यासाठी स्टार्ट-अपला परवानगी देते.
--------------------------------------------------------------------------

Comments

Popular posts from this blog

Indegene acquires Trilogy Writing & Consulting GmbH, a medical writing consultancy

TiEcon Mumbai 2023, brilliantly showcased revolutionary ideas & impactful solutions to build an Anti-Fragile and Sustainable India

REC DECLARES ITS FINANCIAL RESULTS FOR Q2 & H1 FY24