कोटक सिक्युरिटीजतर्फे भारतीय व अनिवासी भारतीय गुंतवणूकदारांसाठी ग्लोबल इन्व्हेस्टमेंट प्लॅटफॉर्म सादर

कोटक सिक्युरिटीजतर्फे भारतीय व अनिवासी भारतीय गुंतवणूकदारांसाठी 

ग्लोबल इन्व्हेस्टमेंट प्लॅटफॉर्म सादर

 

मुंबई, 11 डिसेंबर २०२० : कोटक सिक्युरिटीजतर्फे (केएसएल) आपल्या भारतीय व अनिवासी भारतीय ग्राहकांसाठी आज जागतिक गुंतवणूक प्लॅटफॉर्म सुरू करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली. केएसएलने नॅसडॅकमध्ये सूचिबद्ध असलेल्या इंटरॅक्टिव्ह ब्रोकर ग्रुपशी (आयबीकेआर) हातमिळवणी केली आहे आणि या भागीदारीच्या माध्यमातून आपल्या भारतीय व अनिवासी भारतीय ग्राहकांना यूएस इक्विटी मार्केटमध्ये थेट गुंतवणूक करण्यासाठी प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

 ऑनबोर्डिंगपासून ट्रेडिंगपर्यंत केएसल एक परीपूर्ण डिजिटल आणि सुरळीत अनुभव उपलब्ध करून देणार आहे. एका क्लिकवर आता यूएसमधील इक्विटी मार्केटमध्ये गुंतवणूक करता येणार आहे. गुंतवणूक करण्यासाठी क्लाएंट्स केएसएलचा वेब प्लॅटफॉर्म, त्याचप्रमाणे मोबाइल अॅपचाही वापर करू शकतात.

 कोटक सिक्युरिटीजचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ जयदीप हंसराज म्हणाले, “जगभरातील सर्वच आर्थिक क्षेत्रांना आधुनिक तंत्रज्ञानाने व्यापले आहे, न्यू नॉर्मलमध्ये भौगोलिक सीमारेषा आता इतिहासजमा झाल्या आहेत. कोटक सिक्युरिटीजने इंटरॅक्टिव्ह ब्रोकर्सशी केलेल्या सहयोगामुळे आम्ही ग्लोबल इन्व्हेस्टमेंट प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्यास सक्षम झालो आहोत. या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आमचे भारतीय आणि अनिवासी भारतीय क्लाएंट्स आता अमेरिकेतली सूचिबद्ध लार्ज स्केल तंत्रिज्ञान व जैवतंत्रज्ञान कंपन्यांमध्ये गुंतवणूक करू शकतात. यूएस मार्केटमध्ये फ्रॅक्शनल इक्विटी शेअर्स खरेदी करण्याच्या संधीसोबत शेअर खरेदी किंवा विक्री करण्यासाठी किमान रकमेचे बंधन नसल्यामुळे रिटेल गुंतवणूकरादारांना जागतिक स्तरावरील कंपन्यांचा पोर्टफोलियो तयार करण्याची संधी मिळते. जोखीम कमी करण्यासाठी डायव्हर्सिफिकेशन (वैविध्यपूर्णता) महत्त्वाचे असते. यूएस मार्केटमद्ये गुंतवणूक केल्याने गुंतवणूकदारांना देशातील गुंतवणूक जोखीम करण्यासाठी मदत होईल त्याचप्रमाणे विविध अर्थव्यवस्थांमधील मार्केट सायकल्सचे लाभ घेण्यासही मदत मिळेल.

 इंटरॅक्टिव्ह ब्रोकर्सचे संचालक आणि भारतातील प्रतिनिधी अंकित शाह म्हणाले, “विविध कारणांमुळे जागतिक पातळीवरील कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी मागणी वाढलेली आहे. त्यापैकी एक म्हणजे यूएस मार्केटची कामगिरी. दुसरे कारण म्हणजे जी उत्पादने गुंतवणूकदार रोज वापरतात त्या कंपन्यांचे शेअर त्यांना घ्यायचे आहेत आणि तिसरे म्हणजे डायव्हर्सिफिकेशन. इंटरॅक्टिव्ह ब्रोकर्सने सक्षम केलेल्या कोटक सिक्युरिटीज ग्लोबल इन्व्हेस्टिंग प्लॅटफॉर्ममुळे भारतीय नागरीक आणि अनिवासी भारतीयांना जागतिक स्तरावरील कंपन्यांमध्ये सुलभपणे गुंतवणू करता येईल.

 क्लाएंट ऑनबोर्डिंग हा डू-इट-युवरसेल्फ (डीआयवाय) प्रवास आहे, ज्यात क्लाएंटला वैयक्तिक माहिती व नियामक तपशील ऑनलाइन भरायचा आहे.

 यूएसमधील शेअरबाजारात गुंतवणूक करणे इतके सोपे कधीच नव्हते :

तीन सोप्या क्लिक्सनी गुंतवणूकदारांना केएसएल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून यूएस शेअर्सची खरेदी किंवा विक्री करता येईल

 

  • क्लाएंट केएसएल प्लॅटफॉर्मवर येतातमोबाइल अॅप किंवा वेबसाइट
  • खरेदी किंवा विक्री करण्यासाठी शेअर्सची निवड करा
  • अंमलबजावणी केलेल्या व्यवहाराचे कन्फर्मेशन मिळते

 क्लाएंटच्या अकाउंटमध्ये रक्कम असेल तरच व्यवहार पूर्ण होतो. क्लाएंट्स डिजिटली अकाउंट सुरू करू शकतात आणि त्यांच्या ट्रेडिंग प्राधान्यानुसार सबस्क्रिप्शन प्लॅन निवडू शकतात. क्लाएंट्सनी खरेदी केलेले शेअरर्स इंटरॅक्टिव्ह ब्रोकर्स राखून ठेवतात जे विविध अधिकारक्षेत्रांमध्ये जागतिक स्तरावरील अभिरक्षक (कस्टोडिअन) आहेत.


Comments

Popular posts from this blog

Indegene acquires Trilogy Writing & Consulting GmbH, a medical writing consultancy

TiEcon Mumbai 2023, brilliantly showcased revolutionary ideas & impactful solutions to build an Anti-Fragile and Sustainable India

REC DECLARES ITS FINANCIAL RESULTS FOR Q2 & H1 FY24