फियाट क्रिस्‍लर ऑटोमोबाइल्‍सकडून हैद्राबादमध्‍ये ग्‍लोबल डिजिटल हब उभारण्‍यासाठी १५० दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक

 

फियाट क्रिस्‍लर ऑटोमोबाइल्‍सकडून हैद्राबादमध्‍ये ग्‍लोबल डिजिटल हब उभारण्‍यासाठी १५० दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक

एफसीए आयसीटी इंडिया हे उत्तर अमेरिका व ईएमईए बाहेरील कंपनीचे सर्वात मोठे जागतिक डिजिटल हब असणार

·         वर्ष २०२१ अखेरपर्यंत जवळपास १,००० अत्‍याधुनिक तंत्रज्ञान रोजगारांची निर्मिती

·         कनेक्‍टेड वेईकल प्रोग्राम्‍स, आर्टिफिशियल इंटेलिजन्‍स, डेटा सायन्‍स व क्‍लाऊड तंत्रज्ञानांसाठी सर्वोत्तम तंत्रज्ञान क्षेत्रांमध्‍ये धोरणात्‍मक क्षमतांना चालना

·         ग्राहक जीवनचक्रादरम्‍यान इंटेलिजन्‍सचा लाभ घेत ग्राहक अपेक्षांची जलदतेने पूर्तता करण्‍यासाठी नवोन्‍मेष्‍कारी पॉवरहाऊसची निर्मिती

·         धोरणात्‍मक भागीदार, स्‍टार्ट-अप्‍स, डिजिटल अॅक्‍सेलरेटर्स व युनिव्‍हर्सिटीजच्‍या इकोप्रणालीची स्‍थापना

मुंबई । बुधवार । १६ डिसेंबर २०२०

फियाट क्रिस्‍लर ऑटोमोबाइल्‍सने (एफसीए) आज हैद्राबादमध्‍ये नवीन ग्‍लोबल डिजिटल हब उभारण्‍यासाठी १५० दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक करण्‍याच्‍या निर्णयाची घोषणा केली. एफसीए आयसीटी इंडिया हे एफसीचे नवीन नवोन्‍मेष्‍कारी व तंत्रज्ञान विकास केंद्र उत्तर अमेरिका व ईएमईए बाहेरील कंपनीचे सर्वात मोठे डिजिटल हब आहे. ही गुंतवणूक ऑटोमोबाइल उत्‍पादन समूहाची देशातील उपस्थितीमध्‍ये लक्षणीयरित्‍या वाढ करते.

एफसीए आयसीटी इंडियामुळे वर्ष २०२१ अखेरपर्यंत जवळपास १,००० नवीन अत्‍याधुनिक तंत्रज्ञान रोजगारांची निर्मिती होईल आणि त्‍यांच्या पुढील दोन ते तीन वर्षांमध्‍ये नवीन कर्मचारी भरती करण्‍याच्‍या प्रमाणामध्‍ये वाढ करण्‍याच्‍या योजना आहेत. नवीनच नियुक्‍त करण्‍यात आलेले कर्मचारी आकर्षक उत्‍पादने व संकल्‍पनांवर काम करतील, ज्‍यामुळे एफसीए येथील गतीशीलतेचे भविष्‍य परिभाषित होईल. ग्‍लोबल डिजिटल हब एफसीएसाठी 'परिवर्तन व नवोन्‍मेष्‍कारी इंजिन' म्‍हणून सेवा देईल आणि जागतिक आयटी धोरणाला चालना देईल. तसेच प्रबळ व्‍यासपीठ, तंत्रज्ञान व सर्वोत्तम सेवा केंद्रांच्‍या माध्‍यमातून सर्वोत्तमता देईल. ग्‍लोबल डिजिटल हब कनेक्‍टेड वेईकल प्रोग्राम्‍स, आर्टिफिशियल इंटेलिजन्‍स, डेटा सायन्‍स व क्‍लाऊड तंत्रज्ञान अशा सर्वोत्तम तंत्रज्ञान क्षेत्रांमध्‍ये धोरणात्‍मक क्षमतांना निर्माण करण्‍यावर लक्ष केंद्रित करेल.  

एफसीए गेल्‍या दोन दशकांपासून भारतभरातील त्‍यांची उत्‍पादन व अभियांत्रिकी उपस्थिती वाढवत आली आहे. हैद्राबादमधील नवीन ग्‍लोबल डिजिटल हब भारताच्‍या जागतिक दर्जाच्‍या डिजिटल व आयटी प्रतिभांना समोर आणण्‍याप्रती असलेल्‍या एफसीएच्‍या सातत्‍यपूर्ण कटिबद्धतेला सादर करते.

''डिजिटल युगामध्‍ये डेटा हे नवीन चलन आहे. आमचा ग्राहकांच्‍या अपेक्षांची जलदपणे पूर्तता करण्‍यासाठी आकर्षक नवीन उत्‍पादने व सेवा निर्माण करत डेटाद्वारे सक्षम इंटेलिजन्‍सला चालना देण्‍याच्‍या माध्‍यमातून नवोन्‍मेष्‍कारी पॉवरहाऊस निर्माण करण्‍याचा मनसुबा आहे,'' असे एफसीएच्‍या उत्तर अमेरिका व एशिया पॅसिफिकमधील सीआयओ ममता चमर्थी म्‍हणाल्‍या. ''एफसीए आयसीटी इंडियाच्‍या प्रमुख उद्दिष्‍टांपैकी एक म्‍हणजे जागतिक स्‍तरावरील व भारतातील एफसीएच्‍या ऑटोमोटिव्‍ह कार्यसंचालनांच्‍या प्रत्‍येक पैलूचे डिजिटलीकरण करणे आणि उदयोन्‍मुख तंत्रज्ञानांचा अवलंब करण्‍याच्‍या माध्‍यमातून वारसावरून डिजिटलमध्‍ये परिवर्तन करणे. आम्‍ही गतीशीलता व ग्राहक-केंद्रित सुविधांना प्राधान्‍य देण्‍यासाठी नवोन्‍मेष्‍कारी व उद्योजकतेच्‍या प्रबळ, जागतिक संस्‍कृतीला चालना देत आहोत.''

प्रतिभांच्‍या उपलब्‍धतेसह नवोन्‍मेष्‍कारी व प्रो-बिझनेस धोरणांच्‍या संस्‍कृतीने एफसीएच्‍या हैद्राबादमध्‍ये केंद्र उभारण्‍याच्‍या निर्णयामध्‍ये प्रमुख भूमिका बजावली. ग्‍लोबल डिजिटल हब आमच्‍या नवोन्‍मेष्‍कारी अजेंडाला चालना देण्‍यासाठी एफसीएचे विविध इकोप्रणाली भागीदारांसोबत धोरणात्‍मक भागीदार, स्‍टार्ट-अप्‍स, डिजिटल अॅक्‍सेलरेटर्स व युनिव्‍हर्सिटीजसोबतचे संबंध अधिक दृढ करेल.

''आम्‍ही एफसीए आयसीटी इंडिया येथील आमच्‍या प्रतिभा व कार्यक्षमता वाढवण्‍याला चालना देण्‍यासाठी धोरणात्‍मक तंत्रज्ञान भागीदारांसोबत सहयोगाने काम करत आहोत,'' असे एफसीए आयसीटी इंडियाचे संचालक व प्रमुख करिम ललानी म्‍हणाले. ''आम्‍ही गतीशीलपणे नवीन कर्मचा-यांना नियुक्‍त देखील करत आहोत आणि यासंदर्भात अत्‍यंत उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. मी आमचे प्रतिभावान अभियंते व डेटा सायंटिस्‍ट्सना आमच्‍या ग्राहकांसाठी नवीन विचार व तंत्रज्ञानांना विकसित करताना पाहण्‍यासाठी खूपच उत्‍सुक आहे. आमचा विश्‍वास आहे की, आमचे ग्‍लोबल डिजिटल हब ग्राहक सुरक्षितता, कनेक्‍टेड गतीशीलता व डिजिटल शोरूम अनुभव अशा विविध क्षेत्रांमधील नवोन्‍मेष्‍काराला चालना देईल. आम्‍ही एफसीएला जागतिक गतीशीलता प्रमुख म्‍हणून सक्षम करणारे अग्रणी ग्‍लोबल डिजिटल हब निर्माण करण्‍यासाठी उत्‍सुक आहोत.''  

एफसीएची महाराष्‍ट्र व तामिळनाडूमध्‍ये प्रबळ उपस्थिती आहे. कंपनीचे मुख्‍यालय मुंबईमध्‍ये आहे आणि कंपनीमध्‍ये ३,००० हून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत. ग्‍लोबल डिजिटल हबसह एफसीए तेलंगणामधील त्‍यांची उपस्थिती वाढवणार आहे. कंपनीची महाराष्‍ट्रातील रांजणगाव येथे संयुक्‍त उद्यम वाहन व इंजिन उत्‍पादन केंद्र आहे. कंपनीची अभियांत्रिकी व उत्‍पादन विकास कार्यसंचालने पुणे व चेन्‍नईमध्‍ये आहेत.

''हैद्राबाद, तेलंगणामध्‍ये ग्‍लोबल डिजिटल हब उभारण्‍यासाठी १५० दशलक्ष डॉलर्सच्‍या गुंतवणूकीमधून भारत व आमच्‍या ग्राहकांप्रती आमची सातत्‍यपूर्ण कटिबद्धता दिसून येते,'' असे एफसीए इंडियाचे अध्‍यक्ष व व्‍यवस्‍थापकीय संचालक डॉ. पार्थ दत्त म्‍हणाले. ''एफसीए आयसीटी इंडिया आमचे तंत्रज्ञान आधारस्‍तंभ असलेले केंद्र असेल. हे केंद्र आम्‍हाला भावी गतिशीलतेसाठी उत्‍पादने विकसित करण्‍यामध्‍ये मदत करेल आणि ग्राहक-केंद्रित सुविधा वाढवण्‍यासाठी आमच्‍या प्रयत्‍नांना अधिक दृढ देखील करेल. भारत व जगासाठी डिजिटल-संचालित उत्‍पादने व तंत्रज्ञाने स्‍थानिक पातळीवर विकसित करण्‍यासाठी आमच्‍या भारतीय कार्यसंचालनांना अधिक क्षमतापूर्ण करण्‍याचा आमचा दृष्टिकोन समजण्‍याप्रती हे एक लक्षणीय पाऊल आहे.''   

एफसीए इंडिया रांजणगावमध्‍ये पुरस्‍कार-प्राप्‍त जीप® कम्‍पासचे उत्‍पादन करते आणि जपान व ऑस्‍ट्रेलियासह १३ आंतरराष्‍ट्रीय राइड-हँड ड्राइव्‍ह बाजारपेठांमध्‍ये एसयूव्‍ही निर्यात करते. कम्‍पास स्‍थानिक पातळीवरून प्राप्त घटकांसह उत्‍पादित करण्‍यात आलेली 'मेड इन इंडिया' वेईकल आहे. कंपनीने गेल्‍या तीन वर्षांमध्‍ये एसयूव्‍हीच्या ५०,००० हून अधिक युनिट्सची विक्री केली आहे आणि नुकतेच त्‍यांची निर्यात क्षमता दुप्‍पट करत जवळपास २०,००० युनिट्सची विक्री केली आहे. कंपनी नवीन व आकर्षक उत्‍पादने सादर करण्‍यासाठी योजना आखत आहे.

Comments

Popular posts from this blog

Indegene acquires Trilogy Writing & Consulting GmbH, a medical writing consultancy

TiEcon Mumbai 2023, brilliantly showcased revolutionary ideas & impactful solutions to build an Anti-Fragile and Sustainable India

REC DECLARES ITS FINANCIAL RESULTS FOR Q2 & H1 FY24