बँकिंग आणि वाहन क्षेत्राच्या जोरावर शेअर बाजारात किरकोळ वाढ

बँकिंग आणि वाहन क्षेत्राच्या जोरावर शेअर बाजारात किरकोळ वाढ
मुंबई, २५ ऑगस्ट २०२०: भारतीय निर्देशांकाने आज दिवसभरात घसरण सुरु असली तरी अखेरच्या क्षणी बाधत घेत बाजार बंद झाला. या नफ्याचे नेतृत्व बँकिंग आणि वाहन क्षेत्राने केले. निफ्टी ०.०५% किंवा ५.८० अंकांनी वधारला व ११,४७२.२५ अंकांवर स्थिरावला. एसअँडपी बीएसई सेन्सेक्सने ०.१२% किंवा ४४.८८ अंकांची वृद्धी घेतली व तो ३८, ८४३.८८ अंकांवर थांबला. आजच्या व्यापारी सत्रात जवळपास ११९२ शेअर्सनी नफा कमावला, १४१९ शेअर्स घसरले तर १०४ शेअर्स स्थिर राहिले.
एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे प्रमुख सल्लागार श्री अमर देव सिंह यांनी सांगितले की आजच्या व्यापारी सत्रात टाटा मोटर्स (५.३२%), बजाज फायनान्स (४.७५%), एसबीआय (३.३८%), टेक महिंद्रा (२.२८%) आणि आयशर मोटर्स (२.१८%) हे निफ्टीतील टॉप गेनर्स ठरले. तर गेल (१.१७%), एनटीपीसी (१.५२%), सन फार्मा (१.४०%), टाटा स्टील (१.२९%) आणि डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज (१.१७%) हे निफ्टीतील टॉप लूझर्स ठरले.
बँकिंग आणि ऑटो सेक्टर वगळता सर्व क्षेत्रीय निर्देशांकांनी कमकुवत व्यापार केला. बीएसई मिडकॅप आणि बीएसई स्मॉलकॅपने अनुक्रमे ०.५१% आणि ०.११% ची काहीशी वृद्धी घेतली.
टाटा मोटर्स: टाटा मोटर्सचे शेअर्स ५.३२% नी वधारले व १२७.६५ रुपयांवर व्यापार केला. पुढील तीन वर्षात कंपनीने शून्य कर्ज स्थिती मिळवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे, असे कंपनीचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांनी सांगितले. कंपनीचे निव्वळ ऑटोमोटिव्ह कर्ज ४८,००० कोटी रुपये आहे.
प्रॉक्टर अँड गँबल हायजिन अँड हेल्थ केअर: २०२० या वित्तीय वर्षात चौथ्या तिमाहितील नफा १३.८% नी वाढून ६९.२ कोटी रुपये झाला. कंपनीचा महसूल ६३४.५ कोटी रुपयांनी घसरला. परिणामी कंपनीचे स्टॉक्स १.३६% नी वधारले व त्यांनी १३०.६० रुपयांवर व्यापार केला.
अलकार्गो लॉजिस्टिक्स लिमिटेड: कंपनीचे दोन्ही प्रमोटर्स कंपनीचे इक्विटी शेअर्स दोन्ही एक्सचेंजमधून काढून घेण्याचा विचार करत आहेत, अशी माहिती कंपनीने एक्सचेंजला दिली. परिणामी कंपनीचे शेअर्स १९.९८% नी वाढले व त्यांनी १३०.६० रुपयांवर व्यापार केला.
एलआयसी हाऊसिंग फायनान्स: एलआयसी हौसिंग फायनान्स कंपनीने ८.०८ टक्क्यांची वृद्धी घेतली व शेअर्सनी २९८.९५ रुपयांवर व्यापार केला. २०२१ या वित्त वर्षातील जून महिन्याच्या तिमाहीत कंपनीच्या निव्वळ नफ्यात ३४% ची वाढ झाली. कंपनीचा निव्वळ न फा ८१७.४८ कोटी रुपये झाला.
भारतीय रुपया: देशांतर्गत इक्विटी मार्केटमधील चढ-उतारामुळे भारतीय रुपया आज अमेरिकी डॉलरच्या तुलनेत फ्लॅट म्हणजेच ७४.८३ रुपयांवर स्थिरावला.
जागतिक बाजार: हँगसेंगने ०.२६% ची घसरण घेतल्याने, ही कंपनी वगळता युरोपियन आणि आशियाई निर्देशांकांनी आज सकारात्मक व्यापार दर्शवला. कोरोना विषाणूच्या लसीच्या विकासातील प्रगतीमुळे गुंतवणुकदारांमध्ये सकारात्मक भावना निर्माण झाल्या. नॅसडॅकने ०.६०%, निक्केई २२५ ने १.३५%, एफटीएसई १०० ने ०.२४% आणि एफटीएसई एमआयबीने ०.९३% ची वृद्धी अनुभवली.

Comments

Popular posts from this blog

TiEcon Mumbai 2023, brilliantly showcased revolutionary ideas & impactful solutions to build an Anti-Fragile and Sustainable India

REC DECLARES ITS FINANCIAL RESULTS FOR Q2 & H1 FY24

Liberty General Insurance Launches Dedicated 24/7 Helpline <+91-9324968286> for the Victims of Odisha Train Tragedy