पेपॉइंटने वंचित ग्रामीण कुटुंबांसाठी सुरू केला ई-गोल्ड उपक्रम

  पेपॉइंटने वंचित ग्रामीण कुटुंबांसाठी सुरू केला ई-गोल्ड उपक्रम

 

·         डिमॅट अकाउंट सुरू न करता रु.५०० पासून २२ कॅरेट सोन्यामध्ये गुंतवणूक करता येऊ शकते

·         तंत्रज्ञानाची फार माहिती नसलेले ग्राहक पेपॉइंट इंडियाशी संल्गन असलेल्या किरकोळ किंवा किराणा दुकानांच्या सहाय्याने सुलभपणे ई-गोल्डमध्ये गुंतवणूक करू शकतात.



 

मुंबई९ डिसेंबर २०२० : सोनेखरेदीचे वेगवेगळे मार्ग उपलब्ध असेल तरी शहरी भारतात ई-गोल्ड किंवा डिजिटल गोल्ड ही पद्धत वेगाने लोकप्रिय होत आहे. परंतुग्रामीण भारतात डिजिटल साक्षरता व जागरुकता यांचा अभाव असल्यामुळे ई-गोल्डची मागणी कमीच राहिली आहे.

 

ही परिस्थिती पाहता ४८,००० हून अधिक लास्ट-माइल फिजिकल स्टोअर्सचे नेटवर्क असलेल्या पेपॉइंटने ग्रामीण कुटुंबांसाठी ई-गोल्डमधील गुंतवणूक सुलभ व सुरक्षित करण्यासाठी त्यांच्या प्लॅटफॉर्मवर ई-गोल्ड सुविधा सुरू केली आहे. या उपक्रमाच्या माध्यमातूनतंत्रज्ञानाची फार माहिती नसलेल्या ग्राहकांना पेपॉइंट स्टोअरमधील कर्मचाऱ्यांच्या मार्गदर्शनाने ई-गोल्डची सहजपणे खरेदी व विक्री करता येते. कोणतीही व्यक्ती २२ कॅरेट सोन्यात ५०० रु. इतक्या कमी रकमेपासून गुंतवणूक करू शकते.

 

ई-गोल्ड सुविधेमध्ये डिमॅट अकाउंट सुरू न करताही नॉन-फिजिकल किंवा डिजिटल गोल्ड कमी प्रमाणात घेता येते. त्यामुळे प्रत्यक्ष सोने विकत घेतल्यास त्या सोन्याची वैधता व शुद्धता तपासणेअत्यंत महागडा दरसुरक्षित ठेवण्याची जबाबदारीसाठवणुकीच्या समस्या इत्यादी उण्या बाजू  टाळता येतात.

 

दुसऱ्या बाजूलाएकदा ग्राहकाने पेपॉइंटशी संलग्न असलेल्या त्यांच्या जवळच्या किरकोळ किंवा किराणा दुकानातून ई-गोल्ड घेतल्यावर त्या किमतीचे सोने खरेदी करण्यात येईल आणि ग्राहकाच्या वतीने सरकारमान्य सुरक्षित तिजोरीमध्ये ठेवण्यात येते. त्याचप्रमाणे अॅक्सिस बँक या तिजोऱ्यांची विश्वस्त आहे. ग्राहकांचे हित राखण्यासाठी या उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत.

 

यावर प्रतिक्रिया देताना पेपॉइंट इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक केतन दोशी म्हणाले, “सोन्याची वीटनाणी किंवा दागिन्यांच्या स्वरुपात सोने खरेदी करण्याची किंमत जास्त असते कारण सध्या सोन्याची किंमत रु.५,१०० प्रति ग्रॅम इतकी आहे. त्यामुळे अगदी तळागाळापर्यंत किमान गुंतवणुकीची ही ई-गोल्डची संकल्पना पोहचविण्याचे आणि त्यायोगे अल्प-उत्पन्न कुटुंबांनाही नियमित अल्प-बचत करण्यास प्रोत्साहित करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.

 

सध्याच्या अनिश्चित काळातकोव्हिड-१९च्या साथीने प्रचंड नुकसान होत असताना सुरक्षेची गरज अधिकच तीव्र झाली आहे. ई-गोल्ड एसआयपीमुळे कोतीही व्यक्ती मर्यादित उत्पन्नासह आपली मत्ता हळुहळू वाढवू शकत आणि या आव्हानात्मक परिस्थितीत आर्थिक सुरक्षितता बळकट करू शकतात.”, असे ते पुढे म्हणाले.

 

काही किरकोळ विक्रेत्यांसोबत प्रायोगिक तत्वावर हा उपक्रम राबवताना पेपॉइंटला दिसून आले कीग्राहक दैनंदिनसाप्ताहिक आणि मासिक गुंतवणुकीचा पर्याय स्वीकारत आहेत. अशा प्रतिसादामुळे हे आर्थिक उत्पादन तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी पेपॉइंटचा निर्धार अधिक दृढ झाला.

 

पेपॉइंट सराफा बाजारातील रिअल टाइम दरानुसार गुंतवणूक अॅलोकेट किंवा रिडीम करत असल्यामुळे किमतीमध्ये नेहमीच पारदर्शकता राखली जाते. खरेदीतील लवचिकताउच्च लिक्विडिटीदीर्घकालीन दृष्टिकोन आणि सुरक्षितता या असामान्य फीचर्समुळे ई-गोल्डमधील गुंतवणूक पिरॅमिच्या तळाशी असलेल्या ग्राहकांसाठी एक उत्तम गुंतवणूक मार्ग आहे.

Comments

Popular posts from this blog

Indegene acquires Trilogy Writing & Consulting GmbH, a medical writing consultancy

TiEcon Mumbai 2023, brilliantly showcased revolutionary ideas & impactful solutions to build an Anti-Fragile and Sustainable India

REC DECLARES ITS FINANCIAL RESULTS FOR Q2 & H1 FY24