कोविड– 19 महासाथीच्या प्रादुर्भावातही फ्युचर जनराली इंडिया इन्शुरन्सकडून सर्व कर्मचा-यांसाठी पगारवाढीची घोषणा

कोविड– 19 महासाथीच्या प्रादुर्भावातही फ्युचर जनराली इंडिया इन्शुरन्सकडून  सर्व कर्मचा-यांसाठी पगारवाढीची घोषणा

मुंबई: 08 जुलै, 2020: सध्याच्या आर्थिक संकटकाळातही फ्युचरजनराली इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड (एफजीआयआय) या रिटेल क्षेत्रातील मातब्बर फ्युचर ग्रुप आणि ग्लोबल इन्शुरर जनराली यांच्या जनरल इन्शुरन्समधील संयुक्त भागीदारीने सर्व कर्मचा-यांसाठी पदोन्नती, वार्षिक पगारवाढ आणि विविध प्रकारच्या आर्थिक लाभांची घोषणा केली. सध्याच्या अनिश्चित आणि अस्थिर काळात कोणत्याही कर्मचा-याला कामावरून कमी करण्यात येणार नसल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.
कंपनीने आपल्या बिझनेस-अॅक्टीव्हएजंट आणि त्यांच्या कुटुंबियांची कोविड– 19 चाचणी पॉझिटिव्ह आल्यास तात्काळ मदतनिधी म्हणू नप्रत्ये की रु. 50,000 ची तरतूद केली आहे.
भारतात कंपनीच्या 125 हून अधिक शाखा असून त्यांनी आपल्या व्यावसायिक आवश्यकतेनुसार कर्मचा-यांची नियुक्ती करणे तसेच नोकऱ्यांची संधी उपलब्ध करून देण्यात कोणतीही तडजोड न करण्याचा निर्णय घेतलाआहे. टाळेबंदीच्या प्रत्येक टप्प्यात एफजीआयआयच्या विविध पातळ्यांवर कार्यरत असणारे 70 हून अधिक कर्मचारी सहभागिता, मुलाखती घेणे, नियुक्ती करणे तसेच प्रेरणा देण्यासाठी विविध डिजीटल माध्यमांच्या सोबतीने काम करत आहेत. अन्य वर्षाप्रमाणे यंदादेखील कर्मचारी नियुक्ती प्रक्रिया कंपनी सुरू ठेवणार आहे.
एफजीआयआयच्या वतीने कर्मचा-यांचे टाळेबंदीच्या काळातील आरोग्य हित आणि सहभागितेच्या दिशेने विविधांगी उपक्रम राबविण्यात आले. कंपनीने कर्मचारी वर्ग आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी गोपनीय सल्लाविषयकहेल्पलाईनची सुरुवात केली. जेणेकरूनमहासाथीच्याउद्रेकादरम्यान उद्भवलेले नैराश्य, तणाव किंवा कार्यालयीन कामकाज  यांच्यातील ताळमेळ साधणेत्यांनाशक्य होईल. याशिवाय शारीरिक तसेच मानसिक स्वास्थ्याकरिता योगा सरावांची लाइव्ह सत्रे आयोजित करण्यात आली. तसेच विविध सहभागिता कार्यक्रम जसे की,टॅलेंटशो आणि व्हर्च्युअल प्रशिक्षण सत्रे उपलब्ध करून दिली आहेत. ज्यामुळे घरातून काम करताना (वर्कफ्रॉम होम) त्यांना एकमेकांच्यासंपर्कात राहणे आणि शिकणे शक्य होणार आहे.
फ्युचर जनराली इंडिया इन्शुरन्सचे एमडी आणि सीईओ अनुप राऊ म्हणाले की, “आम्ही पीपल-फर्स्ट कंपनी आहोत. अगदी सीएक्सओपासून ते आमच्या हाऊसकिपिंग स्टाफपर्यंत प्रत्येक कर्मचाऱ्याला त्यांच्या कामाचे योग्य ते श्रेय,बोनस आणि पगारवाढ मिळेल याची आम्ही खातरजमा करतो. एखादी कंपनी कर्मचारी-केंद्री असल्याशिवाय ग्राहककेंद्री बनू शकत नाही, त्यांच्यातील परस्परसंबंधांवर आमचा विश्वास आहे. अगोदरपेक्षा आजच्या घडीला आमचा कर्मचारी वर्ग आणि सहयोगींना आयुष्यात निश्चितता आणि स्थैर्यहवे आहे. संघटना निर्मितीकडे पाहण्याचा आमचा दृष्टिकोन दीर्घकालीन असून अनिश्चितता हाताळण्यासाठी प्रयत्नशील आहोत. आमचे मुलभूत तत्त्व बळकट आहे. बाजारपेठेमधील नवीन वास्तवांना प्रतिसाद देण्याची क्षमता आहे.”

Comments

Popular posts from this blog

Indegene acquires Trilogy Writing & Consulting GmbH, a medical writing consultancy

TiEcon Mumbai 2023, brilliantly showcased revolutionary ideas & impactful solutions to build an Anti-Fragile and Sustainable India

REC DECLARES ITS FINANCIAL RESULTS FOR Q2 & H1 FY24