“कनेक्टिंग फॉर पेस” वर एक वर्चुअल समिटचे आयोजन केले
आंतरराष्ट्रीय शांतता दिनानिमित्त हार्टफुलनेस इंस्टीट्यूट ने
“कनेक्टिंग फॉर पेस” वर एक वर्चुअल समिटचे आयोजन केले
मुंबई, 22 सप्टेंबर 2020 - शांततेची आपल्याला गरज आहे व शांतता आपल्याला हवी आहे म्हणूनच संयुक्त राष्ट्रांच्या माहिती केंद्र, ग्लोबल सिटिझन्स इंडिया, गीव इंडिया, स्प्रिट ऑफ ह्युमॅनिटी फोरम, द फेटझर इन्स्टिट्यूट, सेवा इंटरनॅशनल आणि गांधी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय शांतता दिन साजरा करण्यासाठी हार्टफुलनेस इन्स्टिट्यूटने ‘# कनेक्टिंग फॉर पेस’ या विषयावर व्हर्च्युअल समिट आयोजित केले होते.
या कार्यक्रमावेळी जगातील शांततेची गरज व भूमिका याबद्दल चर्चा करण्यासाठी दाजी, जेव्हिएर झनेट्टी, दीपक चोपडा, बीके सिस्टर शिवानी, शेरॉन साल्झबर्ग, माता अमृतानंदमयी, ब्रूस लिप्टन, अॅमॅडिन रोचे, बॉब बोइश्चर, थॉमस डी अॅन्सेंबॉर्ग, मार्टा बॅसिनो, आणि मिशेला मोओली यांच्यासह जागतिक विचारांचे नेते एकत्र आले.. अभिनेता आणि दिग्दर्शक शेखर कपूर यांनी हा कार्यक्रम अँकर केला होता.
त्यानंतर 24 वेगवेगळ्या भाषांमधील 100 पेक्षा जास्त देशांमध्ये सिंक्रोनाइझ मार्गदर्शित ध्यान साधनेनंतर ही चर्चा झाली. जागतिक सत्रात मुले, विद्यार्थी, क्रीडापटू, शिक्षणतज्ज्ञ, संगीतकार, अभिनेते, पत्रकार आणि आध्यात्मिक नेते अशा विविध क्षेत्रांतील लोकांनी शांततेचे समर्थन दर्शविले. हायलाइट म्हणजे वेगवेगळ्या वयोगटातील आणि जातीच्या मुलांनी त्यांचे विचार आणि शांतीच्या समजदारी बद्धल आपले विचार मांडले.मुले म्हणाली,“ जर मला तीन इच्छा मिळाल्या असत्या तर त्या हया असत्या (1) जगात शांती असणे (2) सर्व मुलांना त्यांचे हक्क माहित असावेत (3) सर्व मुलांना शिक्षण मिळायला हवे. ”
चित्रपट निर्माते आणि अभिनेते श्री. शेखर कपूर यांनी जगभरातील कोट्यावधी सहभागींचे स्वागत केले. ते म्हणाले, “शांती ही अशी एक गोष्ट आहे जी आपण सर्व जण तिची आतुरतेने वाट पाहत असतो, आणि आपल्या मध्ये त्या सर्वांची भिन्न समज आहे. जसे कि ती आपल्यात आहे, जागतिक शांतता आहे, पर्यावरणाची शांती आहे कि ही तुमच्या अंत: करणाची शांती आहे.”
Comments
Post a Comment