घडी डिटर्जंट चे कोरोना व्हायरस विरुद्धच्या लढाईमध्ये मास्क वापरण्यास प्रोत्साहन अभियान

 घडी डिटर्जंट चे कोरोना व्हायरस विरुद्धच्या लढाईमध्ये मास्क वापरण्यास प्रोत्साहन अभियान

 


भारतामध्ये घडी डिटर्जंटने एक अनोखे बचाव में ही समझदारी है (#BachaavMeinHiSamajhdaariHai) जागरूकता अभियान सुरु केले

 मुंबई, २८ डिसेंबर २०२०: कोविड-१९ महामारीच्या काळात स्वास्थ्य आणि सुरक्षेला चालना देण्याच्या उद्देशाने, देशातल्या पहिल्या क्रमांकाच्या डिटर्जंट पावडर ‘घडी’ च्या निर्माता आणि विपणनकर्ता आरएसपीएल ग्रुप ने आज आपले नवीन अभियान बचाव में ही समझदारी है (#BachaavMeinHiSamajhdaariHai) सुरु केले. घडी आपल्या पॅकेजिंगच्या माध्यमातून अशी जागरूकता निर्माण करणारी भारतातील पहिली कंपनी आहे.

 पॅकेजिंगच्या माध्यमातून देशातील या अनोख्या जागरूकता अभियानाचे १० कोटी भारतीय घरांपर्यंत पोहोचण्याचे लक्ष्‍य आहे. त्यांना सदैव फेस मास्क वापरण्याची आठवण करून दिली जाईल जेणेकरून ते अधिक जबाबदार होतील आणि सार्वजनिक सुरक्षेविषयी प्रतिबद्ध राहतील.

 जागरूकतेचे हे अभियान घडी डिटर्जंटच्या पॅकेटवर दाखविले जाईल ज्यामध्ये वास्तविक लोकांना एका प्रिंटेड मास्क ने कव्हर केले गेले आहे. पॅकेटवर संदेशाव्यतिरिक्त घडी डिटर्जंट आपल्या वितरण चॅनेल्सचे एक विशाल नेटवर्क सक्रिय करत आहे, तसेच आपल्या किरकोळ भागीदारांनाही या संदेशाचा प्रसार करण्यासाठी या मोठ्या अभियानामध्ये सामील होण्यासाठी आमंत्रित करत आहे.

 घडी ने एका व्हिडीओच्य माध्यमातूनही हे अभियान पुढे नेले आहे ज्यामध्ये दुकानांमध्ये एक मुलगी आपल्या वडिलांना काळजी घेण्याविषयी जागरूकता प्रदर्शित करण्याची मास्क वापरणे हि एक सर्वात चांगली पद्धत याची जाणीव करून देते - जसे घडीच्या पॅकेटवर दाखविले आहे. फिल्ममध्ये मास्क नियमित धुण्याचे महत्त्वही दाखविण्यात आले आहे.

Comments

Popular posts from this blog

अभिनेता साई गुंडेवार यांचे प्रदीर्घ आजाराने अमेरिकेत निधन!

कॅप्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेडची ग्रीन यात्रासोबत वृक्षारोपण मोहीम

Views on the decision of Monetary Policy Committee of RBI.