​किया मोटर्स इंडियाकडून (केएमआय) दोन वरिष्ठ व्यवस्थापकांच्या नियुक्तिची घोषणा

किया मोटर्स इंडियाकडून (केएमआय) दोन वरिष्ठ व्यवस्थापकांच्या नियुक्तिची घोषणा


 किया मोटर्स इंडियाकडून (केएमआय) आज मनोहर भट यांची मार्केटिंग आणि सेल्स विभाग प्रमुखपदी तर योंग एस. किम यांची कार्यकारी संचालकपदी नियुक्ती करण्यात आली. या नियुक्त्या तातडीने रुजू करण्यात आल्या आहेत. नवीन दोन अधिकारी केएमआय मध्ये प्रमुख वरिष्ठ व्यवस्थापन टीमचा भाग बनतील. त्यांच्यावर भारतामध्ये मार्केटिंग आणि सेल्स विभागाची जबाबदारी राहणार आहे.
मनोहर भट किया मोटर्स इंडियामध्ये मार्केटिंग आणि सेल्स विभागाचे प्रमुख म्हणून काम पाहणार आहेत. ते मार्केटिंगविक्री आणि विक्रीपश्चारत सेवेची जबाबदारी सांभाळतील. भारतामध्ये किया कंपनीचे नाव घराघरांमध्ये पोहोचवण्यासाठी काम करतील.
भट यांना त्यांच्याकडील तब्बल 25 वर्षांच्या अनुभवामुळे ऑटोमोटिव उद्योगातील एक दिग्गज म्हणून ओळखले जाते. त्यांनी भारतातील आघाडीच्या वाहननिर्मिती कंपन्यांकडे मार्केटिंग आणि सेल्स विभागाचा प्रमुख म्हणून काम केले आहे.
योंग एस. किम यांच्यावर विक्री विभागाचे कामकाज पाहण्याची जबाबदारी असेल. केएमआय च्या दीर्घकालीन धोरणाचा एक भाग म्हणून किम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते कंपनीचा भारतातील व्यवसाय आणि किया मोटर्स कॉर्पोरेशनचे दक्षिण कोरियातील मुख्य कार्यालय यांच्यातील समन्वयक म्हणून काम पाहतील. किम भारतीय बाजारपेठेत केएमआयचे स्थान अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीकोनातून कॉर्पोरेट पातळीवर मार्केटिंग आणि सेल्स विभागामध्ये समन्वय ठेवण्याचे काम करतील.
किम यांना केएमआय साठी जागतिक पातळीवर विविध देशांमध्ये वरिष्ठ स्तरावर काम करण्याचा तीस वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी करियरमधील सुरुवातीच्या दिवसांमध्ये भारतामध्ये काम केले असल्यामुळे त्यांना येथील बाजारपेठेचे सखोल ज्ञान आहे. त्यामुळे किम कियाच्या भारतामधील यशामध्ये महत्वाची भूमिका बजावू शकतात. जी लवकरच जगातील तिसर्‍या क्रमांकाची सर्वात मोठी ऑटो बाजारपेठ म्हणून ओळखली जाणार आहे.
नवीन नियुक्त्यांबाबत माहिती देताना केएमआय चे कार्यकारी संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी कुख्युन शिम यांनी सांगितले की, ”योंग किम आणि मनोहर भट यांची व्यवस्थापनातील वरिष्ठ पदावर नियुक्ती करुन केएमआयने त्यांच्या भारतातील मोठ्या योजनांबाबत पाठपुरावा सुरु केला आहे. नवीन अधिकार्‍यांना केवायएमच्या दुरदृष्टीची चांगलीच जाणीव आहे. किया हा कार ब्रँड जगभरात एक डायनामिकयुवा आणि स्टायलीश म्हणून ओळखला जातो. कमालीचा सकारात्मक दृष्टीकोन असणारे मनोहर भट किया ब्रँडसाठी परिपूर्ण व्यवस्थापक आहेत जे आमची ताकद अधिकाधिक वृध्दींगत करतील.
केएमआय मध्ये रुजू होण्याबाबत बोलताना भट यांनी सांगितले की, “माझ्यासाठी खूपच आव्हानात्मक रोल आहे. भारतातील सर्व श्रेणीच्या ग्राहकांसाठी किया हा पहिल्या पसंतीचा ब्रँड बनवण्यासाठी मी फार उत्सुक आहे. आम्ही भारतीय बाजारपेठेत ब्रँड उतरवल्यावर भरीव कामगिरी करुन मोठा वाटा मिळवूच याशिवाय नवीन ग्राहकांना अधिकाधिक आकर्षित करण्यातही यशस्वी होउ.

Comments

Popular posts from this blog

Indegene acquires Trilogy Writing & Consulting GmbH, a medical writing consultancy

TiEcon Mumbai 2023, brilliantly showcased revolutionary ideas & impactful solutions to build an Anti-Fragile and Sustainable India

REC DECLARES ITS FINANCIAL RESULTS FOR Q2 & H1 FY24