शेअर बाजारात पडझड; सेन्सेक्समध्ये १७१ अंकांची घसरण

 शेअर बाजारात पडझड; सेन्सेक्समध्ये १७१ अंकांची घसरण


मुंबई, ९ सप्टेंबर २०२०: आजच्या व्यापारी सत्रात वित्तीय शेअर्सची घसरण झाल्यानंतर भारतीय बाजार निर्देशांकांत पडझड दिसून आली. निफ्टीने ११,३०० ची पातळी सोडली. तो ०.३५% किंवा ३९.३५ अंकांनी घटला व ११,२७८.०० अंकांवर स्थिरावला. तर एसअँडपी बीएसई सेन्सेक्स ०.४५% किंवा १७१.४३ अंकांनी घटला व ३८,१९३.९२ अंकांवर थांबला.


एंजल ब्रोकिंग लिमिटेचे प्रमुख सल्लागार श्री अमर देव सिंह यांनी सांगितले की आजच्या व्यापारी सत्रात झी एंटरटेनमेंट (३.०६%), टाटा स्टील (३.५७%), रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (२.६८%), सिपला (२.७३%) आणि ग्रासिम इंडस्ट्रीज (२.३९%) हे निफ्टीतील टॉप गेनर्स ठरले. तर एसबीआय (४.०९%), गेल (३.३८%) बजाज फिनसर्व्ह (२.८९%), अॅक्सिस बँक (२.७३%) आणि आयओसी (२.६०%) हे निफ्टीतील टॉप लूझर्स ठरले.


बीएसई मिडकॅप आणि बीएसई स्मॉलकॅप अनुक्रमे ०.२८% व ०.९४% नी घसरले. निफ्टी बँकेने २% ची घसरण घेतली तर निफ्टी आयटी व निफ्टी एफएमसीजीदेखील प्रत्येकी अर्ध्या टक्क्याने घटले.


झी एंटरटेनमेंट: ग्लोबल फायनान्शिअल फर्मने खरेदीचा निर्णय कायम ठेवत स्टॉकची टार्गेट किंमत २७५ रुपये प्रति शेअर ठेवली. त्यानंतर झी एंटरटेनमेंटचे स्टॉक्स ३.०६% नी वाढले व त्यांनी २२०.३० रुपयांवर व्यापार केला.


टाटा मोटर्स: एचएसबीसी या ग्लोबल फर्मने २०० रुपये प्रति शेअर ही किंमत कायम राखत खरेदीत स्टॉक अपग्रेड केले. त्यानंतर टाटा मोटर्सचे शेअर्स १.१६ टक्क्यांनी घसरले व त्यांनी १४०.६५ रुपयांवर व्यापार केला.


डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज: कोव्हिड-१९ च्या रुग्णांवर उपचारासाठी कंपनीने ‘रेडिक्स’ या ब्रँड नावाखाली रेमडेसिव्हिर औषध लाँच करण्याची घोषणा केली. त्यानंतर कंपनीचे स्टॉक्स १.६७% नी वाढले व त्यांनी ४,४२१.५० रुपयांवर व्यापार केला.


भारत डायनॅमिक्स: सरकार कंपनीच्या एकूण पेड-अप भांडवलाच्या १० टक्के स्टेक किंवा १८,३३८,१२५ इक्विटी शेअर्सची विक्री करेल, अशी माहिती कंपनीने दिल्यानंतर भारत डायनॅमिक्स कंपनीचे शेअर्स ५.१४ टक्क्यांनी घसरले व त्यांनी ३१४.०० रुपयांवर व्यापार केला.


रिलायन्स इंडस्ट्रिज लिमिटेड: रिलायन्स इंडस्ट्रिजचे स्टॉक २.६८% नी वधारले व त्यांनी २,१६३.५५ रुपयांवर व्यापार केला. खासगी इक्विटी जायंट सिल्व्हर लेक पार्टनर्सने १.७५% स्टेकसाठी कंपनीच्या रिटेल युनिटमध्ये ७,५०० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची घोषणा केल्यानंतर हे परिणाम दिसले.


भारतीय रुपया: अस्थिर देशांतर्गत इक्विटी मार्केटमुळे भारतीय रुपया अमेरिकी डॉलरच्या तुलनेत ७३.५३ रुपयांवर आला.


जागतिक बाजार: जागतिक आर्थिक सुधारणेसंबंधी वाढत्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर आशियाई स्टॉक्सनी घसरण घेतली तरी युरोपियन स्टॉक्स हिरव्या रंगात स्थिरावले. नॅसडॅक, निक्केई २२५, हँगसेंगचे शेअर्स अनुक्रमे ४.११%, १.०४%, आणि ०.६३% नी घसरले. तर एफटीएसई १०० आणि एफटीएसई एमआयबीचे शेअर्स अनुक्रमे ०.७१% आणि ०.५०% नी वाढले.

Comments

Popular posts from this blog

अभिनेता साई गुंडेवार यांचे प्रदीर्घ आजाराने अमेरिकेत निधन!

कॅप्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेडची ग्रीन यात्रासोबत वृक्षारोपण मोहीम

Views on the decision of Monetary Policy Committee of RBI.