FADA च्या नेतृत्वाची धुरा बदलली श्री. आशिष हर्षराज काळे यांनी FADAचे ३५वे अध्यक्ष श्री. विंकेश गुलाटी यांच्याकडे सोपवली जबाबदारी

FADA च्या नेतृत्वाची धुरा बदलली श्री. आशिष हर्षराज काळे यांनी FADAचे ३५वे अध्यक्ष श्री. विंकेश गुलाटी यांच्याकडे सोपवली जबाबदारी 
५ सप्टेंबर २०२०भारतातील रिटेल ऑटोमोबाईल क्षेत्रातील सर्वोच्च राष्ट्रीय संघटना द फेडरेशन ऑफ ऑटोमोबाइल डिलर्स असोसिएशन्सच्या (FADA) अध्यक्षपदी श्री. विंकेश गुलाटी यांची निवड झाल्याचे आज जाहीर करण्यात आले. गुलाटी हे संघटनेचे ३५वे अध्यक्ष असून, २०२० ते २०२२ हा त्यांचा कार्यकाळ असेल. उत्तर प्रदेशातून या पदासाठी निवडलेले गेलेले ते पहिले अध्यक्ष आहेत. संघटनेच्या ५६व्या वार्षिक सर्वसाधारण सभेनंतर लगेचच झालेल्या प्रशासकीय समितीच्या २९८व्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. 
श्री. गुलाटी हे अलाहाबाद आणि फरिदाबादच्या जवळ असलेल्या युनायटेड ऑटोमोबाईल्सचे संचालक आहेत. युनायटेड ऑटोमोबाइल्स या क्षेत्रात १९८५ पासून कार्यरत असून त्यांच्याकडे महिंद्रा अँड महिंद्रा व बजाज ऑटोची डिलरशीप आहे. १९५१ मध्ये दळणवळण व्यवसाय सुरू केलेल्या युनायटेड ग्रुपमध्ये युनायटेड ऑटोमोबाइल्सचा समावेश होतो. युनायटेड ग्रुपने शैक्षणिक संस्था, ऑटो डिलरशीप, डायग्नॉस्टिक सेंटर्स, वृत्तपत्र प्रकाशन व मेडिकल सायन्स या क्षेत्रांमध्ये आपला व्यवसाय वाढवला असून अलाहाबादमध्ये १,००० बेडचे युनायटेड मेडिसिटी हे हॉस्पिटलही हा ग्रुप चालवतो. 
२०२०-२२ या वर्षासाठी या संघटनेवर निवड झालेले काही पदाधिकारी: 
  • श्री. मनीष राज सिंघानिया, मॅनेजिंग पार्टनर – रालास मोटर्सरायपूर (महिंद्रा आणि महिंद्राचे डिलर) संघटनेचे उपाध्यक्ष;  
  • श्री. चित्तुर सेल्वकुमार विघ्नेश्वर, डेप्युटी मॅनेजिंग डायरेक्टर – अण्णामलाइज टोयोटोकोइम्बतूर (टोयोटा, व्हीईसीव्ही आणि बेनेलीचे डिलर) संघटनेचे सचिव 
जयपूर येथील (स्कोडा ऑटोचे डिलर) साईशा मोटर्स प्रा. लि. चे संचालक श्री. साई गिरीधर यांची या परिषदेने एकमताने २०२०-२२ या कार्यकाळासाठी खजिनदार म्हणून निवड केली.  
संघटनेचे अध्यक्ष म्हणून गेल्या दोन वर्षांत श्री. काळे यांनी दिलेल्या योगदानाचे FADAच्या या परिषदेत कौतुक करण्यात आले. ऑटो रिटेल नोंदणीची आकडेवारी जाहीर करण्यापासून ते मार्केट शेअरनुसार ओईएमवर आधारित वाहन नोंदणी करण्यापर्यंत अनेक वेगळ्या वाटेवरच्या गोष्टी संघटनेने काळे यांच्या नेतृत्वाखाली केल्या. न विकलेल्या बीएस-४ वाहनांचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात नेऊन त्यावर जवळजवळ संघटनेला अपेक्षित असा निकाल मिळवण्याच्या कामातही काळे यांच्या नेतृत्वाचाच वाटा होता. ऑटो क्षेत्राचा विचार करता धोरणकर्ते, ओईएम, ऑटो डिलर आणि या उद्योगाशी संबंधित सर्वांसमोर सर्वाधिक दखल घेण्यापात्र अशी संघटनेची प्रतिमा उभी करण्याचे श्रेयही त्यांनाच जाते. संघटनेने विक्रमी सदस्य संख्येची नोंदणी केली असल्यामुळे ऑटो डिलरना आपल्या छत्राखाली एकत्र आणण्यात FADAने महत्त्वाची भूमिका बजावली हे असेही दिसून आले आहे.  
श्री. गुलाटी यांच्या हातात या पदाची सूत्रे देताना मावळते अध्यक्ष श्री. काळे म्हणाले, “ आपल्या नावाजलेल्या संघटनेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मी माझे मित्र आणि सहकारी श्री. विंकेश गुलाटी यांचे अभिनंदन करतो. मी त्यांच्यासोबत काम केले आहे त्यामुळे पद्धतशीरपणे काम करण्याची शैली आणि डिलरचे प्रश्न सोडवण्यासाठी धाडसी निर्णय घेण्याची क्षमता यामुळे ते FADAला एका नव्या उंचीवर घेऊन जातील तसेच ते डिलरशीप समाजाला संघटित व शक्तिवान बनवतील असा मला विश्वास वाटतो.  
माझ्या कार्यकाळात माध्यमांच्या प्रतिनिधींनी FADA ला दिलेल्या पाठिंब्याबद्दल त्यांना, संघटनेतील माझ्या सहकाऱ्यांना आणि ऑटो इको सिस्टिममधील सर्वांना मी साथ दिल्याबद्दल धन्यवाद देतो.  
या नियुक्तीबद्दल FADAचे नवनिर्वाचित अध्यक्ष श्री. गुलाटी म्हणाले, “गौरवशाली इतिहास व उज्ज्वल भवितव्य असलेल्या FADAच्या अध्यक्षपदी माझी निवड करताना संघटनेने माझ्यावर दाखवलेल्या विश्वासामुळे मी अतिशय विनम्र झालो असून हा माझा गौरव आहे असे मी समजतो.   
आपण खूपच लवचिक आहोत आणि आपल्या डिलरशीप टिकण्यासाठी पुन्हा एकदा काही कठोर निर्णय घ्यावे लागणार आहेत हा धडा आपल्याला कोविडने दिला आहे. डिलरशीपचा नफा, डिलरचे मार्जिन वाढवणे, फ्रँचायजी कायदा किंवा महत्त्वाकांक्षी एमएसएमईच्या आग्रहामुळे येणाऱ्या कायदेशीर अडचणींची सोडवणूक करण्यासंबंधी मी माझ्या कार्यकाळात सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे. सध्याची आव्हाने गृहित धरली तरीही येत्या काळात जगातील तिसरी सर्वांत मोठी ऑटोमोबाइलची बाजारपेठ होण्याची क्षमता भारतात आहे. सरकार, एसआयएएम, एसीएमए आणि FADA या ऑटोमोबाइल इकोसिस्टिमने एकसंधपणे काम केले तर ऑटोमोबाइल क्षेत्रात भारताला जागतिक नेता बनवण्याचे आपल्या सरकारचे स्वप्न सत्यात आणणे शक्य होईल.”  

Comments

Popular posts from this blog

अभिनेता साई गुंडेवार यांचे प्रदीर्घ आजाराने अमेरिकेत निधन!

कॅप्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेडची ग्रीन यात्रासोबत वृक्षारोपण मोहीम

Views on the decision of Monetary Policy Committee of RBI.