आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेस लिमिटेड (एईएसएल) ने अभिषेक माहेश्वरी यांची मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) म्हणून नेमणूक केली

 आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेस लिमिटेड (एईएसएल) ने अभिषेक माहेश्वरी यांची 

मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) म्हणून नेमणूक केली



प्रतियोगिता परीक्षांची तयारी करून घेणाऱ्या संस्थांमधील देशभरातील अग्रणी असलेल्या आकाश एजुकेशनल सर्व्हिसेस लिमिटेड (एईएसएल) ने सर्वोच्च स्थान प्राप्त करण्यासाठी तसेच व्यावसायिक उत्कृष्टता प्राप्त करण्यासाठी आपले प्रबंधन अधिक मजबूत करून अधिक व्यावसायिक बनण्यासाठीच्या कंपनीच्या निरंतर प्रयत्नांच्या अनुषंगाने श्री. अभिषेक माहेश्वरी यांना कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) म्हणून नियुक्त केले आहे.

अभिषेक एईएसएल साठी रणनीती तयार करणे आणि विविध मुख्य शिक्षण कार्यक्रमांचे प्रबंधन करण्यासाठी जबाबदार असतील, ज्यामध्ये क्लासरूम, हायब्रीड आणि दूरस्थ शिक्षणाबरोबर डिजिटल सुद्धा समाविष्ट आहे. समूहासाठी लाभदायक विकास करत विद्यार्थ्यांना उत्कृष्ट मदत प्रदान करण्यासाठी अभ्यासाचे नवनवीन मार्ग शोधणे हे त्यांचे ध्येय असेल.

अभिषेक यांनी आयआयटी दिल्लीमधून इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगची पदवी आणि न्यूयॉर्कमधील कोलंबिया बिझिनेस स्कूलमधून एमबीए केले आहे. एईएसएलमध्ये जॉईन होण्यापूर्वी अभिषेक हे बायजुच्या आंतरराष्ट्रीय व्यवसायाचे अध्यक्ष होते, तिथे जागतिक स्तरावर एडटेक कंपनीचा विस्तार करण्याची जबाबदारी त्याच्यावर होती.

Comments

Popular posts from this blog

Indegene acquires Trilogy Writing & Consulting GmbH, a medical writing consultancy

TiEcon Mumbai 2023, brilliantly showcased revolutionary ideas & impactful solutions to build an Anti-Fragile and Sustainable India

REC DECLARES ITS FINANCIAL RESULTS FOR Q2 & H1 FY24