नॉलेज ल’व्हिनेर कॉन्क्लेव्हचे आयोजन

टेक अवान्त-गर्डेनॉलेज की फाउंडेशनमायक्रोसॉफ्ट यांच्यातर्फे डिजिटल कायापालट आणि परिपूर्ण अध्ययन तसेच शालेय शिक्षकांना भविष्याच्या आव्हानांसाठी तयार करण्यासाठी पहिल्यावहिल्या नॉलेज लव्हिनेर कॉन्क्लेव्हचे आयोजन
·        ५ सप्टेंबरपासून १२ आठवडे चालणाऱ्या या उपक्रमात ३,००० शिक्षक डिजिटल अध्यापन कौशल्य प्रदर्शित करतील.
·        १.५ लाखांहून अधिक शिक्षक; ७२,००० शाळा आणि ७६ दशलक्ष विद्यार्थ्यांना डिजिटल कायापालटासाठी प्रेरित केले जाईल.
२ सप्टेंबर २०२० : टेक अवान्त-गर्डे या कंपनीने मायक्रोसॉफ्टनॉलेज की फाउंडेशन, लाइसी कॉर्प, इफीऑनलाइन आणि रोशिनी सोशल स्कूलिंग यांच्या सहयोगाने पहिल्यावहिल्या व्हिनेर कॉन्क्लेव्हचे आयोजन करीत असून, ५ सप्टेंबर २०२० पासून वेबिनार सुरू होत आहेत. ही व्हिनेर कॉन्क्लेव्ह वेबिनार म्हणजे टेक अवान्त-गर्डेने शाळांना वर्गखोलीच्या चार भिंतीतून मुक्त करून कनेक्टेड लर्निंग कम्युनिटीशी जोडण्यासाठी हाती घेतलेल्या ‘डिजिटल ट्रान्सफॉरमेशन अँड होलिस्टिक लर्निंग’ कार्यक्रमांचा एक भाग आहेत. हा भव्य शैक्षणिक उपक्रम १२ आठवडे सुरू राहिल आणि ३,००० हून अधिक शिक्षक त्यांचे डिजिटल अध्यापन कौशल्य यातून प्रदर्शित करतील व १,५०,००० हून अधिक शिक्षकांची यात उपस्थिती असेल. भारतभरातील जवळपास ७२,०००  शाळांमधील ७६ दशलक्ष (७.६ कोटी) विद्यार्थी-शिक्षक समुदाय या डिजिटल कायापालटासाठी प्रेरित केले जातील.
हिरीरीने सहभागी होत असलेल्या काही शाळांची नावे अशी अलिगढ – ब्लॉसम्स स्कूल; बेंगलुरू – टीसीआयएस, सर्जापूर, टीसीआयएस, व्हाइटफिल्ड, बीजीएस वर्ल्ड स्कूल, ग्रीन फिल्ड़ स्कूल, वेंकट इंटरनॅशनल स्कूल; होसूर – लिटेरा व्हॅली झी स्कूल, एमएमएस- राइसहैदराबाद – ऑक्सफर्ड ग्रामर, श्री ऑरबिंदो इंटरनॅशनकानपूर – हुद्दार्ड स्कूल, डॉ. विरेन्दर स्वरूप एज्युकेशन सेंटरपुणे – ऑरबिस, मुंडवा आणि ठाणे – आर्य गुरूकूल. प्रियदर्शिनी अकॅडेमीचे मानद अध्यक्ष श्री. नानिक रूपानी हे या कॉन्क्लेव्हचे सन्माननीय पाहुणे असतील.
टेक अवान्त-गार्डेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अली सैत म्हणाले, “आजच्या जगतात ज्ञान ही सर्वात मोठी मालमत्ता आहे. ज्ञानसमृद्ध, तंत्रज्ञानाने परिपूर्ण अशा कनेक्टेड ज्ञानदानाच्या सुविधांचा प्रसार हा विद्यार्थी, शिक्षक, पालक, शाळा आणि संपूर्ण समाजाच्या सशक्तीकरणासाठी आणि कोणत्याही सीमारहित शिकण्याच्या आनंदासाठी खूप महत्त्वाचा आहे. शाळांकडून अशी कनेक्टेड लर्निंग समुदायाच्या निर्मिती करण्यासाठी ‘डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन अँड होलिस्टिक लर्निंग’ उपक्रम खूपच मदतकारक ठरला आहे, ज्यामध्ये आम्ही शाळेचे व्यवस्थापन, शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करीत असतो.” ते पुढे म्हणाले, “नॉलेज व्हिनेर कॉन्क्लेव्ह वेबिनारच्या माध्यमातून मोठ्या संख्येने उपस्थित शिक्षक बंधूच्या बरोबरीने एकूण समाजाला आपली डिजिटल अध्यापन कौशल्य प्रदर्शित करण्याची शिक्षकांना संधी मिळेल. हे त्यांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी मदतकारक ठरेल आणि स्वत:त आणखी सुधारणा करण्यासाठी प्रोत्साहित करेल. शिक्षणाची नवी परिभाषा असणारी ही वेबिनार शिक्षकांनाही त्यांच्या कामाचे ठोस उद्दिष्ट मिळवून देतील, कारण मान्यता, मान-मरातब हाच त्यांच्यासाठी मोठा मोबदला असेल. २१ व्या शतकाच्या शैक्षणिक व डिजिटल रूपांतरणातील शिक्षणाच्या भवितव्याची अंतर्दृष्टी त्यांना यातून मिळालेली असेल.”
वरील कार्यक्रमांतर्गत शिक्षकांना जन एक्स्ट्रा मुरोस – भिंतीपल्याडचे ज्ञान या अध्यापनशास्त्राचे प्रशिक्षण दिले गेले आहे. या कार्यक्रमांतर्गत प्रशिक्षित शिक्षक हे ‘भविष्यासाठी तयार’ शिक्षक आहेत. नॉलेज व्हिनेर कॉन्क्लेव्ह वेबिनारमध्ये सहभागासाठी ते पात्र ठरले असून, आपले डिजिटल अध्यापन कौशल्य ते प्रदर्शित करतील. प्रत्येक नॉलेज व्हिनेर कॉन्क्लेव्ह वेबिनार हा एक दिवसभराचा कार्यक्रम असेल. ज्यामध्ये एका शाळेचे विद्यार्थ्यांना त्यांच्या पसंतीचा विषय निवडतील, तंत्रज्ञानाधारीत अध्यापन साधनाचा वापर करतील. प्रत्येक वेबिनारमध्ये सुमारे १,००० शाळांमधील सरासरी प्रत्येकी २० शिक्षकांना सहभागासाठी आमंत्रित केले जाईल आणि डिजिटल अध्यापनाच्या भव्य सोहळ्याचे साक्षीदार बनण्याची संधी दिली जाईल. डिजिटल अध्यापनाची अंतर्दृष्टी उपस्थितांना मिळेल आणि त्यांनाही त्यांचे शिकवण्याचे कौशल्य वाढविण्याची प्रेरणा मिळेल. नॉलेज व्हिनेर कॉन्क्लेव्हमध्ये सहभाग हा केवळ निमंत्रितांसाठी मर्यादित असेल. प्रत्येक आमंत्रित शाळांना वेबिनारमध्ये आपले डिजिटल अध्यापन कौशल्य प्रदर्शित करू पाहणाऱ्या शिक्षकांची नावे नोंदवावी लागतील.
अली सैत यांचे कनेक्टेड लर्निंग कम्युनिटीचे स्वप्न हे अत्यंत साधे असले, तरी तो सध्याच्या परिस्थितीत खूपच अत्यावश्यक आणि प्रभावी विचार बनला आहे आणि त्यांनी ही संकल्पना खूप आधी २००२ मध्येच मांडली आहे. त्यांचा दृष्टिकोन हा आहे की जगभरात समृद्ध शिक्षणाचे वातावरण बनेल ज्यात तंत्रज्ञानाचा वापर चांगल्या पद्धतीने केला जाईल आणि अशा शिक्षणाच्या संधी विस्तारल्या जातील, ज्यात आजच्या समाजात आणि कार्यस्थळांमध्ये आवश्यक असलेल्या व्यावहारिक तंत्रज्ञानाचा अनुभव दिला जाईल. कनेक्टेड लर्निंग कम्युनिटीमध्ये विद्यार्थी, शिक्षणवेत्ते आणि पालक यांना केव्हाही आणि कोणत्याही ठिकाणी अध्यापनाची संधी मिळेलशिकणे अधिक समर्पक, वैयक्तिकृत आणि व्यक्तीसमर्पित बनेल. शाळांमध्ये माहिती प्रणाली असेल जी जबाबदारी आणि कार्यक्षम व्यवस्थापनास पाठबळ मिळवून देईलशाळाकॅम्पसघरेग्रंथालयेव्यवसाय आणि जागतिक संसाधने गतिमानसहयोगी शिक्षण वातावरणाशी जोडलेली असतील. तरीही २१ व्या शतकातील शिक्षण – अध्यापनासाठी केवळ तंत्रज्ञान पुरेसे ठरणार नाही. शाळा, विद्यार्थी आणि शिक्षकांनी तंत्रज्ञानाचा एक अध्यापनाचे साधन म्हणून वापर करीत त्यात वेगवेगळे प्रयोग, नाविन्य आणण्याची आणि सृजनाची दृष्टि कमावली पाहिजे आणि तशी संधीही त्यांना असली पाहिजे. जगभरातील वाढत्या शाळा आणि शिक्षण समुदायांमध्ये अलीला या शिक्षणाच्या नवीन युगाची रूजूवात करायची आहे. तंत्रज्ञानाने शिक्षणाचे नवीन युग सुरू करण्यास मदत केली आहे जी एकाच वेळी शैक्षणिक उत्कृष्टता आणि जीवनात यशस्वी होण्यासाठी आणि वाढत्या ज्ञान अर्थव्यवस्थेत कार्य करण्यासाठी आवश्यक असलेल्या व्यावहारिक अनुभवाला प्रोत्साहित करते. तूर्त समाजाने केवळ शिक्षणासाठी तंत्रज्ञानाच्या क्षमतांचा वापर करण्यास सुरुवात केली आहे.
बहुतांश विद्यार्थी आणि शिक्षकांना लॅपटॉप, टॅब्लेट्स, हँडहेल्ड डिव्हायसेस, इलेक्ट्रॉनिक, राइटिंग पॅड्स, लर्निंग सॉफ्टवेअर, इंटरनेट, डेस्क, खुर्च्या वगैरेची गरज भासेल. टेक अवान्त-गार्डेकडून नॉलेज व्हिनेर कॉन्क्लेव्ह वेबिनारमध्ये ही उत्पादनेही त्यांची पूर्तता करणाऱ्या संस्थांच्या नावासह प्रदर्शित केली जातील.

Comments

Popular posts from this blog

अभिनेता साई गुंडेवार यांचे प्रदीर्घ आजाराने अमेरिकेत निधन!

कॅप्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेडची ग्रीन यात्रासोबत वृक्षारोपण मोहीम

Views on the decision of Monetary Policy Committee of RBI.