ट्रेलचे नवे अँथम गीत लॉन्च

ट्रेलचे नवे अँथम गीत लॉन्च
~ सुखविंदर सिंहचा आवाज;  युट्यूबवर १.५ दशलक्षांपेक्षा जास्त वेळा पाहिले गेले ~
मुंबई, २६ ऑगस्ट २०२०: भारतातील वेगाने विकसित होणा-या लाइफस्टाइल कम्युनिटी मंच ट्रेलने मनात सुरु असलेल्या भावना व्यक्त करण्याला प्रोत्साहन देण्याकरिता नवे अँथम गीत लाँच केले आहे. 'कह जो कहना है' असे शीर्षक असलेले हे गीत आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रख्यात पार्श्वगायक सुखविंदर सिंह यांनी गायलेले असून कथा सांगण्याची कला साजरी करण्यासाठी तयार करण्यात आले आहे आणि आता ते लोकांना मनापासून बोलण्यासाठी प्रोत्साहित करते. प्रत्येकाची वेगळी कहाणी असते, त्यामुळे कुणीही आपले मत आपल्यापर्यंतच मर्यादित ठेवू नये, असा संदेश यातून मिळतो. हे गीत लाँच झाल्यानंतर युट्यूबवर १.५ दशलक्षांपेक्षा जास्त वेळा पाहिले गेले आहे. गाणे लाँच करणारे ट्रेल हे भारतातील पहिले स्टार्टअप बनले आहे.
ट्रेल हे भाषासंबंधी बंधने झुगारुन देण्यासाठी लोकांना सक्षम करण्यास कटिबद्ध आहे. त्याअनुशंगाने हे गीत लोकांना स्वत:च्या अनोख्या कहाण्या, विचार आणि मते कोणत्याही अडथळ्याविना शेअर करत एक समाजाच्या रुपात एकत्र येण्याचा आग्रह करते. यात ट्रेलच्या प्लॅटफॉर्मवर कंटेंट बनवणाऱ्यांना दाखवण्यात आले आहे. या गाण्याचे बोल त्यांच्या भावना व्यक्त करतात. जे लोक आपल्या कथा इतरांसोबत शेअर करु इच्छितात, त्या सर्व लोकांसाठी हे गाणे समर्पित आहे.
सुखविंदर सिंह म्हणाले, “ संगीत आणि इतर मार्गांद्वारे प्रत्येक क्षेत्रात आपली कला आणि कौशल्य दाखवण्याची संधी देणाऱ्या अॅप्समध्ये ट्रेल हे एक विशेष अॅप आहे. जगभरातील विविध विषयांवर निडरतेने आणि स्वतंत्रपणे बोलण्यासाठी एक मंच याद्वारे उपलब्ध करून दिला आहे. मला वास्तविकत: हा दृष्टीकोन खूप आवडतो. लोकांना आपले सुप्त गुण दर्शवण्यासाठी हा मंच अनेक प्रकारे प्रेरित करतो.”
ट्रेलचे सहसंस्थापक पुलकित अग्रवाल म्हणाले, 'हे गीत लोकांनी प्रगती करणे, आपले सर्जनशील विचार, भावना, मत कोणत्याही न्यूनगंडाशिवाय शेअर करण्यास प्रेरित करण्यासाठी बनवण्यात आले आहे. त्यामुळेच त्याला ‘कह जो कहना है’ असे नाव देण्यात आले आहे. आमच्या युझर्समध्ये तर ते आधीच लोकप्रिय ठरले आहे. आम्हाला विश्वास आहे की, जास्तीत जास्त लोकांच्या विचारांना आवाज देणे आणि एक समाज म्हणून एकत्र येण्यासाठी हे गाणे प्रेरित करेल.”

Comments

Popular posts from this blog

Indegene acquires Trilogy Writing & Consulting GmbH, a medical writing consultancy

TiEcon Mumbai 2023, brilliantly showcased revolutionary ideas & impactful solutions to build an Anti-Fragile and Sustainable India

REC DECLARES ITS FINANCIAL RESULTS FOR Q2 & H1 FY24