ब्रिजस्टोन इंडियाच्या वतीने 20 शहरांमध्ये सादर आहे, कॉन्टॅक्टलेस पिक अप अँड ड्रॉप सर्विस

ब्रिजस्टोन इंडियाच्या वतीने 20 शहरांमध्ये सादर आहे, कॉन्टॅक्टलेस पिक अप अँड ड्रॉप सर्विस  
ग्राहकांची सुरक्षा लक्षात घेऊन तयार केलेली सेवा, या माध्यमातून ग्राहकांसाठी टायर देखभाल तसेच दुरुस्ती सेवांचा लाभ घरबसल्या घेता येणार !

मुंबई 2 सप्टेंबर, 2020: ब्रिजस्टोन इंडियाच्या वतीने पिक अप अँड ड्रॉप सर्विसच्या लॉन्चची घोषणा करण्यात आली. ही एक कॉन्टॅक्टलेस/संपर्करहित सेवा असून तिचे उद्दिष्ट ग्राहकांना वॅलेट बुक करून त्यांच्या सर्व टायर संबंधी गरजा आणि सेवांची पूर्तता करते. या सेवेचा लाभ घेण्यासाठी उपभोक्त्यांना घराबाहेर पाऊल टाकण्याची आवश्यकता नाही. या सेवेत गाडी घरापासून दूर गेल्यापासून ते पून्हा घरी येईपर्यंतचा ट्रॅक ठेवण्याची सुविधा मिळणार आहे. ‘पिक अप अँड ड्रॉप सर्विस’मध्ये ग्राहकांच्या टायरसंबंधी गरजा आणि आवश्यकता लक्षात घेण्यात येतील. त्यात चाकांचे अलाईनमेंट, संतुलन तपासणे किंवा नवीन फिटींग बसवण्यात येईल. या सेवेत नवीन खरेदीसह सध्याच्या टायरची देखभाल समाविष्ट आहे.

ब्रिजस्टोनमध्ये समाजाला सर्वोत्तम गुणवत्ता उपलब्ध करून देण्याविषयी आम्ही वचनबद्ध आहोत. आमच्यातर्फे देण्यात येणाऱ्या ऑफर त्याचप्रमाणे सेवांमधून याची झलक दिसत असते. करोना प्रादुर्भावानंतर आता हळूहळू स्थिती न्यू नॉर्मल (नव्याने सामान्य) होते आहे. ग्राहक आणि आमच्या चॅनल पार्टनरची सुरक्षा आमच्या दृष्टीने प्राधान्यावर आहे. आमची कॉन्टॅक्टलेस पिक अप अँड ड्रॉप सर्विस ही ग्राहकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने तयार करण्यात आली आहे. आमच्या इथे वॅलेट आणि चॅनल पार्टनरना उच्चतम दर्जाची निर्जतुकीकरणाची सुविधा आणि स्वच्छ ग्राहक अनुभव पुरविण्यात येतो. वॅलेटसह कारचे निर्जंतुकीकरण केले जाते. कारची डिलीव्हरी देताना आम्ही उपभोक्त्यांची मन:शांती तसेच सुलभतेची खातरजमा करतो.” असे कन्झुमर बिझनेस हेड राजश्री मोईत्रा यांनी सांगितले.

सुरुवातीच्या काळात ही सेवा मुंबई, पुणे, अहमदाबाद, हैदराबाद, बंगळूरू. कोइम्बतुर, चेन्नई, कोचीन, दिल्ली, गुरुग्राम, लखनऊ, गुवाहाटी, कोलकाता, जयपूर, इंदूर या शहरांत उपलब्ध करून देण्यात आली आहे. लवकरच कानपूर, सुरत, चंडीगड, नागपूर आणि गोव्यातही सेवा उपलब्ध होईल.

ग्राहकांनी केवळ ब्रिजस्टोन सिलेक्ट स्टोअरशी संपर्क साधायचा आहे. त्यांना स्वत:च्या घरातून बाहेर पडण्याची गरज नाही. आम्ही त्यांच्या वाहनांच्या टायरची आवश्यक ती सर्व देखभाल घेऊ. पिक अप अँड ड्रॉप सर्विसकरिता नोंदणी bridgestonebookmyservice.in/ द्वारे करता येईल.

देशभर सध्या अनलॉक सत्र सुरू आहे आणि रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सावकाश मात्र गतीने सुधारतो आहे. कोविड-19 केसचे प्रमाण नियमित वाढत असले, लोक घरातून बाहेर पडण्यास उत्सुक नसताना, ब्रिजस्टोनच्या माध्यमातून त्यांच्या सोयीनुसार पिक अप अँड ड्रॉप सर्विस घेऊन आले आहे. जिथे ग्राहकांच्या वाहनांच्या टायरची संबंधित गरजा लक्षात घेऊन निगा आणि देखभाल घेणे, व्हील अलाईनमेंट (चाकांची स्थिती तपासणे), चाकांचे संतुलन राखणे किंवा नवीन टायर बसवणे शक्य होणार आहे. या सेवेत नवीन खरेदी केलेला किंवा सध्याच्या टायरचा समावेश करण्यात आला आहे. 

ब्रिजस्टोनद्वारे कायमच ग्राहक सुरक्षा तसेच समाधानाला प्राधान्य देण्यात येते. सध्याच्या महासाथीच्या काळात या दिशेने आणखी एक पाऊल टाकण्यात आले आहे. याद्वारे ग्राहकांना सर्वोत्तम सेवा उपलब्ध करून दिली जाते. आजच्या करोना काळात लोक घरून काम करू लागले आहेत आणि घराबाहेर जाण्यासाठी फारसे उत्सुक नसतात. ब्रिजस्टोन’च्या नवीन पिक अप अँड ड्रॉप सर्विसमुळे लोकांच्या टायर-संबंधी गरजा आणि सेवांची काळजी घेतली जाणार आहे. आता ग्राहकांना घराबाहेर जाण्याची आवश्यकता नाही.

Comments

Popular posts from this blog

Indegene acquires Trilogy Writing & Consulting GmbH, a medical writing consultancy

TiEcon Mumbai 2023, brilliantly showcased revolutionary ideas & impactful solutions to build an Anti-Fragile and Sustainable India

REC DECLARES ITS FINANCIAL RESULTS FOR Q2 & H1 FY24