सुदृढ भारतासाठी ‘हॅप्पीनेस किट’ची घोषणा

 सुदृढ भारतासाठी ‘हॅप्पीनेस किट’ची घोषणा

 

❖     राज्य सरकारे आणि मानवतावादी देणगीदारांच्या सहाय्याने  ‘अक्षय पात्र फाऊंडेशन’ने ‘हॅप्पीनेस किट’ची केली घोषणा 

❖     सप्टेंबरमध्ये १ लाख बहुउपयोगी संच सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळा पुन्हा सुरु होईपर्यंत वाटण्याचे लक्ष्य

 

 

मुंबई, ११ सप्टेंबर २०२० : देशातील १.१५ लाख मुले ही कुपोषणाशी लढत आहेत आणि ही वेळ आपल्यासाठी हे मान्य करण्याची आहे, की आपण खरोखरच एका अत्यंत कठीण परिस्थितीतून जात आहोत. कोरोनाच्या या जागतिक साथरोगामुळे ‘अक्षय पात्र फाऊंडेशन’तर्फे चालवला जाणारा सर्वात मोठा शालेय माध्यान्ह आहार उपक्रम हा खंडित झाला होता आणि त्यामुळे त्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबांचे हाल झाले होते. त्यामुळे या वंचित कुटुंबातील मुलांना भूक, कुपोषण आणि उपासमारी या तिहेरी आपत्तीला सामोरे जावे लागले. जागतिक साथीच्या या काळात मुलांच्या कुपोषणावर मात करण्यासाठी फाऊंडेशनने वंचित आणि बाधित कुटुंबे व त्यांच्या समाजासाठी ‘हॅप्पीनेस किट’ हा उपक्रम सुरु केला आहे.

 

‘हॅप्पीनेस किट’बद्दल बोलताना ‘अक्षय पात्र फाऊंडेशन’चे मुख्य कार्यकरी अधिकारी श्रीधर वेंकट म्हणाले, “भारतीय म्हणून उच्च मूल्याधारित मानवी संसाधन उभे करण्यावर भर दिला गेला पाहिजे की ज्या माध्यमातून एक चांगली पिढी आपण उभी करू शकू. सर्वसमावेशक समाज निर्माण करण्यासाठी व भावी पिढी भक्कम व आरोग्यपूर्ण असेल यासाठी समाजातील सर्वच घटकांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे. सप्टेंबर हा महिना ‘राष्ट्रीय पोषक आहार महिना’ म्हणून साजरा केला जातो. त्या निमित्ताने आम्ही ‘हॅप्पीनेस किट’ ही संकल्पना दाखल केली असून त्या माध्यमातून मुलांच्या पोषक आहार आणि शिक्षणाच्या गरजांची पूर्तता करण्यावर भर दिला गेला आहे. कोविड-१९मुळे ही मुले या दोन्ही गोष्टीनंना मुकत होती. क्रॉम्पटन ग्रीव्हज, सविता ऑईल, शिंडलर, फ्रँकलीन टेम्पल्टन, ग्लँड फार्मा, इंडिया कार्बन, हीकल, साई सल्फोनेट्स, सिस्को, अॅमाझॉन आणि इतरही कॉर्पोरेट कंपन्या व वैयक्तिक देणगीदारांनी आम्हाला जे सहकार्य केले त्यासाठी आम्ही त्यांचे शतशः आभारी आहोत. त्यांनी या उपक्रमाला फार मोठ्या प्रमाणावर हातभार लावला आहे.”

 

‘हॅप्पीनेस किट’मध्ये या मुलांना पोषक ठरेल अशा गोष्टी दिल्या जाणार असून त्या माध्यमातून त्यांचे आरोग्य, वृद्धी आणि विकास या गोष्टी साधल्या जात आहेत. डाळी, मसाले, शेंगदाणे, गुळ, बिस्किटे आणि इतर खाद्यपदार्थ या किटमध्ये आहेत. या सकस आहारामुळे या मुलांना आणि त्यांच्या कुटुंबांना पोषक घटक मिळतील. राज्य आणि केंद्र सरकारे तसेच  केंद्राच्या मानवी संसाधन मंत्रालयाकडून देण्यात येणाऱ्या धान्याच्या व्यतिरिक्त ही मदत या मुलांना व त्यांच्या कुटुंबांना केली जात आहे. या किटमध्ये साबण, टूथब्रश, टूथपेस्ट आणि सॅनिटरी पॅड यांचा समावेश असेल. त्यामुळे या मुलांमध्ये पाळण्यात येणाऱ्या स्वच्छतेवर भर दिला जाईल. त्याशिवाय त्यांच्यातील आकलानात्मक  कौशल्याला बढावा देण्यासाठी उपक्रमात्मक पुस्तकेसुद्धा त्यांना देण्यात येत आहेत. ही पुस्तके त्या त्या प्रादेशिक भाषांमध्ये आहेत.  या संचामध्ये जीवनावश्यक अशा वस्तूंचा समावेश आहे. त्यांमध्ये ग्लूकोज, लोह आणि कॅल्शीयम, लोडीन, प्रथिने यांचा समावेश आहे. त्यामुळे मुलांमधील प्रतिकारशक्ती वाढायला मदत होते. या संचामध्ये ७१७.५ ग्रॅम प्रथिने आणि २२,१७५ उष्मांक यांचा सामावेश आहे. त्याशिवाय प्रत्येक आहारामध्ये मुलाला २३.९ ग्रॅम प्रथिने आणि ७३९ उष्मांक  मिळेल याची काळजी घेतली गेली आहे.


प्रायोगिक तत्वावर दाखल झालेल्या ‘हॅप्पीनेस किट’ला फार मोठ्या प्रमाणावर उत्साहवर्धक असा प्रतिसाद मिळाला. त्यामध्ये बेंगळूरू येथील १२०० शालेय विद्यार्थ्यांना हे संच दिले गेले. ‘अक्षय पात्र’ने आता हा उपक्रम गुवाहाटी येथील आणखी ३८,६६६ मुलांपर्यंत विस्तारीत करण्याचे ठरवले असून त्याद्वारे शाळांच्या आवारात माध्यान्ह भोजन दिले जाणार आहे. त्यांमध्ये मुले आणि त्यांच्या पालकांचा समावेश असेल. आत्तापर्यंत सुमारे ११००० संच वितरीत करण्यात आले आहेत. हे संच मुंबई, दिल्ली एनसीआर, बेंगळूरू, वडोदरा, सिल्वासा, लखनौ, हैद्राबाद, गुवाहाटी तसेच उत्तर प्रदेशातील इतर भाग येथे वितरीत करण्यात आले आहेत. त्या माध्यमातून जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आहे. हा उपक्रम राज्यस्तरावर जोपर्यंत शाळा खुल्या होत नाहीत, तोपर्यंत सुरु राहणार आहे.

Comments

Popular posts from this blog

अभिनेता साई गुंडेवार यांचे प्रदीर्घ आजाराने अमेरिकेत निधन!

कॅप्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेडची ग्रीन यात्रासोबत वृक्षारोपण मोहीम

Views on the decision of Monetary Policy Committee of RBI.