यंदाच्या ख्रिसमसच्या औचित्याने सीवूड ग्रँड सेंट्रल साजरा करत आहे ‘टॉय ऑफ हॅप्पीनेस’

 यंदाच्या ख्रिसमसच्या औचित्याने सीवूड ग्रँड सेंट्रल साजरा करत आहे 

टॉय ऑफ हॅप्पीनेस

  • यंदाच्या ख्रिसमध्ये सीवूड ग्रँड सेंट्रल साजरा करत आहे भेटवस्तू देण्याचा आनंद
  • खरेदीवर मुलांसाठी खात्रीशीर भेटवस्तू आणि हॅमलीजकडून खेळणी
  • सर्वाधिक खरेदी करणाऱ्या १० शॉपर्स ऑफ द वीकना रु.१०,००० मूल्याचे गिफ्ट हॅम्पर जिंकण्याची संधी

नवी मुंबई९ डिसेंबर, २०२० : यंदाच्या वर्षी सांताक्लॉज भरपूर आनंद आणि भेटवस्तू घेऊन जरा लवकरच येत आहे कारण नवी मुंबईतील सर्वात आवडते शॉपिंग आणि फॅमिली डेस्टिनेशन असलेला सीवूड ग्रँड सेंट्रल मॉल ‘टॉय ऑफ हॅप्पीनेस’ हि सर्वात मोठी ख्रिसमस ऑफरिंग साजरे करण्यास सज्ज झाला आहे. ख्रिसमसची गंमतजंमत आणि भुरळ घालणारी आनंद सफर घडवत बच्चेकंपनीच्या चेहऱ्यावर हास्य व आनंद फुलवण्यासाठी सीवूड ग्रँड सेंट्रल मॉलची जय्यत तयारी झाली आहे. ख्रिसमस आणि नव्या वर्षाचा उत्सव एका वेगळ्या उंचीवर नेत या मॉलमध्ये शहरातील सर्वात उंच ख्रिसमस ट्री उभारण्यात येणार आहे. हे येथील एक मुख्य आकर्षण असेल आणि येथे फोटो काढण्याची/ही संधी मिळेल. या माध्यमातून स्वागत करण्यात येईलउत्साह वाढविला जाईल आणि सर्व खेळणी व शॉप अँड विन भेटवस्तू दाखविण्यात येतील.

पारंपरिक ख्रिसमसचे वातावरण आणि ख्रिसमस टॉय ट्री सजावटीसोबतच मॉलमध्ये ख्रिसमसच्या संकल्पनेवर आधारीत हँगिंग्सदर्शनी भागातील प्रकाशयोजनास्नोफ्लेक पॅनल्स आणि मुलांच्या आवडत्या परिकथांशी संबंधित अनेक गोष्टी येथे असतील. या निमित्ताने सीवूड ग्रँड सेंट्रल मॉल ‘शॉप अँड विन’ उपक्रमांतर्गत नेहमीच्या खरेदीदारांना अनेक बक्षीसे देण्याबरोबरच छोट्या दोस्तांनाही खास खेळणी आणि भेटवस्तू देणार आहेत.

शॉप अँड विनचे समाधान :

  • ५ शॉपिंग बॅग्स सोबत कॅरी करा आणि हॅमलेजकडून १ भेटवस्तू/खेळणे  आणि रु.१,००० मूल्याचे गिफ्ट व्हाउचर जिंका,
  • १० शॉपिंग बॅग्स सोबत कॅरी करा आणि हॅमलेजकडून २ भेटवस्तू/खेळणे  आणि रु.१,००० मूल्याचे गिफ्ट व्हाउचर जिंका,
  • सर्वाधिक खरेदी करणाऱ्या १० शॉपर्स ऑफ द वीक खरेदीदारांना रु.१०,००० मूल्य असलेले गिफ्ट हँपर मिळणार आहे.

तुमच्या जुन्या खेळण्यासह आनंद शेअर करा! जिथे आवश्यक आहे तिथे आनंदाची वृष्टी करण्यावर सीवूड ग्रँड सेंट्रल मॉलचा विश्वास आहे आणि समाजातील प्रत्येक स्तरावरील मूल आनंदी होईल तोच खरा ख्रिसमस असेल. नेक्सस मॉल्सचा ‘काळजी घेण्याचे’ मूल्य जपत  आणि अभ्यागतांमध्ये व मुलांमध्ये ‘देण्याच्या व शेअर करण्याच्या’ वृत्तीला प्रोत्साहन देण्यासाठी अभ्यागत त्यांची खेळणी दान करू शकतात. अभ्यागटांनी देणगी म्हणून दिलेली जुनी खेळणी देहरंग गावातील मुलांना भेट म्हणून देण्यात येतील. या मुलांना ख्रिसमसची सजावट व वातावरण अनुभवता यावेयासाठी मॉलमध्ये निमंत्रित करण्यात येणार आहे.

या खेळकर ख्रिसमसबद्दल प्रतिक्रिया देताना सीवूड ग्रँड सेंट्रल मॉलचे केंद्र संचालक राहिल नासिर अज्जानी म्हणाले, “सणासुदीची ही परंपरा जिवंत ठेवणे आताच्या काळात काकणभर अधिक महत्त्वाचे आहे. यंदाच्या ख्रिसमसमध्ये आम्हाला आमच्या नेहमीच्या खरेदीदारांना आनंद द्यायचा आहे त्याचबरोबर तत्काळ समाधान आणि सर्वोत्तम खेळण्यांच्या भेटवस्तूंनी

 आम्ही बच्चेकंपनीलाही खुश करू इच्छितो. खरेदीची रक्कम जेवढी जास्त असेलत्यांच्या मुलांना तेवढ्या जास्त भेटवस्तू मिळतील. शहरातील सर्वात उंच ख्रिसमस ट्री पाहून मुलांना आणि इतरांनाही खूप आनंद होईल आणि आमच्या ग्राहकांना सर्वोत्तम ख्रिसमस वातावरण अनुभवता येईल.” 

एक मॉल म्हणून सीवूड ग्रँड सेंट्रलतर्फे खरेदीदारांना ४०० हून अधिक ब्रँड्सचा पर्याय उपलब्ध करून देण्यात येईल. त्याचप्रमाणे मॉलमध्ये सुरक्षितता व स्वच्छता राखण्याच्या दृष्टीने काटेकोर नियमांचे पालन करण्यात येईल. ग्राहक मॉलमध्ये आल्यावर त्यांच्या सुरक्षिततेची खातरजमा करण्यासाठी काटेकोर नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी ब्युरो व्हेरिटास यांच्याशी हातमिळवणी केली आहे. न्यू नॉर्मल परिस्थितीत स्थानिक प्रशासनाने जारी केलेल्या सर्व सुरक्षा व सॅनिटायझेशन नियमांचे पालन करत आम्ही आमचे ग्राहकरिटेलर्स आणि कर्मचाऱ्यांचे यथासांग स्वागत होईलयाची आम्ही खातरजमा करू.-- 

Comments

Popular posts from this blog

अभिनेता साई गुंडेवार यांचे प्रदीर्घ आजाराने अमेरिकेत निधन!

कॅप्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेडची ग्रीन यात्रासोबत वृक्षारोपण मोहीम

Views on the decision of Monetary Policy Committee of RBI.