‘महिंद्रा हॅपीनेस्ट’ ठरला कल्याणमधील सर्वात वेगाने विक्री होणारा परवडणाऱ्या घरांचा प्रकल्पमहिंद्रा हॅपीनेस्ट ठरला कल्याणमधील सर्वात वेगाने 
विक्री होणारा परवडणाऱ्या घरांचा प्रकल्प
कोविड-19च्या साथीतही केवळ नऊ महिन्यांत 80 टक्के घरांची विक्री साध्य

मुंबई26 ऑगस्ट2020 : महिंद्रा लाइफस्पेस डेव्हलपर्स लिमिटेड या कंपनीच्या महिंद्र हॅपीनेस्ट या परवडणाऱ्या घरांच्या ब्रॅंडच्या हॅपीनेस्ट कल्याण या प्रकल्पामधील 80 टक्केम्हणजे 1 हजार घरांची विक्री पूर्ण झाली आहे. विशेष बाब अशीकी टाळेबंदीत 4 महिने काम बंद असूनही हा प्रकल्प सादर करण्यात आल्यापासून केवळ नऊ महिन्यांत कालावधीत या महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचला आहे.

महिंद्रा लाइफस्पेस डेव्हलपर्स लि.चे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी अरविंद सुब्रमण्यन म्हणाले, “हॅपीनेस्ट कल्याणला मिळालेल्या सकारात्मक प्रतिसादामुळे आम्हाला आनंद झाला आहे. टाळेबंदीचे निर्बंध असूनही या प्रकल्पाला मिळालेल यश हे दर्शवितेकी विश्वासू ब्रॅण्ड्सद्वारे बांधण्यात आलेल्या दर्जेदार घरांना चांगली मागणी असते. भारतभरात विकसनाची मोठी क्षमता असलेल्या रिअल इस्टेट क्षेत्राचे पुनरुज्जीवन आगामी काळात लवकर होईलअशी ही चिन्हे आहेत. महिंद्रा हॅपीनेस्टचे अनेक प्रकल्प सुरू होण्याच्या मार्गावर आहेत. या कंपनीने ग्राहक-केंद्रित धोरण स्वीकारलेले असल्याने परवडणाऱ्या घरांची वाढती मागणी पूर्ण करण्यात ही कंपनी योग्य स्थितीत आहे.

महिंद्रा हॅपीनेस्टमधील घरांचा परिसर राहाहसा आणि समृद्ध व्हा’ या तत्वावर बांधलेला असतो. स्वतःसाठी एक मोठे आणि चांगले जीवन शोधणार्‍या तरुण घरमालकांच्या इच्छेची पूर्तता या घरांमधून होते. हॅपीनेस्ट कल्याण प्रकल्पात डिजिटल-फर्स्ट’ या धोरणानुसार सर्व व्यवहार करण्यात आले. येथील घरांचे बुकिंग केवळ ऑनलाइन पद्धतीने करण्यात आले, तसेच या बुकिंगच्या सुमारे 80 टक्के पेमेंट ऑनलाइनच स्वीकारण्यात आले. याशिवाय या उद्योगात प्रथमच राबविण्यात आलेल्या संकल्पनेनुसार, हॅपीनेस्ट कल्याणमधील ग्राहकांना मायसिरीज’ या ऑफरद्वारे अनोख्या सुविधा निवडण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला. हॅपीनेस्ट कल्याण येथे सह-निर्मितवापरागणिक पैसे भरण्याच्या सुविधा उभारण्यात आल्या असून त्या ग्राहकांची पसंती आणि आर्थिक व्यवहार्यता यांवर आधारित आहेत. हॅपीनेस्ट कल्याणला इंडियन ग्रीन बिल्डिंग कौन्सिलने (आयजीबीसी) गोल्ड हे मानांकन दिले आहे. या प्रकल्पात वीज व पाणी बचतीसाठी विशेष तजवीज करण्यात आली असून त्यांच्या देखभालीचा खर्चही अतिशय कमी आहे.

भिवंडी-कल्याण मार्गावर मोक्याच्या ठिकाणी असलेल्या हॅपीनेस्ट कल्याणमध्ये 14 आणि 22 मजली सात टॉवर्स आहेत. येथे सुमारे 9 एकर जागेत 1 बीएचके आणि 2 बीएचके या श्रेणीतील 1,241 घरे उभी राहिली आहेत. या घरांच्या किंमती 31.05 लाख रुपयांपासून सुरू होतात. याव्यतिरिक्त, ‘हॅपीनेस्ट कल्याणमधील ग्राहकांना लवकर नोंदणी केल्यास काही सवलती देण्यात आल्या. किंमतीचा लाभ मिळवून देणाऱ्या मल्टिप्लायर रीबेट प्लॅन’ (एमआरपी) योजनेचा लाभ या ग्राहकांना घेता आला. हा प्रकल्प महाराष्ट्र रिअल इस्टेट नियामक प्राधिकरणाकडे (महारेरा) नोंदणीकृत आहे.

महिंद्रा हॅपीनेस्टमधील सर्व घरे पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत पात्रता निकष पूर्ण करतात. येथील पात्र ग्राहक कर्जावरील व्याजात 2.67 लाख रुपयांपर्यंतचे अनुदान घेऊ शकतात.

Comments

Popular posts from this blog

अभिनेता साई गुंडेवार यांचे प्रदीर्घ आजाराने अमेरिकेत निधन!

कॅप्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेडची ग्रीन यात्रासोबत वृक्षारोपण मोहीम

Views on the decision of Monetary Policy Committee of RBI.