शेतकरी उत्पादक संघटनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी डीएफपीसीएल आणि समुन्नती आले एकत्र


शेतकरी उत्पादक संघटनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी डीएफपीसीएल आणि समुन्नती आले एकत्र

या भागिदारीच्या माध्यमातून येत्या ३ वर्षात ४ राज्यांमध्ये १५० शेतकरी उत्पादक संघटनांच्या माध्यमातून ७० हजाराहून अधिक शेतकऱ्यांना लाभ होण्याची शक्यता

पुणे, 3 सप्टेंबर २०२०- देशातील आघाडीची खते आणि औद्योगिक रसायने कंपनी असलेल्या दीपक फर्टिलायझर्स आणि पेट्रोकेमिकल्स कॉर्पोरेशन लिमिटेडने (डीएफपीसीएल) आज स्पेशलाइज्ड ॲग्री व्हॅल्यू चेन एनेबलर समुन्नतीसोबत भागिदारीची घोषणा केली. समुन्नती विशेष वित्तीय, सहवित्तीय आणि गैरवित्तीय पर्याय कृषी क्षेत्रातील घटकांसाठी उपलब्ध करुन देतात, कृषी क्षेत्रातील विसंगती दूर करण्यासाठी काम करतात आणि शेतकरी उत्पादक संघटनांशी (एफपीओ) संबंधित शेतकऱ्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल करण्यासाठी प्रयत्न करतात.

या भागिदारीमुळे डीएफपीसीएल, पीक आधारित सल्ला उपलब्ध करुन देईल ज्याचा ४ राज्यातील एफपीओशी निगडीत हजारो शेतकऱ्यांना लाभ होईल, तसेच उत्पादन, दर्जा आणि उत्पन्नात सुधारणार होईल. त्याचवेळी परवडणाऱ्या दरात कृषी कर्जाचा लाभ शेतकऱ्यांना मिळेल, त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या क्षमता वाढविण्याची आणि कामकाज अद्ययावत करण्याची संधी मिळेल. सामंजस्य करारानुसार (MoU) डीएफपीसीएलच्या माध्यमातून एफपीओला पीक आधारित सल्ला आणि शेतीसाठी सल्ला मिळेल तसेच समुन्नतीच्या माध्यमातून विशेष कर्ज मिळेल.

या सामंजस्य कराराविषयी डीएफपीसीएलच्या क्रॉप न्यूट्रिशन बिझनेसचे प्रेसिडेंट श्री. महेश गिरधर म्हणाले, शेतकऱ्यांना सक्षम करुन देशाच्या कृषी क्षेत्रात क्रांती घडवून आणण्याच्या दिशेने सुरू असलेल्या आमच्या प्रयत्नांचा हा पुढचा टप्पा आहे. आवश्यक माहिती आणि पीक पोषणाविषयी वैज्ञानिक माहितीच्या आधारे डीएफपीसीएल, समुन्नतीच्या मदतीने एफपीओला आणि संबंधित शेतकऱ्यांना चांगले पीक येण्यासाठी आणि त्यांच्या आयुष्यात चांगले बदल घडविण्यासाठी मार्गदर्शन करेल. डीएफपीसीएलच्या १०० टक्के मालकीची स्मार्टकेम टेक्नॉलॉजी लिमिटेड (एसटीएल) ही उप कंपनी समुन्नतीशी संबंधित एफपीओसोबत काम करत असून त्यापैकी काहींना त्यांनी वितरक म्हणून नेमलेले आहे.

शेतकऱ्यांना भेडसवणाऱ्या अनेक समस्यांसाठी एफपीओ हा नवा पर्याय म्हणून वेगाने पुढे येतो आहे. एफपीओ हे शेतकऱ्यांच्या समुहाला (प्रत्येक एफपीओमध्ये २५०-१ हजार शेतकरी सदस्य असतात) पीक व्यवस्थापनासाठी तसेच कर्जासाठी, दर्जेदार माहितीसाठी, व्यावसायिक कृषी सल्ला सुविधा आणि कृषीमालाला योग्य किंमत मिळवून देण्यासाठी मार्गदर्शन करतात. देशातील १९ राज्यातील सुमारे ५०० एफपीओसोबत आम्ही काम करत असून अल्पभूधारक शेतकऱ्यांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहोत. आम्हाला विश्वास आहे की, या भागिदारीमुळे एफपीओ आणि त्यांच्या शेतकरी सदस्यांना योग्य वेळी सल्ला मिळेल, क्षमता विकास होईल, अंतिमतः चांगले उत्पादन आणि उपजीविका मिळविण्यासाठी मदत होईल, असे समुन्नतीचे संस्थापक आणि सीईओ अनिल कुमार एसजी म्हणाले.

Comments

Popular posts from this blog

अभिनेता साई गुंडेवार यांचे प्रदीर्घ आजाराने अमेरिकेत निधन!

कॅप्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेडची ग्रीन यात्रासोबत वृक्षारोपण मोहीम

Views on the decision of Monetary Policy Committee of RBI.