गिरनारसॉफ्ट इन्‍शुरन्‍सदेखोमध्‍ये २० दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक करणार

 गिरनारसॉफ्ट इन्‍शुरन्‍सदेखोमध्‍ये २० दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक करणार  

भारताच्‍या आघाडीच्‍या इन्‍शुअरटेक कंपन्‍यांपैकी एक असलेली इन्‍शुरन्‍सदेखो तिचे ब्रॅण्‍ड व तंत्रज्ञान कौशल्‍य वाढवण्‍यासाठी निधीचा उपयोग करणार 

२२ सप्‍टेंबर २०२०: गिरनारसॉफ्ट या आघाडीच्‍या ऑटो प्रॉपर्टीज CarDekho.com, Zigwheels.com व gaadi.com साठी ओळखल्‍या जाणा-या कंपनीने तिची उपकंपनी इन्‍शुरन्‍सदेखो या भारताच्‍या आघाडीच्‍या ओम्‍नी चॅनेल इन्‍शुरन्‍स व्‍यासपीठामध्‍ये २० दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक करण्‍याच्‍या योजनांची घोषणा केली. ते त्‍यांचे तंत्रज्ञान, उत्‍पादन आणि विक्री टीम्‍सचे ब्रॅण्डिंग व सक्षमीकरणामध्‍ये गुंतवणूक करण्‍यासाठी या निधीचा उपयोग करणार आहेत. 

इन्‍शुरन्‍सदेखो ऑनलाइन व ऑफलाइन वितरण नेटवर्कचा लाभ घेत अद्वितीय सल्‍ला-आधारित मॉडेलच्‍या माध्‍यमातून विमाची विक्री करते. हे निधी इन्‍शुरन्‍सदेखोचा व्‍यवहार व्‍यवसाय प्रबळ करण्‍यासाठी आणि देशभरातील उपस्थिती वाढवण्‍यासाठी वापरण्‍यात येतील. इन्‍शुरन्‍सदेखोने नुकतेच देशभरात १ लाख विमा सल्‍लागार कार्यरत करण्‍याच्‍या योजनांची घोषणा केली. त्‍यांच्‍याकडे यापूर्वीच यशस्‍वीरित्‍या २०,००० सल्‍लागारांची नोंदणी झाली आहे. 

''इन्‍शुरन्‍सदेखो कंपनी इकोप्रणालीला पूर्ण करण्‍यासाठी छोटासा उपक्रम म्‍हणून सुरू झाली. वर्षानुवर्षे अंकित यांच्‍या नेतृत्‍वांतर्गत कंपनीने स्‍वत:चे नावलौकिक केले आहे आणि आता देशातील आघाडीच्‍या इन्शुअरटेक कंपन्‍यांमध्‍ये सामील आहे. त्‍यांनी कारदेखोची भांडवल कार्यक्षमता व तंत्रज्ञान कौशल्‍य आत्‍मसात केले, पण त्‍यांचे स्‍वत:चे मोठे व स्‍वतंत्र व्‍यवसाय निर्माण करत आहेत. हे प्रस्‍तावित निधी भारतामध्‍ये भारताचे सर्वात सर्वसमावेशक इन्‍शुअरटेक व्‍यवसाय निर्माण करण्‍याच्‍या त्‍यांच्‍या क्षमतांमधील आमच्‍या आत्‍मविश्‍वासाला दाखवतात,'' असे गिरनारसॉफ्टचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी व सह-संस्‍थापक अमित जैन म्‍हणाले.  

''आमच्‍या प्रवासातील पहिल्‍या टप्‍प्‍यामध्‍ये आम्‍ही विमा ग्राहक, भारताची आघाडीची विमा कंपनी आणि वितरण भागीदार असे अद्वितीय त्रिसूत्री बाजारस्‍थळ निर्माण केले. आमच्‍या प्रत्‍येक भागधारकाचा विश्‍वास असलेले उद्योगक्षेत्रातील अग्रणी तंत्रज्ञान साठा व व्‍यासपीठ निर्माण करण्‍यावर आमचा फोकस होता. कमी खर्चिक कंपनी असताना देखील आम्‍ही भारताची आघाडीची इन्‍शुअरटेक कंपनी बनलो आहोत. आमचा अद्वितीय सल्‍लामसलत दृष्टिकोन, तसेच विमा उद्योगक्षेत्रामध्‍ये दिसून येत असलेली अनूकूलता मोठे, लाभदायी व प्रभावी व्‍यवसाय निर्माण करण्‍याची दुर्मिळ संधी देतात.  

ही नवीन भांडवल गुंतवणूक आमची डिजिटल उपस्थिती वाढवण्‍यासाठी वापरण्‍यात येईल. आम्‍ही बी२बी क्षेत्रासोबत सहयोग जोडत आहोत. यावेळी आमचा गेल्‍या २ तिमाहींमध्‍ये प्रबळ प्राधान्‍य दिले जात असलेले आमचे बी२सी व्‍यासपीठ अधिक प्रबळ करण्‍यासाठी ब्रॅण्डिंग व विपणनामध्‍ये गुंतवणूक करण्‍याचा मनसुबा आहे,'' असे इन्‍शुरन्‍सदेखोचे मुख्य कार्यकारी अधिकारी व सह-संस्‍थापक अंकित अग्रवाल म्‍हणाले.  

Comments

Popular posts from this blog

Indegene acquires Trilogy Writing & Consulting GmbH, a medical writing consultancy

TiEcon Mumbai 2023, brilliantly showcased revolutionary ideas & impactful solutions to build an Anti-Fragile and Sustainable India

REC DECLARES ITS FINANCIAL RESULTS FOR Q2 & H1 FY24