युनियन म्युच्युअल फंडातर्फे भारताच्या वाढत्या कंझम्पशन चक्राला चालना देण्यासाठी युनियन कंझम्पशन फंड लाँच
युनियन म्युच्युअल फंडातर्फे भारताच्या वाढत्या कंझम्पशन चक्राला चालना देण्यासाठी
युनियन कंझम्पशन फंड लाँच
मुंबई, 1 डिसेंबर 2025 –युनियन म्युच्युअल फंडातर्फे युनियन कंझम्पशन फंड ही नवी ओपन- एंडेड इक्विटी योजना लाँच करण्यात आली असून ती कंझम्पशन संकल्पनेवर आधारित आहे. न्यू फंड ऑफर (एनएफओ) 1 डिसेंबर 2025 रोजी सुरू होणार असून 15 डिसेंबर 2025 रोजी बंद होणार आहे. हे लाँच भारतातील अर्थव्यवस्था एका महत्त्वाच्या वळणावर असताना करण्यात आले असून त्यात गेल्या एका वर्षात सरकारने जाहीर केलेल्या 5 मोठ्या उपक्रमांचा मेळ घालण्यात आला आहे.
आर्थिक वर्ष 26 मधील कमी झालेला कर, जीएसटी 2.0 ची पुनर्रचना, आठवा वेतन आयोग, कमी महागाईतील सातत्य, आरबीआयची सुसंगत धोरणे आणि चांगला पावसाळा असे मार्गदर्शक घटक कंझम्पशनमधे बदल घडवू शकतात. कंझम्पशन इंडेक्सने गेल्या 19 वर्षांत 13 वेळा व्यापक बाजारपेठेपेक्षा चांगली कामगिरी केली आहे. 2019 आणि 2024 दरम्यान निफ्टी इंडिया कंझम्पशन टीआरआयने 14.7 टक्क्यांच्या इक्विटीवर सरासरी परतावे दिले आहेत व हे प्रमाण 12.5 टक्क्यांच्या सरासरी व्यापक निफ्टी 500 इंडेक्सपेक्षा जास्त आहे. (स्त्रोत – ब्लूमबर्ग)
या फंडाविषयी युनियन असेट मॅनेजमेंट कंपनी प्रायव्हेट लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. मधू नायर (युनियन एएमसी) म्हणाले, ‘भारत सरकारने जाहीर केलेल्या 5 मोठ्या व संरचनात्मक बदलांच्या पार्श्वभूमीवर, भारत व्यापक कंझम्पशनमधे मोठ्या बदलाच्या उंबरठ्यावर आहे. आमचे आर. आय. एस. ई फ्रेमवर्क या कंझम्पशन संकल्पेचा चांगला लाभ करून घेण्यासाठी सक्षम आहे. ग्राहक वर्गाचा विस्तार, सर्वसामान्य ते प्रीमियम असे झालेले स्थित्यंतर, मार्केटप्लेसेसचे डिजिटलायझेशन यांतून एकत्रितपणे सर्वात दमदार, बहुदशकीय गुंतवणूक स्थापित होऊ शकते. युनियन कंझम्पशन फंडाद्वारे आम्ही गुंतवणुकदारांना या प्रवासात सहभागी होण्याचा शिस्तबद्ध आणि वैविध्यपूर्ण मार्ग उपलब्ध करून देत आहोत, जिथे खर्च केलेला प्रत्येक रुपया प्रगतीसाठी योगदान देईल.’
युनियन कंझम्पशन फंडाद्वारे (युसीएफ) कंझम्पशनच्या उपविभागांत राइज (RISE) फ्रेमवर्कच्या माध्यमातून म्हणजेच – रीच, इंटरमीडिएट्स, स्पेंड अप आणि एक्सपिरीयन्समधून गुंतवणूक करण्याचे ध्येय ठेवण्यात आले आहेत. भारताची खर्च करण्याची, जगण्याची आणि महत्त्वाकांक्षांची पद्धतीचा लाभ या योजनेद्वारे घेतला जाणार आहे.
आर - रीच (व्याप्ती)– कंपन्या माल व सुविधा व्यापक प्रमाणात उपलब्ध करून देत आहेत – उदा. ग्राहकोपयोगी वस्तू, पॅकेज खाद्यपदार्थ आणि जलद सेवा देणारी रेस्टॉरंट्स.
आय – इंटरमीडिएट्स (अनेब्लर्स)– कंझम्पशनला चालना देणारे व्यवसाय – डिजिटल प्लॅटफॉर्म्स, फिनटेक कंपन्या आणि आर्थिक इंटरमीजिएटरीज
एस – स्पेंड (प्रीमियमायझेशन) –एसयूव्ही आणि रियल इस्टेटसारख्या महत्त्वाकांक्षी आणि उच्च मूल्य विभागांना सेवा देणाऱ्या कंपन्या
ई – एक्सपिरीयन्स (कन्झ्युमर सर्व्हिसेस) –जीवनशैली आणि वेगवेगळ्या अनुभवांवर आधारित खर्चाचा समावेश असलेली क्षेत्रे – पर्यटन, हॉस्पिटॅलिटी आणि मनोरंजन.
भारतातील दरडोई उत्पन्न 2008 पासून तिप्पट झाले आहे आणि आर्थिक वर्ष 2030 पर्यंत आणखी 1.6 पटींनी वाढेल असा अंदाज आयएमएफ वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलूक डेटाने वर्तवला आहे. उच्च मध्यम आणि उच्च उत्पन्न घरांत तसेच मध्यम उत्पन्न घरांची संख्या 2023 मधील 11.3 कोटींवरून 2030 मधे 18 कोटींपर्यंत वाढेल असा अंदाज आहे. त्यावरून देशातील सर्वाधिक कंझम्पशन वर्गात 60 टक्के वाढ होईल.
युनियन कंझम्पशन फंड भारताच्या अर्थव्यवस्थेत होत असलेल्या संरचनात्मक बदलांशी सुसंगत पोर्टफोलिओत गुंतवणूक करू इच्छिणाऱ्यां गुंतवणुकदारांसाठी आदर्श आहे. ही योजना वेगवेगळे कंझम्पशन टचपॉइंट्स उपलब्ध करून देणार असून त्यात सामान्य बाजारपेठांपासून महत्त्वाकांक्षी विभागांपर्यंतचा समावेश आहे. यामुळे स्थिर तसेच उच्च प्रगतीच्या संधींमधे भाग घेण्याची संधी मिळेल. या योजनेचे व्यवस्थापन इक्विटीचे फंड मॅनेजर श्री. विनोद मालवीया आणि श्री. संजय बेंबाळकर, युनियन एएमसीचे इक्विटी प्रमुख हाताळतील.
Comments
Post a Comment