ग्रामिण भागात विमा जागरुकता करण्यामार्फत एसबीआय जनरल इन्श्युरन्स साजरा करीत आहे “किसान दिवस”

 ग्रामिण भागात विमा जागरुकता करण्यामार्फत 

एसबीआय जनरल इन्श्युरन्स साजरा करीत आहे “किसान दिवस”


 मुंबई,24डिसेंबर 2020: किसान दिवसाच्या प्रसंगी, एसबीआय जनरल इन्श्युरन्सने शेतक-यांसाठी विमा जागरुकता उपक्रमाचे आयोजन केले होते, या उपक्रमामार्फत वित्त समावेशकतेला सक्षम करण्यात आले. राजस्थान, गुजराथ, तामिळनाडू, ओडिसा तसेच देशाच्या इतर भागांमधल्या 50 गावांमध्ये कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले होते.

शेतक-यांना क्रॉप विमे आणि नॉन-क्रॉप विमा समाधानांच्या महत्वाची माहिती देण्याचा आणि त्यामार्फत त्यांना नैसर्गिक आपत्तींसाठी सज्ज होण्यास मदत करण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे.

मागच्या काही ग्रामिण उपक्रमांच्या आधारावर, शेतक-यांना विम्याशी संबंधित माहिती असणे अतिशय महत्वाचे आहे, ज्यामुळे ती त्यांच्यासाठी काउंटर-सायक्लिकल किंवा आपत्तींसाठी समाधानाच्या स्वरुपात काम करु शकते याची आम्हाला जाणीव झाली. किसान दिवसाला आपल्या शेतक-यांद्वारे दिल्या जाणा-या योगदानाचे महत्व सांगणारा दिवस मानले जाते. शेतक-यांना शेतीसंबंधित तोट्यांपासून उदभवणा-या जोखमींना कमी करण्याच्या दृष्टीने सबळ बनवण्यासाठी विम्याच्या जागरुकतेबद्दल बोलण्यासाठी या दिवसासारखा दुसरा कोणताही सर्वोत्तम दिवस नाही. 

Comments

Popular posts from this blog

अभिनेता साई गुंडेवार यांचे प्रदीर्घ आजाराने अमेरिकेत निधन!

कॅप्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेडची ग्रीन यात्रासोबत वृक्षारोपण मोहीम

Views on the decision of Monetary Policy Committee of RBI.