आकाश इन्स्टीट्युटला सर्वोत्तम शैक्षणिक मार्गदर्शन पुरविणाऱ्या संस्थेचा मान

इंडिया टुडे’ आयोजित वार्षिक सर्वोच्च शैक्षणिक मार्गदर्शनपर 
संस्था क्रमवारीत वैद्यकीय प्रवेश परीक्षा तयारीकरिता 
आकाश इन्स्टीट्युटला सर्वोत्तम शैक्षणिक मार्गदर्शन पुरविणाऱ्या संस्थेचा मान 

•   NEET करिता सर्वोच्च कोचिंग संस्था म्हणून सलग दुसऱ्यांदा आकाश इन्स्टीट्युटची 1 ल्या क्रमांकावर बाजी 
•   JEE करिता सर्वोच्च 30 शैक्षणिक संस्थांच्या यादीत Aakash IITJEE 5 व्या स्थानावर 
  
स्पर्धा परीक्षा तयारी सेवेत आकाश इन्स्टीट्युट राष्ट्रीय मातब्बर मानली जाते. देशातील सर्वोत्तम 30 शैक्षणिक संस्थेच्या यादीत सर्वोच्च शैक्षणिक मार्गदर्शन (कोचिंग) उपलब्ध करून देणारी संस्था म्हणून नाव पटकावले. भारतातील नियतकालिकांच्या दुनियेत सर्वाधिक खप असलेल्या इंडिया टुडेकडून त्यांच्या वार्षिक सर्वोत्तम शैक्षणिक मार्गदर्शनपर संस्था क्रमवारीत हा मान आकाशला प्राप्त झाला. NEET करिता सर्वोच्च शैक्षणिक संस्था म्हणून पहिल्या क्रमांकावर नाव उमटविण्याचे आकाश इन्स्टीट्युटचे हे सलग दुसरे वर्ष आहे.   
  
आकाशचा JEE विभाग असलेल्या Aakash IITJEE ने देखील भारतात 5 व्या क्रमांकावर बाजी मारली आहे. देशभर अभियांत्रिकी परीक्षा तयारीसाठी असणाऱ्या कोचिंग सेंटरमध्ये हे सर्व्हेक्षण घेण्यात आले. अल्प कालावधीत एखाद्या संस्थेने बजावलेली ही कामगिरी नक्कीच अतुलनीय आहे. जेईईकरिता शैक्षणिक मार्गदर्शन उपलब्ध करून देणाऱ्या सर्वोच्च 5 संस्थांमध्ये आकाशचे नाव येते. या संस्थेच्या वतीने गुणवत्तापूर्ण अभ्यास साहित्यउच्च प्रशिक्षित शिक्षक वर्ग आणि चांगल्याप्रकारे संशोधित परीक्षा प्रश्नसंच उपलब्ध करून दिले जातात.  
  
क्रमवारीसाठीमार्केटींग अँड डेव्हलपमेंट रिसर्च असोसिएट (एमडीआरआर) या विख्यात मार्केट रिसर्च एजन्सीने – विद्यार्थी गुणवत्ता आणि शुल्कशिक्षकांची गुणवत्ताशैक्षणिक स्त्रोतप्रशिक्षण प्रक्रिया आणि परिणाम अशा पाच बृहद निकषांवर संस्थांचे मूल्यमापन केले.   
  
आकाश इन्स्टीट्युटने यापूर्वी दिलेल्या निकालांचे प्रमाणअनुभवी शिक्षक वर्गाची तज्ज्ञताआधुनिक परीक्षा नमुनेसंगणक-आधारीत परीक्षा सुविधासक्षम तसेच व्यापक अभ्यास साहित्यशंका निरसनासाठी व्यक्तिगत साह्यविद्यार्थी घडवणे आणि वैयक्तिकरित्या लक्षप्रोत्साहनपर साह्य तसेच विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शनविद्यार्थी हजेरीवर नियमित देखरेखविद्यार्थ्यांच्या कामगिरीवर प्रतिसादनियमित पालक-शिक्षक भेटी आणि विद्यार्थ्यांच्या अंगीभूत गुणांचे सखोल विश्लेषण यामुळे NEET करिता आकाश ही शैक्षणिक मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यारी पहिल्या क्रमांकाची संस्था ठरली.  
  
क्रमवारीबद्दल बोलताना आकाश एज्युकेशनल सर्विसेस लिमिटेड (एईएसएल)चे संचालक आणि सीईओ म्हणाले की, “देशाचे सर्वात नामांकीत नियतकालिकइंडिया टुडेकडून आम्हाला NEET करिता भारताची पहिल्या क्रमांकाची कोचिंग इन्स्टीट्युट आणि JEE साठी 5 व्या स्थान प्राप्त झाले याचे समाधान वाटते. आमचे संस्थापक आणि सीएमडीजे. सी चौधरी तसेच तज्ज्ञ शिक्षक वर्गाच्या मार्गदर्शनाखाली आमच्या विद्यार्थ्यांनी अतुलनीय विश्वास जपून सातत्यपूर्ण कामगिरी बजावली आणि मागील 32 वर्षांपासून सातत्यपूर्ण कामगिरी बजावली आहे. आमचे विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या दोघांच्या कठोर मेहनतीचे हे फलित आहे. आगामी काळात आम्ही आणखी चांगल्याप्रकारे वचनबद्धता जपून जास्त जबाबदारीने सेवा उपलब्ध करून देऊ.”  
  
ते पुढे म्हणाले की, “आकाशवर आमचे विद्यार्थी आणि पालकांनी जो विश्वास दाखवला त्याबद्दल आकाश  इन्स्टीट्युट त्यांचे आभार मानते. प्रामुख्याने कोविड काळात करीयर विषयक गरजा पूर्ण करण्याच्या दृष्टीने विद्यार्थी-पालकांनी आमच्यावर दाखवलेल्या विश्वास आणि श्रद्धेबदल आम्ही समाधान व्यक्त करतो. 1988 मध्ये केवळ एका केंद्रासह 12 विद्यार्थ्यांसोबत सुरू केलेला हा प्रवास! आज संस्थेचे देशभर 2 लाखांहून अधिक विद्यार्थी असून ती पहिल्या क्रमांकावर खंबीरपणे उभी राहिली आहेही आमच्यासाठी महत्त्वाचे आणि अभिमानाची बाब आहे.” 

Comments

Popular posts from this blog

अभिनेता साई गुंडेवार यांचे प्रदीर्घ आजाराने अमेरिकेत निधन!

कॅप्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेडची ग्रीन यात्रासोबत वृक्षारोपण मोहीम

Views on the decision of Monetary Policy Committee of RBI.